ETV Bharat / state

Maharashtra Corona Update : राज्यात 1 हजार 966 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, मृत्यू 12

author img

By

Published : Feb 14, 2022, 8:45 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना नियंत्रणात आला असून गेल्या चोवीस तासात केवळ दोन हजार रुग्ण सापडले आहेत. तर बारा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णही 36 हजारच्या आसपास असून हा आकडा गेल्या आठ दिवसात 30 ते 35 हजाराने खाली आला आहे. ओमायक्रॉनचे 8 रुग्ण सापडले असून सर्वच रुग्ण मुंबईतील आहेत, असे राज्याच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट

मुंबई - राज्यात कोरोना नियंत्रणात येत असून गेल्या चोवीस तासात 1 हजार 966 नव्या रुग्णांचे निदान झाले ( Maharashtra Corona Update ) असून बारा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णही 36 हजारांच्या आसपास असून ( Active Corona Patients in Maharashtra ) हा आकडा गेल्या आठ दिवसात 30 ते 35 हजाराने खाली आला आहे. राज्याला यामुळे दिलासा मिळाला आहे. तर ओमायक्रॉनचे 8 रुग्ण सापडले ( Omicron Patients in Maharashtra ) असून सर्वच रुग्ण मुंबईतील आहेत, असे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

राज्य सरकारच्या कठोर उपाय योजनामुळे तिसरी लाट आटोक्यात आली आहे. रुग्ण संख्या ही झपाट्याने कमी होत असून सक्रिय रुग्णांचे प्रमाण नियंत्रणात आले आहे. आज 1 हजार 966 रुग्ण आढळले आहेत, पैकी 12 जण दगावले. 11 हजार 408 रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 97:66 टक्के आहेत. आजपर्यंत 7 कोटी 65 लाख 27 हजार 895 कोविड चाचण्या केल्या. त्यापैकी 10.25 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 44 हजार 915 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 48 हजार 408 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 815 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 36 हजार 447 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

ओमायक्रॉनचे 8 रुग्ण - कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेला ओमयक्रॉन राज्यात हळू हळू फैलावत आहे. शनिवारी 237 रुग्णांपैकी 226 रुग्ण मुंबईत सापडले होते. आज आठ रुग्णांचे निदान झाले आहे. सर्वच रुग्ण मुंबईतील आहेत. आजपर्यंत 3 हजार 768 एवढे रुग्ण बाधित झाले आहेत. तर 2 हजार 334 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 8 हजार 804 जणांची जनुकीय चाचणी केली. 7 हजार 273 चाचण्याचे अहवाल प्राप्त झाले असून 1 हजार 531 नमुने प्रलंबित आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -

मुंबई महापालिका - 192

ठाणे - 12

ठाणे मनपा - 33

नवी मुंबई पालिका - 29

कल्याण डोबिवली पालिका - 21

मीरा भाईंदर - 6

वसई विरार पालिका - 8

नाशिक - 98

नाशिक पालिका - 48

अहमदनगर - 98

अहमदनगर पालिका - 45

पुणे - 107

पुणे पालिका - 245

पिंपरी चिंचवड पालिका - 100

सातारा - 92

नागपूर मनपा - 110

हेही वाचा - Congress Protest Against Modi : फडणवीसांच्या घराबाहेरचं आंदोलन मागे, पटोले म्हणाले, "मोदींनी महाराष्ट्राची..."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.