ETV Bharat / state

#MAHACORONA LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

author img

By

Published : Jun 8, 2021, 7:10 AM IST

Updated : Jun 8, 2021, 2:21 PM IST

maharashtra-corona
maharashtra-corona

14:15 June 08

हृदयद्रावक घटना; कोरोना संसर्गाने बाप-लेकाचा मृत्यू

हृदयद्रावक घटना; कोरोना संसर्गाने बाप-लेकाचा मृत्यू
हृदयद्रावक घटना; कोरोना संसर्गाने बाप-लेकाचा मृत्यू

आंबेगाव (पुणे) करोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात अनेकांचे कुटुंब उद्वस्त केले आहे. सध्या परिस्थिती आटोक्यात आली असली तरीही धोका अजून टळला नाही. या महासाथीने अनेकांचे नातलग हिरावले. एकाच कुटुंबातील दोन-तीन व्यक्तींचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला आहे.अशा अनेक घटना राज्यात घडल्या आहेत. आंबेगाव तालुक्यातील चोंडोली बुद्रुक येथेही अशीच एक हृदयद्रावक घटना घडली. कोरोना संसर्गाने बाप व लेकाचा काही तासाच्या फरकाने मृत्यू झाला आहे. घरातील दोन्हीही कर्ते पुरूष गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळा आहे.
 


 

07:06 June 08

मुंबईत सोमवारी 94 हजार 941 लाभार्थ्यांचे लसीकरण

मुंबईत सोमवारी 94 हजार 941 लाभार्थ्यांचे लसीकरण
मुंबईत सोमवारी 94 हजार 941 लाभार्थ्यांचे लसीकरण

मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेनुसार सोमवार ते बुधवार वॉक इन पद्धतीने येणाऱ्या तर गुरुवार ते शनिवार नोंदणी पद्धतीने येणाऱ्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. आज सोमवारी 94 हजार 941 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 36 लाख 76 हजार 615 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
 

06:17 June 08

मुंबईत कोरोनावरील बनावट औषध निर्मिती आणि विक्री प्रकरणी दोघांना अटक, २२ लाखांचे औषध जप्त

मुंबई - कोरोनाची बनावट औषध निर्मिती केल्याप्रकरणी आणि विक्री केल्याप्रकरणी मुंबईत दोघांना अटक करण्यात आली आहे. या औषधांची किंमत २२ लाख रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच बनावट औषध तयार करण्यात नोएडा आणि मेरठमधील कंपन्याही सामील असून चौकशी सुरू असल्याचंही पोलीस म्हणाले. 

Last Updated : Jun 8, 2021, 2:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.