ETV Bharat / state

Breaking News : धातूच्या ग्लासमध्ये फटाके फोडणं १५ वर्षाच्या मुलाच्या जीवावर बेतलं

author img

By

Published : Oct 25, 2022, 6:18 AM IST

Updated : Oct 25, 2022, 9:08 PM IST

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra Breaking news

21:07 October 25

धातूच्या ग्लासमध्ये फटाके फोडणं १५ वर्षाच्या मुलाच्या जीवावर बेतलं

धुळे - दिवाळीच्या दिवशी धातूच्या ग्लासमध्ये फटाके फोडताना १५ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतल्याची घटना धुळे शहरातील जुने धुळे भागात दिवाळीच्या दिवशी रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनं जुने धुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

20:31 October 25

मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक

मुंबई - मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक; दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. मुंबईतील एमआरए मार्ग पोलिस स्टेशनमध्ये आयपीसी कलम ३७६ (बलात्कार) आणि ३४ आणि पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

19:37 October 25

मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी एकाला अटक

मुंबई - मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. मुंबईतील एमआरए मार्ग पोलिस स्टेशनमध्ये आयपीसी कलम ३७६ आणि ३४ तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

18:51 October 25

एक हिंदू इंग्लडचा पंतप्रधान होऊ शकतो, भाजपचा एकही मुस्लीम खासदार नाही - शशी थरुर यांनी दाखवला विरोधाभास

नवी दिल्ली - भाजपसारख्या पक्षाचा संसदेत आज एकही मुस्लिम खासदार नाही. ही धक्कादायक परिस्थिती आहे, जी पूर्वी कधीही नव्हती. भाजपचे समर्थक दुसऱ्या पार्श्वभूमीचा पंतप्रधान किंवा इस्लामिक किंवा ख्रिश्चन धर्माचा भाजपचा मुख्यमंत्री अशी कल्पना करू शकतात का अशी शंका आहे असे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे. भारतीय वंशाचे हिंदू पंतप्रधान इंग्लंडच्या सत्तेत आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

18:31 October 25

सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही - पृथ्वीराज चव्हाण

कराड (सातारा) - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची स्थिती विदारक आहे. अजून पूर्णपणे मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीवर एकमत होत नाही. त्यांच्यात अंतर्गत कलह आहे. केंद्रसरकारवरही चव्हाण यांनी टीका केली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा वापर करून घेण्याचा भाजपचा डाव आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता हे सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

18:17 October 25

पीव्ही सिंधूने बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये

क्वालालंपूर - राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती पीव्ही सिंधूने मंगळवारी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे, दिग्गज शटलर प्रणॉय एचएसनेही क्रमवारीत जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर झेप घेतली आहे. दुहेरीत, पुरुष दुहेरीत एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला दोन स्थानांनी झेप घेत जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानावर, महिला दुहेरीत ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद चार स्थानांनी झेप घेत जागतिक क्रमांक २७ आणि मिश्र दुहेरीत इशान भटनागर आणि तनिषा क्रास्टो जागतिक क्रमांक 29 बनण्यासाठी दोन स्थानांनी झेप घेतली. सर्वांनी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमांक मिळवला आहे.

17:59 October 25

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाचा खून

जालना - अंबड शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाचा चाकूने भोकसून खून केल्याची घटना घडली आहे. मृत राजेंद्र विठ्ठल भोरे हा होळकर नगर अंबड येथील रहिवासी होता. मृत राजेंद्र भोरे मॉर्निंग वॉकसाठी जात असताना संशयित अरोपी पाराजी गहीनाजी दिवटे याने त्याला मारले. त्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध असल्याचा त्याचा संशय होता. राजेंद्र भोरे हा दिवटे याला, नपुंसक आहे, असे चिडवायचा. याचा राग मनात धरुन संशयित दिवटे याने भोरे याच्या पोटावर चाकूने वार करुन खून केला आहे. मयत राजेंद्र भोरे यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीमध्ये हे म्हटले आहे.

17:09 October 25

कोलशेत खाडी परिसरामध्ये ठाणेकर नागरिकांची ग्रहण पाहण्यास गर्दी

ठाणे - सूर्यग्रहणाला सुरुवात झाली आहे. ठाण्यातील कोलशेत खाडी या परिसरामध्ये ठाणेकर नागरिकांची ग्रहण पाहण्यास गर्दी. अनेक नागरिक सन गॉगल घालून सूर्यग्रहण पाहत आहेत. सूर्यग्रहण पाहण्यासाठी लहान मुले तसेच खगोल प्रेमींची मोठी गर्दी झाली आहे.

17:06 October 25

योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कॉलचे नवी मुंबई कनेक्शन

नवी मुंबई - आपल्या मोबाईलवर विदेशातून आलेले कॉल भारतीय स्थानिक नंबर डिस्प्ले करत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याची धक्कादायक माहिती डिओटीने नवी मुंबई पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तुर्भे येथील एम. एस. ग्लोबल एंटरप्राईस या बोगस कॉल सेंटरवर कारवाई केली आहे. नवी मुंबई सायबर सेल व गुन्हे शाखा कक्ष-१ पोलीसांकडुन International illegal VoIP Call Routing करणारे बोगस कॉल सेंटर उध्वस्त करण्यात आले आहे. या प्रकरणी सुरज मुरली वर्मा (वय 30 वर्षे), अनुप मुरली वर्मा ( वय 40 वर्षे ), साजिद जलील सय्यद ( वय 36 वर्षे ) आणि अब्दुल अजिज फिरोजाबादी (वय 42वर्षे ) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

15:44 October 25

भारतीय वंशाचे ऋषी सुनक थोड्याच वेळात ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून राष्ट्राला उद्देशून पहिले भाषण करणार

हैदराबाद - भारतीय वंशाचे ऋषी सुनक लवकरच किंग चार्ल्स यांची भेट घेतील आणि पंतप्रधान म्हणून राष्ट्राला उद्देशून पहिले भाषण देतील. ते स्थानिक वेळेुनसार दुपारी भाषण करतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, मावळत्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी किंग चार्ल्स यांना राजीनामा दि आहे. 10 डाऊनिंग स्ट्रीट येथे तिच्या अंतिम मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षतेनंतर औपचारिकपणे राजीनामा देण्यापूर्वी बोलताना ट्रस म्हणाल्या की, त्यांच्या सरकारने कष्टकरी कुटुंबांना मदत करण्यासाठी तात्काळ आणि निर्णायकपणे कार्य केले आणि दिवाळखोरी टाळण्यासाठी हजारो व्यवसायांना मदत केली.

15:27 October 25

राज्य सरकारकडून आमदारांना 80 लाखाची दिवाळी भेट?

मुंबई - राज्यात दिवाळीचा सण उत्साहात सुरू असताना परस्परांना भेटवस्तू दिल्या जात आहेत. अशातच राज्य सरकारनेही आपल्या सर्व आमदारांना स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून 80 लाख रुपयांची दिवाळी भेट दिली आहे. त्यामुळे नाराज आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न या निमित्ताने सरकारने केल्याची चर्चा आहे.

15:17 October 25

शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा

मुंबई - शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. बंड करण्यापूर्वी दिलेली आश्वासने, तसेच मंत्रिपद न मिळाल्याने हे आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधकांच्या हवाल्याने हे वृत्त मिळत आहे.

15:09 October 25

ऋषी सुनक यांना देशाच्या भल्यासाठी ट्रस यांच्या शुभेच्छा

लंडन - ब्रिटनच्या निवर्तमान पंतप्रधान लिझ ट्रस यांनी देशाला उद्देशून संदेश दिला. त्यांनी, पुतिन यांच्या आक्रमकतेविरुद्धच्या धाडसी लढ्यात आपण युक्रेनला पाठिंबा दिला पाहिजे, असे म्हटले आहे. युक्रेनने विजय मिळवला पाहिजे. आपण आपल्या देशाचे संरक्षण मजबूत करणे सुरू ठेवले पाहिजे. हेच साध्य करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असेही त्या म्हणाल्या. ऋषी सुनक यांना आपल्या देशाच्या भल्यासाठी प्रत्येक यशासाठी मी शुभेच्छा देते, असे त्यांनी सांगितले.

14:44 October 25

चळे येथील भीमा नदीपात्रामध्ये आढळला मृतदेह

सोलापूर - उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या भीमा नदी भरून वाहत आहे. याच दुथडी भरून वाहणाऱ्या नदीपात्रामध्ये आज सोमवार दिनांक 25 ऑक्टोबरच्या सकाळच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील चळे येथील भीमा नदीच्या पात्रामध्ये एक मृतदेह आढळून आला आहे.

14:35 October 25

देवेंद्र फडणवीस यांनी केले इंग्लंडचे नियोजित पंतप्रधान ऋषी सुनाक यांचे ट्विट करुन अभिनंदन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंग्लंडचे नियोजित पंतप्रधान ऋषी सुनाक यांचे ट्विट करुन अभिनंदन केले आहे. जगभरातील भारतीय देखील UK च्या लोकांची सेवा करण्याची तुमची नवीन जबाबदारी साजरी करत आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. यूकेचे पंतप्रधान म्हणून तुम्हाला खूप यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा, या शब्दात फडणवीस यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

14:31 October 25

भारतातील काही शहरांमध्ये व्हॉट्सअप सेवा काही प्रमाणात पुन्हा सुरू

भारतातील काही शहरांमध्ये व्हॉट्सअप सेवा काही प्रमाणात पुन्हा सुरू झाल्या आहेत.

14:14 October 25

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतारामतात्या पुंजाजी आहेर यांचे निधन

शरद पवारांचे सहकारी, देवळा, जि. नाशिकचे माजी आमदार, वसाकाचे माजी चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतारामतात्या पुंजाजी आहेर यांचे निधन झाले. राजकीय, सामाजिक, सहकार, कृषी व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. अशा शब्दात खा. सुप्रिया सुळे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

13:23 October 25

सीबीएससी दहावी बारावी प्रात्यक्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर

मुंबई - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2022-23 सत्रासाठी इयत्ता 10वी आणि 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रकल्प कार्य आणि अंतर्गत मूल्यांकन 1 जानेवारीपासून भारतातील आणि परदेशातील सर्व संलग्न शाळांसाठी सुरू होतील. सत्र 2022-23 साठी प्रात्यक्षिक परीक्षा/प्रकल्प/अंतर्गत मूल्यमापन 1 जानेवारी 2023 पासून भारतातील आणि परदेशातील सर्व संलग्न शाळांसाठी नियोजित केले आहे.

13:05 October 25

जगभरातील व्हॉट्सअप सेवा बंद

जगभरातील व्हॉट्सअप सेवा बंद. मेसेज जातही नाहीत आणि येतही नाहीत.

12:55 October 25

अरुणाचल प्रदेशात भीषण आग, 700 हून अधिक दुकाने जळून खाक

अरुणाचल प्रदेशात इटानगरमधील नाहरलगुन येथे अचानक भीषण आग लागली. या आगीत 700 हून अधिक दुकाने जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्याप्रमाणावर मालमत्तेची हानी झाली आहे.

12:35 October 25

भाजी चिरण्याच्या चाकूने मामाने केले भाच्याला जागीच ठार; मामा गजाआड

ठाणे - घरातील कौटुंबिक वादातून मामानेच भाजी कापण्याच्या चाकूने भाच्यावर सपासप वार करून घरातच निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा परिसरात असलेल्या इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात खुनी मामावर हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे. सतिश राजनारायण दुबे (वय ३१) असे अटक केलेल्या मामाचे नाव आहे. तर यश संजय तिवारी ( वय २२) असे हत्या झालेल्या भाच्याचे नाव आहे.

12:28 October 25

वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांना सहा महिन्यांची शिक्षा

मुंबई - मुंबई सत्र न्यायालयाने 2016 मध्ये रस्त्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल थांबवल्यानंतर वाहतूक पोलिस हवालदाराला मारहाण केल्याप्रकरणी दोघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एसडी तावशीकर यांनी 11 ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशात दोघांना प्रत्येकी 5,000 रुपये दंड ठोठावला आणि पीडित पोलीस हवालदाराला दुखापत झाली असल्याने आरोपीने त्याला 8,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी असे सांगितले.

12:21 October 25

फटाक्यांमुळे मुंबईत काल 26 वेगवेगळ्या ठिकाणी आग

मुंबई - काल फटाक्यांमुळे मुंबईत 26 वेगवेगळ्या ठिकाणी आग लागली. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे. गेल्या 3 दिवसांत अग्निशमन दलाला एकूण 70 आगीचे कॉल आले, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली.

12:15 October 25

श्री कंचुगल बंदे मठाचे ४४ वर्षीय प्रमुख बसवलिंग स्वामी यांची आत्महत्या

बेंगळुरू - श्री कंचुगल बंदे मठाचे ४४ वर्षीय प्रमुख बसवलिंग स्वामी यांनी सोमवारी सकाळी आत्महत्या केली. रामानगर जिल्ह्यातील मागडीजवळील केम्पापुरा गावात मठाच्या पूजा घराच्या खिडकीच्या ग्रीलला त्यांनी गळफास लावून घेतला. कर्नाटकातील 400 वर्ष जुन्या मठाचे 1997 मध्ये ते प्रमुख झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांनी रौप्यमहोत्सव साजरा केला होता.

12:11 October 25

कुरियर कंपनीचे २४ लाख चोरी करून पळालेली टोळी जेरबंद

दौंड - एसटी बसने प्रवास करणाऱ्या कुरिअरबॉयकडील 24 लाख रुपये घेऊन पळून गेलेल्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या टोळीतील संशयित 5 जणांना अटक केली आहे. तर 1 जण फरार झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

12:01 October 25

रिपब्लिकन पक्षाच्या उत्तर भारतीय आघाडीच्या अध्यक्षपदी श्यामधर दुबे

मुंबई - रिपब्लिकन पक्षाच्या उत्तर भारतीय आघाडीच्या महाराष्ट्र् राज्य अध्यक्षपदी श्यामधर दुबे यांची आज अधिकृत नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. बांद्रा येथील कार्यालयात दुबे यांना रिपाइं उत्तर भारतीय आघाडीच्या अध्यक्ष पदाचे पत्र आज रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

11:54 October 25

आपल्याकडे ५०० वर्षे राहिलेल्यांना नागरिकत्व सिद्ध करायला सांगतात - जितेंद्र आव्हाड

मुंबई - भारतीय वंशाचे दुसऱ्या पिढीतले तसे बघायला गेले तर अल्प संख्यांक ऋषी सुनक काल इंग्लंडचे पंतप्रधान होणार हे निश्चित झाले. तर आपल्याकडे ५०० वर्षे राहिलेल्यांना नागरिकत्व सिद्ध करायला सांगतात. अशाप्रकारचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

11:38 October 25

वाघाने कोळसा कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला केले ठार

चंद्रपूर - माजरी येथील नागरी वस्तीत एका वाघाने कोळसा कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला ठार केले. विशेष म्हणजे मांजरी परिसराच्या लोकवस्तीत गेल्या अनेक दिवसांपासून दोन वाघांचा मुक्त संचार आहे. त्यात एका वाघिणीला बछडे असल्याचे समजते. तरीही वनविभाग या वाघांना जेरबंद करण्यात रस नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

11:11 October 25

भामरागडमधील जवानांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळी साजरी करणार

जवानांनाही दिवाळीचा आनंद साजरा करता आला पाहिजे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

10:35 October 25

येथे भाविकांना चक्क पैशांच्या स्वरूपात मिळतो प्रसाद

दिवाळीच्या रात्री मंदिरात येणाऱ्या भाविकांना चक्क पैशांच्या स्वरूपात प्रसाद वितरित करण्याची प्रथा अमरावती शहरातील हिंदू स्मशानभूमी लगत असणाऱ्या कालीमाता मंदिरात गत 38 वर्षांपासून जोपासली जात आहे. हा प्रसाद मिळावा यासाठी दिवाळीच्या रात्री कालीमातेच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी उसळली होती

10:07 October 25

शेअर बाजारात तेजी, 171 अंशांनी वधारला निर्देशांक

शेअर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंगच्या दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली आहे. शेअर बाजाराचा निर्देशांक 171 अंशांनी वधारला असून 60,002 अंशावर खुला झाला आहे. तर, निफ्टी निर्देशांकात 77 अंकांची तेजी दिसत असून 17,808 अंशावर खुला झाला आहे.

09:33 October 25

फटाक्यांमुळे ठाण्यात 11 ठिकाणी आगीच्या घटना

फटाक्यांमुळे ठाण्यात 11 ठिकाणी आग लागली. ठाणे अग्निशमन दलाला आज एकूण 16 कॉल आले होते, त्यापैकी 11 कॉल फटाक्यांमुळे लागलेल्या आगीबाबत होते. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे अग्निशमन दलाने म्हटले आहे.

08:47 October 25

ऋषी सुनक यांच्या पंतप्रधान पदावर निवड झाल्याबद्दल नारायण मुर्ती यांनी दिली प्रतिक्रिया

इन्फोसिसचे संस्थापक आणि ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सासरे नारायण मुर्ती म्हणाले, ऋषी यांचे अभिनंदन. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. आम्हाला विश्वास आहे की ते युनायटेड किंगडममधील लोकांसाठी सर्वोत्तम प्रयत्न करतील.

08:03 October 25

बसमधील चालक आणि वाहक जिवंत जळाले

रांची येथील खडगर्हा बसस्थानकावर बसला आग लागल्याने बसमधील चालक आणि वाहक जिवंत जळाले. ड्रायव्हर आणि हेल्पर बसमध्ये झोपले होते. यादरम्यान पूजेचा दिवा लागल्याने बसने पेट घेतला. रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत असून, घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बसमधील आग विझविली. बसच्या आतून दोन जळालेले मृतदेह सापडले आहेत.

07:12 October 25

बसवलिंग स्वामींचा मठात आढळला मृतदेह

श्री कांचुगल बंदे मठाचे दुसरे द्रष्टा बसवलिंग स्वामी, वय 45, यांचा मृतदेह काल रामनगर जिल्ह्यातील मठाच्या खोलीत आढळून आला. त्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाला. कुडूर ता. पोलीस येथे गुन्हा दाखल आहे. रामनगरा जिल्ह्यातील मठाच्या खोलीत दोन पानांची मृत्यूची नोंद सापडली.

06:51 October 25

फटाके फोडताना हैदराबादमध्ये किमान दहा जण जखमी

दिवाळीनिमित्त फटाके फोडताना हैदराबादमध्ये किमान दहा जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिव्हिल सर्जन डॉ. नजाबी बेगम म्हणाल्या, काल आमच्याकडे 3 केसेस होत्याय आज आमच्याकडे 10 केसेस आल्या ज्यापैकी 4 केसेस गंभीर आहेत. यापैकी एका मुलाचा डोळा गमवावा लागला आहे आणि इतर 3 वर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

06:21 October 25

चक्रीवादळ सितरंग उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची शक्यता

चक्रीवादळ 'सितरंग' 24 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 वाजता, ढाकापासून 40 किमी पूर्वेला बांगलादेशच्या किनारपट्टीवर केंद्रित होते. ते उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची आणि पुढील 6 तासांमध्ये कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या 6 तासांत ते कमी-दाबाच्या क्षेत्रामध्ये चांगले चिन्हांकित होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

06:19 October 25

पुणे शहरात फटाक्यांच्या आतषबाजीने अनेक ठिकाणी आगीच्या घटना

पुणे: सध्या सर्वत्र दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत असून काल एकाच दिवशी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असल्याने मोठ्या उत्साहात हे दिवस साजरा करण्यात आले. रात्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहरात अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी दुचाकी जळाल्या तर काही ठिकाणी दुकानाला आग लागल्याचा घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाणी घराला आग लागून सर्वच साहित्य जळाले आहे. शहरात झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीने अनेक ठिकाणी आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

06:18 October 25

वॉशिंग्टन हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी

रात्री आम्ही जगभरातील 1 अब्जाहून अधिक लोकांना 'दिना' पेटवण्यासाठी आणि वाईटावर चांगल्यासाठी, अज्ञानावर ज्ञान आणि अंधारावर प्रकाश या लढ्याचा उत्सव साजरा करू, असे अमेरिकेच्या यूएस उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी म्हटले आहे.

06:07 October 25

Breaking news भामरागडमधील जवानांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळी साजरी करणार

मुंबई विरार - विरार पूर्वेच्या गोपचर पाडा येथील एका इमारतीच्या तळ मजल्यावरील गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्री 8. 30 वाजताच्या सुमारास यां परिसरात तरुणांकडून दिवाळीचे फटाके फोडले जात होते. तेव्हा फटाक्याची ठिणगी या बंद गोदामात पोहोचली. गोदामाला भीषण आग लागली. धुराचे मोठे लोळ बिल्डिंगमध्ये पसरल्याने रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते

Last Updated : Oct 25, 2022, 9:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.