ETV Bharat / state

MAHARASHTRA BREAKING : कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गावरील भराव गेला वाहून

author img

By

Published : Jul 27, 2021, 7:27 AM IST

Updated : Jul 27, 2021, 10:13 PM IST

MAHARASHTRA BREAKING
MAHARASHTRA BREAKING आज घडीच्या महत्वाच्या घडामोडी

22:00 July 27

नागपूर - येथील अकॅडमी ऑफ न्यूट्रीशन इम्प्रुव्हमेंटचे अध्यक्ष, आहार तज्ज्ञ, सोयमिल्क मॅन डाॅ. शांतीलाल कोठारी यांचे मंगळवारी नागपुरात निधन झाले. लाखोळी डाळीवरील बंदी उठावी, खुल्या बाजारात विक्री होऊ शकेल, यासाठी डॉ. शांतीलाल कोठारी यांनी चार दशके लढा दिला. मृत्यू समयी ते ७८ वर्षाचे होते. मंगळवारी संध्याकाळी अंबाझरी घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

21:59 July 27

कोल्हापूर - कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गावरील भराव वाहून गेला आहे. पुराचे पाणी ओसरल्याने ठिकठिकाणी भराव वाहून गेल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवस मिरज कोल्हापूर रेल्वे राहणार बंद आहे. एक किलोमीटरवरील भराव वाहून गेला आहे. पुलाचे स्ट्रक्टचरल ऑडिट झाल्यानंतर सेवा सुरळीत होणार आहे. 

21:59 July 27

पोर्नोग्राफी प्रकरण - शिल्पा शेट्टी यांना अद्याप क्लीन चिट देण्यात आलेली नाही. तपासादरम्यान, सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. फॉरेन्सिक ऑडिटर्स नेमले आहेत. ते या प्रकरणात सर्व खात्यांचे व्यवहार तपासतील, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांनी दिली.

18:11 July 27

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच नव्या पुर्नवसन धोरणाची चर्चा करणार आहेत. बैठकीला संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे. 

17:53 July 27

राज कुंद्राचा मुक्काम तुरुंगातच

मुंबई -  राज्य सरकराने राज कुंद्रांच्या उच्च न्यायालयातील जामिनाला विरोध केला आहे. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच कारवाई केल्याचा दावा करण्यात आला आहे. आम्ही याप्रकरणी सर्व कागदपत्र न्यायालयात सादर करू, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. 'आम्ही काही पीडितांचा जबाबही नोंदवला आहे', असेही राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. तर याप्रकरणी एकतर्फी निकाल देऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. राज्य सरकारला राज कुंद्रांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तर याप्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणी 29 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. 

16:07 July 27

भिवंडी शहरात एक मजली इमारत कोसळून दोन जण जखमी

ठाणे - भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात पावसाची रिमझिम सुरू असताना आज दुपारच्या शहरातील झेंडा नाका परिसरात असलेले एक मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून ढिगाऱ्याखाली आणखी दोन जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

दोन कुटूंबाचे संसार मातीच्या ढिगाऱ्याखाली -

भिवंडी शहरातील वाणी आळी भागात झेंडा नाका परिसर आहे. या नाक्यावरच ६० ते ७० वर्षांपूर्वीची एक मजली इमारत आहे. आज अचानक ही इमारत दुपारच्या सुमारास पत्ताच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या दुर्घटनेत ५० वर्षीय सुनीता काळे आणि मुरलीधर काळे (वय ५७) या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून जखमी झाले आहे. घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच, अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. अग्निशमक असून जवानांनी वृद्ध काळे दाम्पत्यांना सुखरूप बाहेर काढले आहे. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या घटनास्थळी ढिगारा हटविण्याचे काम सुरु असून या घटनेत दोन कुटूंबाचे संसार मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून उध्वस्त झाले आहे. 

15:24 July 27

सांगली - पूर परिस्थिती गावांना भेट देत असताना कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील पायलट गाडीचा अपघात झाला आहे. पलूस तालुक्यातील अंकलखोपजवळ हा अपघात झाला. अपघातात पायलट गाडीतील 2 पोलीस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना आष्टामधील रुग्णालयात दाखल केले आहे. दुचाकीस्वार अचानक आडवा आल्याने अपघात घडला. दरम्यान, मंत्री विश्वजित कदम हे सुरक्षित आहेत. 

15:21 July 27

नागपूर - झारखंड सरकार पडण्याच्या षडयंत्रात सहभागी असलेल्या जयकुमार बेलखोडेला सीबीआयने अटक केली होती. काही वर्षांपूर्वी लष्कराचा पेपर फोडल्याप्रकरणी जयकुमार बेलखोडे याला सीबीआयने अटक केली होती. जयकुमार बेलखोडे हा टँगो-चार्ली नामक लष्कर प्रशिक्षण सेंटर चालवत होता. त्याच्या प्रशिक्षण सेंटरमध्ये काम करणाऱ्या युवकांना लष्करात भरती करण्याचे आमिष तो देत असल्याची माहिती समोर आली आहे. 

13:06 July 27

पॉर्नोग्राफी प्रकरणमध्ये राज कुंद्रा याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

 मुंबई - पॉर्नोग्राफी प्रकरणमध्ये राज कुंद्रा याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. किला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

12:42 July 27

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे दौऱ्यावर; कार्यकर्तांशी साधणार मुक्तसंवाद

ठाणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाणे दौऱ्यावर आले आहे. यावेळी ते कार्यकर्तांशी मुक्तसंवाद साधणार आहेत.

11:53 July 27

मोठे नेते आणि थेट संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागातील दौरा करणे टाळावे - शरद पवार

मुंबई - येथे शरद पवार यांची पत्रकार परिषदेत सांगितले की, राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट 16 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप करण्यात येणार आहे. या कीटमध्ये मास्क, भांडे, औषधे, अन्नधान्य दिले जाणार आहे. अतीवृष्टीमुळे राज्यात मोठे नुकसान झाले आहे. राज्यपाल या भागात दौरा करत आहेत ते राज्याला जास्त मदत मिळवून देतील असे म्हणत ज्यांचा दैनदिन संबंध नाही त्यांनी त्या भागात दौरे टाळावेत असा टोलाही शरद पवार यांनी लगावला आहे. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यांनी जनतेला धीर मिळत असतो, असे सांगितले. 

11:43 July 27

राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट 16 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप करणार

मुंबई - राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट 16 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप करणार आहे. असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्पष्ट केले आहे. पूरग्रस्त भागात वैद्यकीय पथकही पाठवणार असल्याचे सांगितले. 

10:41 July 27

महाराष्ट्रातील मंत्र्यांनी केंद्रातून येतांना 2 हजार कोटींचा चेक आणावा - संजय राऊतांचा सल्ला

मुंबई - महाराष्ट्र सरकार सक्षम आहे, आपल्या जनतेला सर्व प्रकारचे सहाय्य आणि मदत करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी तसे आदेश दिलेले आहेत. पण केंद्राची जबाबदारी आहे की केंद्राला सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राला मदत करावी. आम्ही काय आता हिशोब मागायला बसलो नाही पण केंद्र आमचा बाप आहे. महाराष्ट्रातले काही मंत्री केंद्रामध्ये आहेत, त्यांनी काही घोषणा केलेली आहेत. त्यांनी येताना केंद्राकडून दोन हजार कोटीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सही असलेला एखादा चेक घेऊन यावे. जर तो त्यांनी आणला तर नक्की आम्ही त्यांचे वाजतगाजत स्वागत करू आणि कोकण आणि सातारा, सांगलीच्या जनतेला तो सुपूर्त करू असा सल्ला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. 

10:23 July 27

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी रायगडकडे रवाना

मुंबई - राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज (मंगळवार) रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. राज्यपाल हे त्यांच्या दौऱ्या दरम्यान तळई गाव आणि चिपळूण या पूरग्रस्त भागाला भेट देणार आहेत.

राज्यपाल कोश्यारी हे मुंबई येथुन रायगडकडे रवाना झाले आहेत ते दुपारी 1.15 वाजता हेलिकॉप्टरने रायगड येथून रत्नागिरीला येणार आहेत. दुपारी 2.45 वाजता ते चिपळूण येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. यावेळी ते येथील नागरिकांशी संवाद देखील साधणार आहेत. तर दुपारी 3.45 वाजता चिपळूण येथून दाभोळकडे रवाना होणार आहेत. ते येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे जाणार आहेत.

08:08 July 27

अजित पवार कोल्हापुरात दाखल; शिरोळ येथील पूरग्रस्त नागरिकांशी साधला संवाद

कोल्हापूर - अजित पवार हे कोल्हापुरात दाखल झाले असून त्यांनी शिरोळमधून पूरग्रस्त भागातील पाहणीला सुरूवात केली आहे. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. कोल्हापूरातील शिवाजी पुलाची पाहणी करण्यासाठी ते शिरोळ येथून रवाना झाले आहे. 

06:16 July 27

MAHARASHTRA BREAKING : अजित पवार यांचा कोल्हापूर पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा

कोल्हापूर - उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची आज (मंगळवार) पाहणी करणार आहेत. शिरोळ पूरग्रस्त पाहणी दरम्यान ते पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधणार आहेत. सकाळी अकरा वाजता जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. आढावा बैठकीनंतर शासकीय विश्रामगृह येथे त्यांची पत्रकार परिषद होईल. 

Last Updated : Jul 27, 2021, 10:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.