ETV Bharat / state

Breaking News: लष्कर ए खालसा दहशतवाद्यांची भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्यासह कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी

author img

By

Published : Jan 5, 2023, 7:28 AM IST

Updated : Jan 5, 2023, 8:26 PM IST

Maharashtra Breaking News
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

20:23 January 05

Breaking News: लष्कर ए खालसा दहशतवाद्यांची भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्यासह कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी

मुंबई - लष्कर ए खालसा दहशतवाद्यांनी भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिली. लष्कर-ए-खालसाने यापूर्वी आपल्या दहशतवादी कारवाया वाढवल्या आहेत. लष्कराकडून पुष्टी केल्यावर असे आढळून आले की पंजाब भाजपशी संबंधित अनेक नेत्यांनाही खलिस्तानी दहशतवाद्यांकडून धमकी देण्यात आली आहे.आज सकाळी एका खलिस्तानी दहशतवाद्याने भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना व्हॉट्सअॅपवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या मेसेजद्वारे संदीप सिंग नावाच्या खलिस्तानी व्यक्तीने तेजिंदर सिंग तिवाना यांना धमकी दिली आहे.

19:54 January 05

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी फ्रान्सचा भारताला पाठिंबा

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी फ्रान्सने भारताला पाठिंब्याचा पुनरुच्चार केला आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार इमॅन्युएल बोन यांनी ही बाब स्पष्ट केली आहे.

19:15 January 05

1 जानेवारी 2024 रोजी राम मंदिर तयार होईल - अमित शाह

केंद्रिय गृहमंत्री अमित शहांनी त्रिपुरामध्ये मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले आहेत की 1 जानेवारी 2024 रोजी राम मंदिर तयार होईल.

18:57 January 05

मानखुर्द भागातील शाळेच्या शौचालयात सापडला तरुणाचा मृतदेह

मुंबई - मानखुर्द भागातील एका शाळेच्या शौचालयात मुंबई पोलिसांना १८ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला आहे मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

18:54 January 05

योगी आदित्यनाथ यांनी घेतली मुकेश अंबानी यांची भेट

मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हॉटेल ताज येथे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांची भेट घेतली.

18:40 January 05

माणिकराव ठाकरे यांची तेलंगणा काँग्रेसच्या प्रभारी पदावर नियुक्ती

नवी दिल्ली - माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची तेलंगणा काँग्रेसच्या प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तेलंगाणातील काँग्रेसला मजबुती आणण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

18:26 January 05

योगी हे महाराष्ट्राला काहीतरी देऊन जातील - बावनकुळे

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्रातून काहीही घेऊन जाणार नाहीत. तर योगी हे महाराष्ट्राला काहीतरी देऊन जातील असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. योगींच्या महाराष्ट्र दौऱ्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

18:22 January 05

लांडग्याच्या हल्ल्यात 4 शेळ्या मृत्युमुखी तर 9 शेळ्या जखमी

येवला - लांडग्याच्या हल्ल्यात 4 शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. तर 9 शेळ्या जखमी झाल्याची घटना येवला तालुक्यातील धुळगावात घडली आहे. येथील दिगंबर जगताप यांच्या शेळ्यांवरती रात्रीच्या सुमारास लांडग्याने हल्ला करुन 4 शेळ्या ठार केल्या तर 9 शेळ्या जखमी केल्या आहेत. या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जखमी शेळ्यांवर उपचार देखील करण्यात आले.

17:35 January 05

रिदा राशीद यांच्या विरोधात तक्रार देणाऱ्या तक्रारदारांना धमकी

ठाणे - रिदा राशीद यांच्या विरोधात तक्रार देणाऱ्या तक्रारदारांना धमकी देण्यात आली आहे. तक्रारदार महिला कोर्टात जबाब देण्यासाठी गेल्या असताना रिदा राशीद आणि त्यांच्या माणसांनी तक्रार मागे घेण्यासाठी व जबाब बदलण्यासाठी धमकी दिली. यापुढे जीवाला काही धोका झाल्यास तक्रारदार महिलांनी रिदा राशीद यांना जबाबदार असल्याचे सांगितले. तसेच झालेल्या अत्याचारमुळे मला गंभीर रोग झाला असल्याची देखील तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे.

17:31 January 05

पोलिसांच्या गणवेश भत्त्यात एक हजार रुपयांची वाढ

मुंबई - राज्यातील पोलिसांच्यासाठी खुशखबर आहे. पोलिसांच्या गणवेश भत्त्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पोलिसांना दरवर्षी पाच हजार रुपये गणवेश भत्ता मिळत होता. पोलिसांना आता दरवर्षी सहा हजार रुपये गणवेश भत्ता मिळणार आहे.

17:15 January 05

वांद्रे येथील अनिल परब यांचे कार्यालय अनधिकृत

मुंबई - वांद्रे येथील अनिल परब यांचे कार्यालय अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कार्यालय अधिकृत करण्यासाठी परब यांनी मागणी केली होती. म्हाडाने ही मागणी फेटाळून लावली आहे.

17:04 January 05

ठाण्यात तीन 'बनावट' डॉक्टरांवर गुन्हा दाखल

ठाणे - वैध वैद्यकीय पदवी नसताना डॉक्टर म्हणून काम करून रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भिवंडी शहरातील तिघांना नोटिसा बजावण्यात आल्या असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे ते म्हणाले. तीन आरोपी, 46 ते 52 वयोगटातील, वैध वैद्यकीय पदवीशिवाय ते पेशंट तपासत होते. असे पोलिसांनी सांगितले आहे. एका प्रसिद्धीमध्ये म्हटले आहे.

17:00 January 05

पालघरमध्ये सव्वादोन लाखांना चिमुरड्याला विकणाऱ्या चौघांना अटक

पालघर - एका दोन वर्षांच्या मुलाला त्याच्या आई-वडिलांच्या गरिबीचा फायदा घेऊन 2.35 लाख रुपयांना विकल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट III चे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद बडाख यांनी सांगितले की, दोन महिलांसह एक जोडपे आणि इतर पाच जण 27 डिसेंबर रोजी मुलाच्या पालकांशी संपर्क साधून त्याला घेऊन गेले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

16:57 January 05

किशोरवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कारप्रकरणी निर्दोष मुक्तता

ठाणे - विशेष न्यायालयाने 2016 मध्ये एका 15 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. येथील कळवा येथून मुलीचे अपहरण करून तिला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे नेऊन तिच्यावर बलात्कार करून गर्भधारणा केल्याप्रकरणी या व्यक्तीवर भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यातील तरतुदीनुसार आरोप ठेवण्यात आले होते.

16:15 January 05

महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही - चित्रा वाघ

मुंबई - महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. उर्फी जावेद प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी सुनावले आहे. उर्फी जावेदची वृत्ती विकृत आहे. तोकडे कपडे घालून अंग प्रदर्शन कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. उर्फीला विरोध नाही तिच्या अंग प्रदर्शनाला विरोध आहे, असे त्या म्हणाल्या.

15:48 January 05

वेणूगोपाल धूत यांची अटक योग्यच, मुंबई सत्र न्यायालयाचा दणका

मुंबई - आयसीआयसी बँक लोन घोटाळा प्रकरणी व्हिडिओकॉन ग्रुपचे व्यवस्थापक वेणूगोपाल धूत यांना मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. वेणूगोपाल धूत यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. सीबीआयकडून अनधिकृतरित्या अटक करण्यात आले असल्याचे मत मांडून या विरोधात याचिका दाखल केली होती. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने याचिका फेटाळली आहे. सीबीआयने केलेली अटक कायदेशीर असल्याचा निर्णय न्यायाधीश एम. आर. पुरवार यांनी दिला.

12:25 January 05

आदित्यनाथ यांनी मुंबईतून उद्योगधंदे पळवण्याऐवजी यूपीमध्ये विकसित करावे - दलवाई

मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतून उद्योगधंदे पळवण्याऐवजी यूपीमध्ये उद्योग विकसित केले पाहिजेत. उद्योग हे आधुनिकतेचे प्रतीक असल्याने भगवे कपडे न घालता त्यांनी आधुनिक कपडे घालावे, असा सल्ला काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी त्यांना दिला आहे.

12:20 January 05

देवेन भारती यांनी मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला

मुंबई - आयपीएस अधिकारी देवेन भारती यांनी मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे.

12:07 January 05

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानसेवा सुरू होताच प्रवाशांचे जंगी स्वागत

पणजी : मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज विमानसेवा सुरू होताच प्रवाशांचे जंगी स्वागत करण्यात आले. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आणि आज येथे व्यावसायिक विमान उतरले आहे. यामुळे येथील अर्थव्यवस्थेला आणि पर्यटनाला चालना मिळेल, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

11:40 January 05

भिवंडीत अग्नितांडव; लेदर बॅग कारखानाला भीषण आग

ठाणे : भिवंडी ग्रामीण मधील गोदाम पट्ट्यासह शहरी भागातील कारखान्यांसह गोदामना आगी लागण्याचे सत्र सुरु असून आज पुन्हा लेदर बॅग तयार करणाऱ्या कारखानाला भीषण आग लागून अग्नितांडव घडले आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील ओवळे गावातील सागर कॉम्प्लेक्स गोदाम संकुलात बॅग तयार करणाऱ्या कारखान्यात घडली असून भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र या आगीच्या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले.

11:36 January 05

विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा रद्द

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा रद्द करण्यात आला आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने दौरा रद्द करण्यात आल्याचे समजते

11:07 January 05

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात जवळपास 700 जणांना विषबाधा

औरंगाबाद - एक धक्कादायक घटना समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात जवळपास 700 जणांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. जेवणातून झालेल्या विषबाधेमुळे 700 जणांची प्रकृती बिघडली असून सर्वांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाचा बुधवारी लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांचे पुत्र सय्यद जुबेर यांचा विवाहसोहळा बुधवारी औरंगाबादमध्ये पार पडला. यावेळी मुलीकडच्या लोकांनी आलेल्या पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची मेजवानी केली होती. मात्र याचवेळी लग्नात बनवण्यात आलेल्या स्वयंपाकातून लोकांना विषबाधा झाली. काही वेळात अनेकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 700 जणांना विषबाधा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. तर त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु होते, त्यात काही रुग्णांना रात्रीच उपचार देऊन सोडण्यात आले आहे.

10:00 January 05

राजकारणाचे धंदे बंद करा-संजय राऊत यांची योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका

योगी आदित्यनाथ मुंबईत रोड शो करत आहेत का? राजकारणाचे धंदे बंद करा. येथे येऊन राजकीय धंदे करू नका. मुंबईतील फिल्मसिटी संपूर्ण देशाची आहे. आमचे उद्योग ओरबाडून घेणार असल्यास आक्षेप आहे. सन्मानाने या आणि सन्मानाने जा, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

09:23 January 05

दिल्लीत सर्वात कमी तापमानाची नोंद

दिल्लीच्या सफदरजंगमध्ये आज किमान तापमान ३ अंश सेल्सियस नोंदवले गेले. या हंगामात दिल्लीतील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.

09:11 January 05

अॅमेझॉन 18,000 हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकणार

आर्थिक अनिश्चिततेचे कारण देत अॅमेझॉन 18,000 हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकणार आहे

08:39 January 05

गरीब शेतकरी आणि मजुरांची मुले हिवाळ्यात स्वेटर, जॅकेटशिवाय का फिरतात? माध्यमे विचारत नाहीत-राहुल गांधी

मी टी-शर्ट घालून (भारत जोडो) यात्रेत फिरतो. माझ्यासोबत अनेक गरीब शेतकरी आणि मजुरांची मुले फाटके कपडे घालून यात्रेत जातात. पण माध्यमे विचारत नाहीत की गरीब शेतकरी आणि मजुरांची मुले हिवाळ्यात स्वेटर/जॅकेटशिवाय का फिरतात?

08:38 January 05

केंद्राकडून अबू उस्मान अल-काश्मिरीची दहशतवादी म्हणून घोषणा

केंद्राने अहमद अहंगर उर्फ अबू उस्मान अल-काश्मिरीला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. श्रीनगरमध्ये जन्मलेला दहशतवादी सध्या अफगाणिस्तानमध्ये आहे आणि इस्लामिक स्टेट जम्मू आणि काश्मीर (ISJK) च्या मुख्य भर्ती करणार्‍यांपैकी एक आहे:

07:52 January 05

मोपा विमानतळाची आज देशांतर्गत सेवा सुरू होणार

डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मोपा विमानतळाची आज देशांतर्गत सेवा सुरू होणार आहे.

06:50 January 05

Breaking News : योगी आदित्यनाथ मुंबईतील उद्योगांना करणार का आकर्षित? आज सकाळी साडेअकरा वाजता करणार रोड शो

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबईत सकाळी साडेअकरा वाजता रोड शो होणार आहे. टाटा ग्रुप रिलायन्स ग्रुप आदित्य बिर्ला ग्रुप, महिंद्रा ग्रुप गोदरेज ग्रुप अशा नामांकित समूहाच्या प्रतिनिधींशी योगी आदित्यनाथ भेट घेणार आहेत. ग्लोबल इन्वेस्टर समिट उत्तर प्रदेशमध्ये १० ते १२ जानेवारीला लखनऊ येथे होणार आहे. त्यावेळी या सर्व उद्योजकांना उत्तर प्रदेशमध्ये येण्याचे आमंत्रण त्यांच्याकडून दिले ( Global Investor Summit Uttar Pradesh ) जाईल.

Last Updated :Jan 5, 2023, 8:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.