Marathi Breaking News : श्रीकांत शिंदेंच्या मतदार संघावर भाजपचा डोळा; सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट

author img

By

Published : Feb 12, 2023, 6:35 AM IST

Updated : Feb 12, 2023, 10:58 PM IST

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra breaking news ()

22:57 February 12

श्रीकांत शिंदेंच्या मतदार संघावर भाजपचा डोळा; सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट

सातारा - खासदार श्रीकांत शिंदे यांचाच मतदार संघ राहील की नाही याची चिंता आहे. भाजप तो मतदार संघ काढून घ्यायला टपली आहे, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे गटाच्या फायर ब्रॅंड नेत्या सुषमा अंधारे यांनी पाटण तालुक्यातील मल्हारपेठमधील सभेत बोलताना केला. पाटण विधानसभेच्या मागील निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी तुमच्यासाठी सभा घेतली म्हणून तुम्ही निवडून आलात. मुळात येत्या निवडणुकीत पाटणची जागा लढवायला तरी मिळेल का? असा सवाल करत सुषमा अंधारेंनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे टेन्शन वाढवले आहे.

21:26 February 12

आयआटीच्या विद्यार्थ्याची हॉस्टेलवरून उडी मारून आत्महत्या

मुंबई - आयआटीच्या विद्यार्थ्याने हॉस्टेलवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. मृत हा मूळचा अहमदाबादचा असून तो बीटेक (केमिकल) अभ्यासक्रमाचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता.

21:00 February 12

शासकीय, निमशासकीय कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संपावर जाणार

मुंबई - राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.

20:20 February 12

पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 25 लाखांच्या मदतीची घोषणा

मुंबई - पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येनंतर राज्य शासनाने कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. तसेच, कुटुंबाला 25 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा, पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. तसेच मुलाला कायमस्वरूपी नोकरीची हमी सामंत यांनी यावेळी दिली.

18:22 February 12

बाळासाहेब थोरातांची बाजू ऐकून घेतली - एच के पाटील

बाळासाहेब थोरातांची बाजू ऐकून घेतली - एच के पाटील

थोरात-एच के पाटील यांच्यातील बैठक संपली

गैरसमज दूर करणार- पाटील

बाळासाहेब रायपूर अधिवेशनाला उपस्थित राहणार

17:46 February 12

मुंब्र्यात बॅनरबाजीवरून शिंदे आणि आव्हाड समर्थक आमनेसामने

मुंब्र्यात बॅनरबाजीवरून शिंदे आणि आव्हाड समर्थक आमनेसामने

एकमेकांचे बॅनर्स काढण्यावरुन आपसात बाचाबाची

पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत वाद टाळला

विकासकामांच्या उद्घाटनाचा कर्यक्रम निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि शिंदे समर्थकांनी लावलेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर्स

त्याला उत्तर म्हणून जितेंद्र आव्हाड समर्थकांकडूनही लावण्यात आले बॅनर्स

त्यावरूनच दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांत किरकोळ बाचाबाची झाली..मात्र तात्काळ पोलिसानी दोन्ही बाजूचया कार्यकर्त्याना समजावून शांत केलं. मात्र बॅनर्स आहेत त्याच ठिकाणी लावण्यात आले आहेत. कोणाचेही बॅनर्स काढण्यात आले नाहीत..

17:30 February 12

तृतीयपंथी उमेदवारांना सरावासाठी 15 ते 20 दिवस देण्यात यावेत, आर्या पुजारी यांची मागणी

मुंबई : महाराष्ट्र राज्यात प्रथमच तृतीयपंथीयांना पोलीस भारतात सामावून घेण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून 73 तृतीयपंथींनी राज्यातील पोलीस दलातील भरतीसाठी अर्ज दाखल केले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू देखील झाली आहे. दरम्यान, तृतीयपंथी उमेदवारांना सरावासाठी 15 ते 20 दिवस देण्यात यावेत, अशी मागणी आर्या पुजारी यांनी केली आहे.

16:04 February 12

भगतसिंह कोश्यारींनी राज्यपाल पदाची गरीमा नष्ट केली - पृथ्वीराज चव्हाण

सातारा - राज्यपालांवर कधीही टीका-टीपण्णी होत नाही. कोणी आक्षेप घेत नाही. परंतु, भगतसिंह कोश्यारी त्याला अपवाद ठरले. त्यांनी राज्यपाल पदाची गरीमा नष्ट केली, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. तसेच इतके दिवस राज्यपालांचा राजीनामा का स्वीकारला नाही, याचे उत्तर केंद्रातील मोदी सरकारने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

15:40 February 12

भांडूप भागात घराचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

मुंबई - भांडूप भागात घराचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे. अग्निशामन दलाने याबाबतची माहिती दिली आहे.

15:39 February 12

मुंबईत 14 वर्षीय मुलीवर बलात्कार; काकासह चुलत भावाला अटक

मुंबई - मुंबई पोलिसांनी 14 वर्षीय मुलीच्या काका आणि चुलत भावाला तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. याबाबतची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी दिली आहे. ही घटना 2014 ते सप्टेंबर 2022 दरम्यान बोरिवली येथे घडली.

15:39 February 12

बदलापूर एमआयडीसीमध्ये गगनगिरी फार्मा केमिकल कंपनीला भीषण आग

बदलापूर एमआयडीसीमध्ये गगनगिरी फार्मा केमिकल कंपनीला भीषण आग

घटनास्थळी अग्निशामनच्या पाच गाड्या दाखल, आगीवर नियंत्रण मिळण्याचे काम सुरू

15:17 February 12

बुलडाण्याजवळ ट्रक व मेटाडोरची समोरासमोर धडक; 3 ठार, 1 गंभीर

+बुलडाणा - जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील तांदुळवाडी पुलावर विटांनी भरलेल्या मेटाडोर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 3 जण ठार झाले असून, 1 जण गंभीर जखमी झाला आहे. जखमींना तात्काळ मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे.

14:20 February 12

संजय राऊत हे १०० दिवसात जेलमध्ये राहणाऱ्या कैद्यांची भाषा शिकून आले-चंद्रशेखर बावनकुळे

खासदार संजय राऊत शिवराळ भाषा बोलतात. १०० दिवसात जेलमध्ये राहणाऱ्या कैद्यांची भाषा शिकून आल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

14:19 February 12

शिवसेनेच्या दहिसर येथील उपविभाग संघटक दीपा पाटील यांचा भाजपात प्रवेश

शिवसेनेच्या दहिसर येथील उपविभाग संघटक दीपा पाटील यांचा भाजपात प्रवेश झाला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेपूर्वीच शिवसेनेला खिंडार पडले आहे. शिवसेनेतील फुटी नंतर पक्ष सोडणाऱ्यांची संख्या वाढली आहे

14:18 February 12

संजय राऊत स्वतः शरद पवार व बिल्डरांचे एजंट- अतुल भातखळकर

संजय राऊत स्वतः शरद पवार व बिल्डरांचे एजंट आहेत. त्यामुळे त्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

12:23 February 12

भांडुप खिंडीपाडा येथे एक घर कोसळून दोन जणांचा मृत्यू

मुंबई - भांडुप खिंडीपाडा येथे एक घर कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या पैकी दोन्ही व्यक्ती १८ ते १९ वयाचे युवक असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भांडुप खिंडीपाडा डंकन लाईन रोड, क्रांती मित्र मंडळ येथील तळ अधिक एक मजली घराच्या दुरुस्तीचे काम सुरू होते.

11:49 February 12

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील जेष्ठ नेते व माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. ठाणे मनपा प्रभाग क्रमांक 6 मधील सर्वच 4 माजी नगरसेवक राष्ट्रवादीला सोडून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे शिवाईनगरमधील माजी नगरसेवक दिवंगत माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलोचना चव्हाण यादेखील देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित जाहीर प्रवेश करणार आहेत.

11:38 February 12

भाजपने राज्यपालांकडून राज्याची बदनामी केली-नाना पटोले

भाजपने राज्यपालांकडून राज्याची बदनामी केली. कोश्यारी पक्षपात करणारे राज्यपाल होते, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

11:34 February 12

राज्यपालपदाची जबाबदारी मी कार्यक्षमतेने कार्यक्षमतेने पार पडणार-गुलाबचंद कटारिया

पक्षाने माझ्यावर जेव्हा-जेव्हा कोणतीही जबाबदारी दिली आहे, तेव्हा ती मी मेहनतीने पार पाडली आहे. राज्यपालपदाची जबाबदारी मी कार्यक्षमतेने आणि कोणताही पक्षपात न करता पार पाडणाक आहे. आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल राजस्थान एलओपी आणि भाजप नेते गुलाबचंद कटारिया यांनी म्हटले आहे.

11:34 February 12

पंतप्रधानांच्या उपस्थितीत महर्षी दयानंद सरस्वती यांची जयंती साजरी

महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले.

11:08 February 12

हत्तीरोग व कुष्ठरोग आजाराला हद्दपार करण्यासाठी सहकार्य करा- डॉ हिमानी मानकर

वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतोरा अंतर्गत विविध गावात हत्तीरोग व कुष्ठरोग जनजागरण मोहीम राबवली जात आहे. त्या अनुषंगाने ११/२/०२३ रोजी किन्हाळा जैतापूर चित्तूर तळेगाव बेलोरा इत्यादी विविध गावात येथे जिल्हा परिषद प्राथमिक प्राथमिक शाळेच्या सहकार्याने जनजागरण रॅली काढण्यात आली. त्यात मार्गदर्शन करताना प्राथमिक आरोग्य केंद्र अंतोरा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ हिमानी मानकर यांनी हत्तीरोग व कुष्ठरोग आजाराला हद्दपार करण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन केले.

10:35 February 12

राज्यपाल बदलणे हे महाराष्ट्रावर उपकार नाही-संजय राऊत

राज्यपाल बदलणे हे महाराष्ट्रावर उपकार नाही, अनेक राज्यपाल बदलले आहेत. शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील लोक राज्यपाल बदलण्याची मागणी करत होते, त्याला एक वर्ष होत आहे, असे खासदार संजय राऊत म्हटले आहे.

10:30 February 12

हडपसर पोलिस ठाण्याच्या आवारातच जावयाकडून सासुवर हल्ला

पुणे : सासुवरच जावयाने पाया पडायचे म्हणत चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या आवारात घडला आहे.कौटुंबिक हिंसाचाराची फिर्याद देण्यासाठी मुलीबरोबर हडपसर पोलिस ठाण्यात आलेलं असताना हा प्रकार घडला आहे. पोलीस उपनिरीक्षकाने जावयाला वेळीच रोखल्याने मोठी हानी टळली. या सर्व प्रकारात सासूच्या गालाला जखम झाली आहे. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

10:21 February 12

कोश्यारी यांनी भाजपचे एजंट म्हणून काम केले-संजय राऊत

राज्यपालांनी भाजपचे एजंट म्हणून काम केले. महाविकास आघाडीच्या अनेक शिफारसी नाकारल्या आहेत. राज्यपाल कोश्यारी यांच्यावर गृहमंत्रालयाकडून दबाव होता. त्यांच्याबद्दल जनतेच्या मनात संताप आहे. नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम केले तर त्यांचे स्वागत असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

10:09 February 12

सर्वोच्च न्यायालय त्यांच्या बाजूने निकाल देतील असा दावा करणारे देवेंद्र फडणवीस कोण आहेत-संजय राऊत

गैर-संस्थांच्या म्हणण्याकडे माननीय सर्वोच्च न्यायालय किंवा निवडणूक आयोग लक्ष देत नाही. सत्याचा विजय होईल. माननीय सर्वोच्च न्यायालय त्यांच्या बाजूने निकाल देतील असा दावा करणारे देवेंद्र फडणवीस कोण आहेत? निवडणूक आयोग शिंदेंना शिवसेनेचे चिन्ह देणार म्हणणारे नारायण राणे कोण आहेत, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला.

09:58 February 12

घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली -जयंत पाटील

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

09:42 February 12

महिलेची सोनसाखळी लुटून तिच्यावर चाकूने वार

मुंबईतील फ्लॅटमध्ये दोघेजण तंत्रज्ञ असल्याचे भासवून महिलेची सोनसाखळी लुटून तिच्यावर चाकूने वार करण्यात आले. मध्य मुंबईतील परळ येथे दोन पुरुषांनी तिच्या फ्लॅटमध्ये घुसून तिची सोनसाखळी लुटण्यापूर्वी चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक 59 वर्षीय महिला जखमी झाली, असे पोलिसांनी सांगितले. वायफाय कनेक्शन दुरुस्त करण्यासाठी तंत्रज्ञ असल्याचे भासवून ती एकटी असताना शुक्रवारी संध्याकाळी या दोघांनी तिच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला.

09:35 February 12

देशात १३ राज्यपालांसह उपराज्यपाल बदलले!

देशात १३ राज्यपालांसह उपराज्यपाल बदलले. यामध्ये भगतसिंह कोश्यारी यांचादेखील समावेश आहे.

09:32 February 12

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी रमेश बैंस यांची निवड

रमेश बैंस यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी निवड करण्यात आली आहे.

09:16 February 12

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यापूर्वीच त्यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

08:45 February 12

भारतीय हवाई दलाचे आणखी एक विमान सीरिया आणि तुर्कीला रवाना

आणखी एक IAF C-17 विमान काल रात्री मदत सामग्री आणि आपत्कालीन उपकरणे घेऊन सीरिया आणि तुर्कीसाठी रवाना झाले. दक्षिण तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे मृतांची संख्या आता 28,000 झाली आहे.

08:04 February 12

१४ वर्षीय मुलीवर मामासह चुलत भावाने केला बलात्कार, २४ तासात दोन्ही आरोपींना अटक

बोरिवली येथे एका १४ वर्षीय मुलीवर तिच्या मामा आणि चुलत भावाने बलात्कार केला. पोलिसांनी २४ तासांत दोन्ही आरोपींना अटक केली.

07:54 February 12

अधिक कठीण पर्याय निवडणे अधिक धाडसी असते-सरन्यायाधीश

मी तुम्हाला चेतावणी दिली पाहिजे. काहीही न बोलणे किंवा न करणे हा कदाचित सुरक्षित किंवा कमी जोखमीचा पर्याय आहे. परंतु अधिक कठीण पर्याय निवडणे अधिक धाडसी असल्याचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटले आहे.

06:47 February 12

तुर्कस्थामध्ये लुटल्याप्रकरणी ४८ जणांना अटक

तुर्कस्तानमध्ये भूकंपानंतर लुटल्याप्रकरणी ४८ जणांना अटक करण्यात आली आहे.

06:46 February 12

भूकंपातील मृतांची संख्या 28 हजारांहून अधिक जास्त

तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपातील मृतांची संख्या 28,000 च्या पुढे गेली आहे.

06:46 February 12

दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंती सोहळ्याचे पंतप्रधान करणार उद्घाटन

दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंती सोहळ्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत.

06:27 February 12

Breaking News in Maharahstra : सरकारच्या तिजोरीत खडखडाट

मुंबई : येत्या २७ फेब्रुवारीपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. पाच आठवड्याच्या अधिवेशनात सहा महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या सरकारकडे जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. राज्याला कोरोनाचा विळखा पडल्यापासून सरकारची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. केंद्राकडे असलेली सुमारे ३० हजार कोटीची जीएसटी थकबाकी आहे. मंदावलेली अर्थव्यवस्था आणि टाळेबंदी यामुळे कर संकलनावर परिणाम झाल्याने सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे.

Last Updated :Feb 12, 2023, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.