ETV Bharat / state

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत आज सुट्टी जाहीर, अनुयायांसाठी रेल्वेकडून देण्यात येणार 'या' विशेष सेवा!

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 7:10 AM IST

Updated : Dec 6, 2023, 6:36 AM IST

dr babasaheb ambedkar mahaparinirvan divas special facilities from central railway
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वेची विशेष सेवा

Mahaparinirvan Divas Special Facilities : देशभरातून मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस्थळास अभिवादन करण्यासाठी 6 डिसेंबर रोजी लाखो अनुयायी येतात. या सर्व प्रवाश्यांसाठी पाच डिसेंबर ते सहा डिसेंबर दादर आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकांवर दोन अतिरिक्त यूटीएस काउंटर उघडले जात आहेत. तसंच मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईकडून जाणाऱ्या 12 अतिरिक्त उपनगरीय लोकल सेवादेखील चालवल्या जाणार आहेत.

मुंबई Mahaparinirvan Divas Special Facilities : 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर आणि चैत्यभूमी या ठिकाणी युटीएस विशेष काउंटर सुरू करण्यात आले आहेत. त्याशिवाय दोन हेल्प डेक्सदेखील सुरू करण्यात आलेत. दादरच्या फलाट क्रमांक 6 आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस चा फलट क्रमांक 1 या ठिकाणी प्रवाश्यांना मार्गदर्शन आणि तिकिटासंदर्भात माहिती देण्यासाठी युटीएस काउंटर सुरू राहतील. दुसरीकडे महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या मुंबईत शासकीय आणि महापालिका कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारनं ही सुट्टी जाहीर केली आहे.

  • Various arrangements made at Dadar station for Mahaparinirvan din-

    1) Enquiry counter & UTS counter at Chaityabhoomi site from 5/12/23
    2) 2 extra UTS counters each at Dadar & CSMT stations from 5/12/23
    3) 18 long distance special train services from 4/12/23 to 7/12/23
    4) 12… pic.twitter.com/FQT6lTBszU

    — Central Railway (@Central_Railway) December 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रेल्वेकडून वैद्यकीय पॅरा मेडिकल स्टाफ तैनात : मध्य रेल्वेच्या मुंबई दादर, कल्याण, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी प्रवाशांच्या मदती करता पॅरामेडिकल स्टाफ 5 आणि 6 डिसेंबर रोजी 24 तास तैनात केले जातील. तर दादर रेल्वे स्थानकात 24 तास रुग्णवाहिका उभी राहणार आहे. जेणेकरून अनुयायींना कोणतीही आरोग्य विषयक समस्या जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सेवा याद्वारे दिली जाईल.


"मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं दादर रेल्वे स्थानकाच्या परिसरात तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करून देण्यात आलीय. त्यामुळं नागरिकांनी त्याचा वापर करावा"- डॉ. शिवराज मानसपुरे,मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे



जनतेच्या सुरक्षासाठी रेल्वे पोलीस दल तैनात : मध्य रेल्वेनं जनतेच्या सुरक्षेसाठी 5 आणि 6 डिसेंबर रोजी गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी रेल्वे पोलीस फोर्स यांना तैनात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 24 तास छत्रपती शिवाजी टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, दादर या ठिकाणी अतिरिक्त रेल्वे पोलीस दल तैनात केले जाणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेमार्फत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 6 डिसेंबर रोजी देशभरातून लाखो अनुयायी येतात. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेमार्फत अनुयायांना विश्रांतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात आलाय. तसंच आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय म्हणून परिसरातील महानगरपालिकेच्या सहा शाळा निश्चित करण्यात आल्यात. या शाळांमध्ये आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा सुसज्‍ज ठेवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा -

  1. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या 12 विशेष लोकल; जाणून घ्या वेळापत्रक
  2. महापरिनिर्वाण दिन - अनुयायांना सेवा सुविधेसाठी पालिकेचे ५ हजार कर्मचारी कार्यरत
  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन; मध्य रेल्वे 14 विशेष ट्रेन चालवणार; जाणून घ्या वेळापत्रक
Last Updated :Dec 6, 2023, 6:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.