ETV Bharat / state

Liquor Bottles NMMC : मुख्यालय की 'मंदिरा'लय? नवी मुंबई मनपा मुख्यालयात दारूच्या बाटल्यांचा खच

नवी मुंबईच्या बेलापूर येथील मुख्यालयाच्या (NMMC Belapur Headquarters) बेसमेंटमध्ये दारूच्या पार्ट्या (Alcohol Parties) रंगत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यालयाच्या बेसमेंटमध्ये चक्क दारूच्या बाटल्यांचा खच (Liquor bottles piled up) सापडलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मनपा मुख्यालय हादरून गेले आहे. latest news about NMMC

Liquor bottles piled up NMMC
दारूच्या बाटल्यांचा खच
author img

By

Published : Nov 18, 2022, 6:35 PM IST

Updated : Nov 18, 2022, 7:45 PM IST

नवी मुंबई : नवी मुंबईचा गाडा ज्या मनपा मुख्यालयातून हाकला जातो, त्या बेलापूर येथील मुख्यालयाच्या (NMMC Belapur Headquarters) बेसमेंटमध्ये दारूच्या पार्ट्या (Alcohol Parties) रंगत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिका मुख्यालय म्हटले की, सगळ्यांच्या डोळ्यांसमोर चोख सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्त येतो. सर्वसामान्यांची तपासणी केल्याशिवाय महापालिकेत कोणालाही परवानगी नाही. असे असताना देखील मुख्यालयाच्या बेसमेंटमध्ये चक्क दारूच्या बाटल्यांचा खच (Liquor bottles piled up) सापडलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मनपा मुख्यालय हादरून गेले आहे. latest news about NMMC

एनएमएमसी मुख्यालयाच्या भंगारखान्यात पडलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या

मुख्यालयाची सुरक्षा यंत्रणा कुचकामी - बेसमेंटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आल्याच कशा? असा सवाल आता उपस्थित होतो. स्वच्छ, सुटसुटीत व नियोजनबद्ध शहर अशी नवी मुंबई शहराची ओळख आहे. मात्र दारूच्या बाटल्यांचा अगदी उलट आणि धक्कादायक प्रकार समोर आल्याने शहराची वेगळी ओळख निर्माण होताना पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे मुख्यालयाची सुरक्षा यंत्रणा किती कुचकामी आहे, हे देखील स्पष्ट झाले आहे.

हा तर दिव्याखाली अंधार- स्वच्छतेबद्दल शहरभर जनजागृती करणाऱ्या मनपा मुख्यालयाची अशी अवस्था म्हणजे दिव्याखाली अंधारच म्हणावे लागेल. नुकतेच रुजू झालेले मनपा आयुक्त राजेश नार्वेकर हे मुख्यालयात रंगणाऱ्या दारूच्या पार्ट्या आणि स्मोकिंगचे प्रकार कायमचे बंद करतील. याला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Last Updated : Nov 18, 2022, 7:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.