ETV Bharat / state

Vande Bharat Train For Ganeshotsav: मुंबई-मडगाव वंदे भारत ट्रेन झाली फुल्ल; कोकणवासीयांची गणेशोत्सवासाठी वंदे भारत ट्रेनला पसंती

author img

By

Published : Jun 27, 2023, 6:51 PM IST

मडगाव मुंबई वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटन फेरीनंतर आता बुधवारपासून सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेत वंदे भारत एक्सप्रेस दाखल होणार आहे. वंदे भारत ट्रेनच्या पहिल्या फेरीला प्रवाशांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. ट्रेन क्रमांक २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत ट्रेन हाऊस फुल्ल झाली आहे. विशेष म्हणजे, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनीसुद्धा याच ट्रेनचे तिकीट आरक्षित करायला सुरुवात केली आहे.

Vande Bharat Train For Ganeshotsav
मुंबई-मडगाव वंदे भारत ट्रेन

मुंबई: मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेससह पाच वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी मडगाव-मुंबई वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण केले. आता बुधवारपासून सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेत ही ट्रेन दाखल झाली आहे. सोमवारपासून या ट्रेनचे आरक्षण सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू झाले. २८ जून २०२३ रोजी सीएसएमटी स्थानकांवरुन सुटणाऱ्या ट्रेन क्रमांक २२२२९ सीएसएमटी- मडगाव वंदे भारत ट्रेनचे संध्याकाळ पर्यत चेअर कारच्या ५१२ पैकी ४६३ सीट आरक्षित झाली आहे. तर, एक्सिकटिव्ह क्लास सर्व आसन आरक्षित होऊन प्रतीक्षा यादी सुरू झाली आहे.

वंदे भारत ठरतेय चाकरमान्यांची पसंती: विशेष म्हणजे १९ सप्टेंबर रोजी गणपतीचे आगमन होणार आहे. चाकरमान्यांनी गणेशोत्सवाकरिता वंदे भारत एक्सप्रेसला पसंती दिली आहे. १८ आणि २० सप्टेंबरला मुंबईतून कोकणात जाणाऱ्या वंदे भारत ट्रेन हाऊस फुल झाली असून प्रतीक्षा यादीची सुरुवात झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ट्रेन क्रमांक 22229 सीएसएमटी-मडगांव:
तारीख -- एक्सेकेटिव्ह चेअर कार ----एसी चेअर कार
28 जून --- वेटिंग -01---------- उपलब्ध 49
30 जून ---उपलब्ध 01-------उपलब्ध 222
3जुलै ------ उपलब्ध 21-_उपलब्ध 329
5जुलै -- उपलब्ध 26----उपलब्ध 365
7 जुलै --उपलब्ध 04-----उपलब्ध 322
10 जुलै --उपलब्ध 31---उपलब्ध 374


ट्रेन क्रमांक 22230 मडगांव-सीएसएमटी:
तारीख - एक्सेकेटिव्ह चेअर कार - एसी चेअर कार
29 जून --- उपलब्ध -20- उपलब्ध 283
1जुलै --- उपलब्ध 21-------उपलब्ध 219
4जुलै ------ उपलब्ध 29--_उपलब्ध 325
6जुलै -- उपलब्ध 25-----उपलब्ध 360
8 जुलै --उपलब्ध 26----उपलब्ध 332
11 जुलै --उपलब्ध 29---उपलब्ध 356


गणेशोत्सवाकरिता लागली वेटिंग लिस्ट:
यंदा 19 सप्टेंबर रोजी गणपतीचे आगमन होणार आहे. चाकरमान्यांनी गणेशोत्सवाकरीता वंदे भारत एक्सप्रेसला पसंती दिली आहे.
सीएसएमटी ते मडगांव (वेटिंग):
तारीख ----एक्सेकेटिव्ह चेअर कार ----एसी चेअर कार
18 सप्टेंबर -- 26----183
20 सप्टेंबर --06---56


मडगांव ते सीएसएमटी (वेटिंग):
तारीख ----एक्सेकेटिव्ह चेअर कार ----एसी चेअर कार
23 सप्टेंबर -- 01----49
26 सप्टेंबर --12==64

हेही वाचा:

  1. Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना, लोको पायलटसोबत ईटीव्ही भारतने साधला संवाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.