ETV Bharat / state

Jitendra Awhad : विनयभंग प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना होऊ शकते अटक, महाविकास आघाडीच्या नेत्या राज्यपालांच्या भेटीला

author img

By

Published : Nov 14, 2022, 11:16 AM IST

Updated : Nov 14, 2022, 12:06 PM IST

Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आमदारकीचा राजीनामा (MLA Jitendra Avhad to resign) देण्याचा निर्णय घेतो आहे. असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट (Avhad to resign from MLA due to police case) केले आहे. त्यांच्यावर महिलेच्या विनयभंगाचा एक गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल झाला (Woman Registered Molestation Case On Jitendra Awhad ) आहे.

मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा (MLA Jitendra Avhad to resign) देण्याचा निर्णय घेतो आहे. असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट (Avhad to resign from MLA due to police case) केले आहे. त्यांच्यावर महिलेच्या विनयभंगाचा एक गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल झाला (Woman Registered Molestation Case On Jitendra Awhad ) आहे. 'हर हर महादेव' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह बाबी आढळल्याचा दावा करीत त्या आधारे या चित्रपटाला माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध ( NCP MLA Jitendra Awhad ) केला. त्या संदर्भात त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल ( Case Registered Against Jitendra Awhad ) केला.

महिलांविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी विरोधात महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. महिला नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. महिलांचा अपमान सहन करणार नाही, असे खासदार जया बच्चन यांनी म्हटले आहे. महिलांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी महिला नेत्यांनी केली आहे.

  • पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही 😭३५४ ,.,
    मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत

    — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राजीनामा : पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४. मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा (MLA Jitendra Avhad to resign) देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या आहे, उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट (Avhad to resign from MLA due to police case) केले आहे.

विनयभंगाचा गुन्हा : जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महिलेच्या विनयभंगाचा एक गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल झाला (Woman Registered Molestation Case On Jitendra Awhad ) आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 354 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली ( Case Registered At Mumbra Police Station ) आहे.

नुकतेच निर्माण झाला वाद: 'हर हर महादेव' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह बाबी आढळल्याचा दावा करीत त्या आधारे या चित्रपटाला माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध ( NCP MLA Jitendra Awhad ) केला. यातील ऐतिहासिक बाबी काढून टाकाव्या यासाठी त्यांनी ठाणे शहरातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहातील एक शो बंद देखील केला. त्या संदर्भात त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल ( Case Registered Against Jitendra Awhad ) केला. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे नेते आहेत.

पोलिसांचा ससेमिरा संपत नाही : पोलिसांचा ससेमिरा जितेंद्र आव्हाडांचा संपत नाही. नुकतेच हर हर महादेव चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात ऐतिहासिक बाबी असल्याचे म्हणत चित्रपटगृहातील चित्रपट बंद करण्याचे काम त्यांनी केले होते. त्यात एका प्रेक्षकाला राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा गुन्हा नोंदला गेला होता. आणि त्या आधारे त्यांना तुरुंगात देखील जाण्याची पाळी आली होती. मात्र न्यायालयाने त्यांना जामीन दिला. आता मात्र एका महिलेच्या विनयभंगाच्या संदर्भात गुन्हा जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालाय. त्यामुळे पोलिसांचा ससेमिरा जितेंद्र आव्हाडांचा पाठ सोडत नाही, अशी स्थिती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 354 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली ( Case Registered At Mumbra Police Station ) आहे.

Last Updated :Nov 14, 2022, 12:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.