ETV Bharat / state

Kirit Somaiya on Ravindra Waikar: पंचतारांकित हॉटेल घोटाळ्याप्रकरणी उद्धव ठाकरेंचीही चौकशी करा- किरीट सोमैया

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 10:12 PM IST

Kirit Somaiya on Ravindra Waikar
किरीट सौमैय्या यांची पत्रकार परिषद

Kirit Somaiya on Ravindra Waikar : शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी 500 कोटी रुपयांचा पंचतारांकित हॉटेल घोटाळा केलाय, असा आरोप किरीट सोमैयांनी केलाय. या हॉटेलला परवानगी कोणी दिली, उद्धव ठाकरे हे या व्यवहारात भागीदार आहेत का? याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी आपण तपास यंत्रणांकडे करीत आहे, असं भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. ते मुंबईत त्यांच्या निवासस्थानी बोलत होते.

किरीट सौमैय्या यांची पत्रकार परिषद

मुंबई Kirit Somaiya on Ravindra Waikar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेलचा घोटाळा केलाय, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केलाय. रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेलचा सुमारे 500 कोटी रुपयांचा जमीन घोटाळा केलाय, असा आरोप करत या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं दिलेली परवानगी नाकारली असल्याचं त्यांनी सांगितलंय. मुंबई पोलिसांनी रवींद्र वायकर यांची प्राथमिक चौकशी करण्यास सुरुवात केलीय. लवकरच त्यातून सत्य बाहेर येईल, असंही सोमैय्या यावेळी म्हणालेत.


भ्रष्टाचार आणि फसवणूक : उच्च न्यायालयात या कारवाई विरोधात रवींद्र वायकर यांनी केलेली याचिका न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे. वायकर यांना जरी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभा दिली असली, तरी यावेळी शेरे देताना न्यायालयानं वायकर यांच्यावर कडक ताशेरे ओढले आहेत. वायकर यांनी या प्रकरणात भ्रष्टाचार आणि फसवणूक केल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट होतंय, असं न्यायालयाने म्हटलं आहे, असा दावाही सोमैया यांनी केलाय.



आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल : दरम्यान रवींद्र वायकर हे खोटं बोलले, त्यांनी फसवणूक केलीय. बनावट कागदपत्रे तयार केली असल्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त यांची आपण भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल केलीय, अशी माहिती सोमैया यांनी दिलीय. तसंच वायकर यांच्यावर ताबडतोब एफआयआर दाखल करावा, अशी मागणी केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही आपलं बोलणं झालंय. यासंदर्भात कारवाई करायची मागणी आपण केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरे यांचे भागीदार असलेले रवींद्र वायकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल होईल, असा दावाही त्यांनी केलाय.



उद्धव ठाकरे यांच्या चौकशीचे काय : उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना 2021 मध्ये त्यांच्या आग्रहाखातर मुंबई महानगरपालिकेने रवींद्र वायकर यांना या जमीन प्रकरणात एफएसआय दिलाय. त्यामुळे या प्रकरणाचीही चौकशी करावी, अशी आपण मागणी करत असल्याचं त्यांनी सांगितलंय. या संदर्भात उच्च न्यायालयानं प्रश्न उपस्थित केला होता की, वायकर यांनी खोटी माहिती दिलीय. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पंचतारांकित हॉटेलला परवानगी का दिली? या दोन्ही प्रकरणात चौकशी व्हावी अशी आपण मागणी केलीय. पोलिसांनी त्यांना आश्वासन दिलंय की, या संदर्भात लवकरच एफआयआर दाखल करून चौकशी करू, असंही सोमैया यांनी यावेळी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. खिचडी घोटाळ्यात ठाकरेंच्या मित्रांचा सहभाग, किरीट सोमैयांचा गंभीर आरोप
  2. Ambadas Danve Reaction On Kirit Somaiya Notice: व्हायरल व्हिडिओ क्लिपचे प्रकरण वाढणार? किरीट सोमैय्यांची अंबादास दानवेंना 18 पानांची नोटीस
  3. Kirit Somaiya On Covid Scam : कथित व्हिडिओ क्लिपनंतर किरीट सोमय्या पुन्हा मैदानात; उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.