ETV Bharat / state

कल्याण-डोंबिवली दरम्यान आज 5 तासाचा मेगाब्लॉक, लांबपल्ल्याच्या फेऱ्या रद्द

author img

By

Published : Dec 25, 2019, 10:18 AM IST

मध्य रेल्वेने आज ठाकुर्ली स्थानकातील पादचारी पुलाचे गर्डर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे डोंबिवली ते कल्याण दरम्यान धीम्या जलद मार्गांसह पाचव्या-सहा्व्या मार्गिकेवर पॉवरब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे कल्याण ते डोंबिवली दरम्यानची रेल्वे वाहतूक जवळपास ५ तास बंद राहणार आहे.

mumbai
मेगाब्लॉक

मुंबई - नाताळची सुट्टी असल्याचे निमित्त साधत आज (बुधवार) मध्य रेल्वेने ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. कल्याण-डोंबिवली दरम्यानची लोकल वाहतूक या तासात पूर्णपणे बंद राहणार असून एकूण १६ मेल एक्स्प्रेस रद्द राहणार आहेत.

मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकात पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीसाठी आज सकाळी ९.४५ ते दुपारी १.४५ या काळात ४०० मेट्रिक टन वजनी आणि ६ मीटर रुंदीचे ४ गर्डर उभारण्याचे काम करण्यात येईल. यामुळे डोंबिवली ते कल्याण दरम्यान धीम्या जलद मार्गांसह पाचव्या-सहा्व्या मार्गिकेवर पॉवरब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे कल्याण ते डोंबिवली दरम्यानची रेल्वे वाहतूक जवळपास ५ तास बंद राहणार आहे. दरम्यान काही लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.

लोकल सेवेवर परिणाम -
कल्याण-डोंबिवली दरम्यान सकाळी ९.१५ ते दुपारी १.४५ या वेळेत लोकल वाहतूक बंद राहणार आहे. तसेच दर २० मिनिटांनी कल्याण-कर्जत/कसारा या मार्गावर विशेष फेऱ्या असणार आहेत. तर, डोंबिवली/ठाणे-सीएसएमटी या मार्गावर दर 15 मिनिटांनी विशेष फेऱ्या असतील. एसएमटी-दादर, कुर्ला, ठाणे या लोकल फेऱ्या वेळापत्रकानुसार धावतील.

२५ डिसेंबरला खालीलप्रमाणे मेल-एक्स्प्रेस राहणार रद्द
(११००९-११०१०) सीएसएमटी-पुणे सिंहगड
(१२१२३-१२१२४) सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन
(१२१०९-१२११०) सीएसएमटी-मनमाड पंचवटी
(२२१०१-२२१०२) सीएसएमटी-मनमाड राज्यराणी
(१२०७१-१२०७२) दादर-जालना जनशताब्दी
(११०२९-११०३०) सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी
(५११५३-५११५४) सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजर

२५ डिसेंबरला खालील गाड्या दिवा-पनवेल-कर्जत मार्गे धावतील
(११०११) एलटीटी- हजूर साहिब नांदेड़ एक्सप्रेस, (१६३३९) सीएसएमटी-नागरकोइल एक्सप्रेस, (१७०३१) हैदराबाद-सीएसएमटी-हैदराबाद एक्सप्रेस
(११०२६) पुणे- भुसावल एक्सप्रेस ही पुणे-दौंड-मनमाड मार्गे धावेल

खालील गाड्या कर्जत-पनवेल-दिवा मार्गे धावतील
(१२२२०) सिकंदराबाद-एलटीटी एक्सप्रेस, (११०२४) कोल्हापूर-सीएसएमटी सह्याद्री एक्सप्रेस, (१७०३२) हैदराबाद-सीएसएमटी एक्सप्रेस, (११०४२) चेन्नई- सीएसएमटी एक्सप्रेस
जळगाव-वसई रोड-दिवा मार्गे
(१२३२१) हावड़ा - सीएसएमटी एक्सप्रेस, (१३२०१) राजेंद्र नगर- एलटीटी एक्सप्रेस

खालील गाड्यांचे अप रेगुलेशन
(२२२२२) निजामुद्दीन-सीएसएमटी राजधानी एक्सप्रेस टिटवाला स्टेशन
(१२५९७) गोरखपुर-सीएसएमटी एक्सप्रेस खडावली स्टेशन
(१२१६८) वाराणसी-एलटीटी एक्सप्रेस वासिंद स्टेशन
(२२८६६) पुरी-एलटीटी एक्सप्रेस आसनगांव स्टेशन
(२२१२८) काजीपेट-एलटीटी एक्सप्रेस आटगांव स्टेशन
(११०९४) वाराणसी-सीएसएमटी महानगरी एक्सप्रेस खर्डी स्टेशन
(११०१४) कोयंबटूर- एलटीटी एक्सप्रेस अंबरनाथ स्टेशन
(१२२९४) इलाहाबाद- एलटीटी एक्सप्रेस एलटीटी १४.५५ ऐवजी १६.०० वाजता पोहचेल
(१२१४२) पाटलिपुत्र-एलटीटी एक्सप्रेस एलटीटी १५.१५ ऐवजी १६.१५ वाजता पोहचेल
(११०७४) चेन्नई-एलटीटी एक्सप्रेस १६.०० ऐवजी १६.३० वाजता पोहचेल
(११०५६) छपरा-एलटीटी एक्सप्रेस १६.१५ ऐवजी १७.०० वाजता पोहचेल

डाउन एक्सप्रेसचे रेगुलेशन
(१२१६७) एर्नाकुलम-एनजेडएम मंगला एक्सप्रेस दिवा स्थानकात १५ मिनिट थांबेल आणि कल्याण स्टेशनला उशिरा पोहचेल.

पुर्ननियोजित वेळापत्रकानुसार सुटणाऱ्या गाड्या
(११०५५) एलटीटी-गोरखपुर एक्सप्रेस एलटीटी येथून १०.६६ ऐवजी १२.४० वाजता आणि ठाणे येथे १३.६ ऐवजी १३.३० सुटेल
(१२३६२) सीएसएमटी-आसनसोल एक्सप्रेस सीएसएमटी येथून ११.०५ ऐवजी १३.३० वाजता सुटेल
(१२५४२) एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस एलटीटी येथून ११.१० ऐवजी १३.२० वाजता सुटेल (२२५११) एलटीटी-कामाख्या एक्सप्रेस एलटीटी येथून ११.३० ऐवजी १३.३० ला सुटेल
(११०६१) एलटीटी-दरभंगा एक्सप्रेस एलटीटी येथून १२.१५ ऐवजी १३.४० वाजता सुटेल
(११०७१) एलटीटी-वाराणसी कामायनी एक्सप्रेस एलटीटी येथून १२.४० ऐवजी १४.२० वाजता सुटेल
(१२५९८) सीएसएमटी-गोरखपूर एक्सप्रेस सीएसएमटी येथून १३.३० ऐवजी १८.१५ वाजता सुटेल
(१२३२२) सीएसएमटी-हावडा मेल बुधवारी सीएसएमटी येथून २१.३० ऐवजी २६ डिसेंबरला रात्री १ वाजता सुटेल
(११०९३) सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्सप्रेस सीएसएमटी येथून २६ डिसेंबरला रात्री १२.१० ऐवजी रात्री २ वाजता सुटेल

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.