ETV Bharat / state

Chhatrapati Shivaji Maharaj : 'शिवरायांची जगदंबा तलवार, वाघ नखे यावर्षीच महाराष्ट्रात आणणार'

author img

By

Published : May 19, 2023, 8:13 PM IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त, शिवरायांची प्रसिद्ध जगदंबा तलवार ब्रिटन मधून भारतात आणणार असल्याची घोषणा, राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. अफजलखानाचा वध केलेली स्फूर्तीदायक वाघनखे ही महाराष्ट्रात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Jagdamba Talwar and Wagh Nakh
शिवरायांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणणार

मुंबई: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारी, सुप्रसिद्ध जगदंबा तलवार ही सध्या ब्रिटन मधल्या संग्रहालयात आहे. भारत स्वतंत्र होताना इंग्रजांनी ही सुप्रसिद्ध तलवार आपल्यासोबत नेली तसेच अफजलखानाचा वध करताना शिवरायांनी वापरलेली ऐतिहासिक महत्त्व असलेली वाघ नखही, इंग्रजांनी आपल्या सोबत नेली होती. या दोन्ही गोष्टी ब्रिटनच्या वस्तू संग्रहालयात आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त, शिवरायांची प्रसिद्ध जगदंबा तलवार ब्रिटन मधून भारतात आणणार - सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार



ब्रिटिशांशी केला पत्र व्यवहार: दरम्यान मराठी साम्राज्याची ऐतिहासिक ठेव असलेल्या आणि मराठ्यांचा जाज्वल्य इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या, छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवार आणि सुप्रसिद्ध वाघ नखे परत भारतात महाराष्ट्रात आणण्यासाठी ब्रिटन सरकार बरोबर राज्य सरकारने पत्रव्यवहार केला असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. छत्रपती शिवराय हे मराठी माणसाचे आराध्य दैवत आहे. या दैवताची दोन्ही अस्त्रे ज्याला वैभवशाली इतिहास आहे. ती महाराष्ट्रात परत आणल्यानंतर मराठी माणसाचा आनंद शिगेला पोहोचल्या शिवाय राहणार नाही. यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.



शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सरकारची पावले: 2024 हे वर्ष छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेकाच 350 व वर्ष आहे. या 350 व्या वर्षानिमित्त छत्रपतींची जगदंबा तलवार आणि वाघ नखे महाराष्ट्रात परत आणली जाणार आहेत. सध्या तरी एक वर्षाच्या मुदतीवर ही दोन्ही अस्त्र महाराष्ट्रात मराठी जनतेला आणि संपूर्ण भारताला पाहायला मिळावी, यासाठी मागणी करण्यात आली आहे.


तुकडोजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अध्यात्म कार्य आणि समाजकार्य हे वाखाण्याजोगे आहे. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे साहित्य आणि चित्रपट सध्या नाहीत. तुकडोजी महाराजां प्रमाणेच अन्य संत आणि महंतांच्या समाजकार्यावर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्याचा सरकारने विचार केला आहे. मात्र सध्या तरी संत तुकडोजी महाराज यांच्या चित्रपटाबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा -

  1. Shivaji Maharaj Statue In Mauritius मॉरिशसमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण मॉरिशसचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार सोहळा
  2. Mauritius Chhatrapati Shivaji Maharaj Statue मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार १२ फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावर
  3. Chhatrapati Shivaji Maharaj Statue येथे उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ पुतळा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.