मुंबई Illegal Cigarettes Seized : एकीकडं नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच दुसरीकडं महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईत मोठी कारवाई केली आहे. 29 डिसेंबर रोजी मुंबईत दुबई मार्गे कार्गोमध्ये संशयास्पद तस्करी करुन आणलेल्या लाखो सिगारेट असल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे महसूल संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून 15 लाख 86 हजार 960 इतक्या बेकायदेशीर सिगारेट जप्त केल्या आहेत.
कपड्याच्या अस्तरात लाखो सिगारेट : बेकायदेशीर सिगारेट तस्करी संदर्भात माहिती मिळताच महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईत दुबई मार्गे येणाऱ्या कार्गोची तपासणी केली. यावेळी वेगवेगळ्या बॉक्समध्ये सिगारेट लपवल्या असल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. तसंच यावेळी तेथे असलेल्या कपड्यांची तपासणी करण्यात आली असता, कपड्याच्या अस्तरात लाखो सिगारेट सापडल्या.
तस्करी करून आणल्या लाखो सिगारेट : कार्गोची संपूर्ण तपासणी केली असता 15 लाख 86 हजार 960 इतक्या सिगारेट सापडल्या. त्याचे एकूण आजचे बाजार मूल्य 2 कोटी 40 लाख रुपये इतके आहे. या सिगारेटमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड असलेल्या सिगारेटचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणी महसूल संचालनालयाच्या वतीनं एकाला अटक केली आहे. तसंच यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा-