ETV Bharat / state

Richest Ganpati in Mumbai : काय सांगता! 69 किलो सोन्यासह 336 किलो चांदीनं बनली 'या' बाप्पाची मूर्ती

author img

By PTI

Published : Sep 18, 2023, 8:59 PM IST

Updated : Sep 19, 2023, 6:45 AM IST

Richest Ganpati in Mumbai : राज्यात आजपासून गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू झालाय. मुंबईतील GSB सेवा मंडळानं गणेशोत्सवासाठी सर्वात महागड्या गणेश मूर्तीची स्थापना केलीय. GSB सेवा मंडळ सर्वात श्रीमंत मंडळ म्हणून ओळखलं जातं. यंदा या मंडळाची गणेशाची मूर्ती ६९ किलो सोनं आणि ३३६ किलो चांदीची बनवली आहे. यासाठी GSB सेवा मंडळानं 360.45 कोटी रुपयांचा विमाही काढलाय. .

Richest Ganpati in Mumbai
Richest Ganpati in Mumbai

मुंबई : Richest Ganpati in Mumbai : महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाची (Ganeshotsav २०२३) जय्यत तयारी सुरू आहे. यातच मुंबईतील GSB सेवा मंडळानं आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी सर्वात महागड्या गणेश मूर्तीची स्थापना केलीय. GSB सेवा मंडळ मुंबईतील सर्वात श्रीमंत मंडळ म्हणून (Ganesh Chaturthi २०२३) ओळखलं जातं. यावेळी मंडळानं गणेशाच्या मुर्तीवर सोन्या-चांदीचा वर्षाव केलाय.

काय आहेत मुर्तींची वैशिट्ये : यावर्षी या मंडळाची गणेशाची ही मूर्ती 69 किलो सोनं आणि 336 किलो चांदीची आहे. यासाठी GSB सेवा मंडळानं 360.45 कोटी रुपयांचा विमाही काढल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आलीय. यंदा हे मंडळ ६९ वा गणेशोत्सव साजरा करणार आहे. या गणेशमूर्तीमध्ये 36 किलो चांदी आणि 250 ग्रॅम सोन्याचं लॉकेटही तयार करण्यात आलंय. गणरायाच्या मुर्तीच्या सुरक्षेसाठी फेशियल रेकग्निशन बसवण्यात आल आहे. याठिकाणी पाळत ठेवण्यासाठी उच्च घनतेचे सीसीटीव्ही कॅमेरे वापरत असल्याचंही मंडळाकडून सांगण्यात आलंय.

अंधेरी राजाकडं कोट्यवधींचे दागिने
अंधेरी राजाकडं कोट्यवधींचे दागिने
  • 'अंधेरीचा राजा'कडे अडीच कोटी रुपये किमतीचे दागिने आहेत. सोन्याचा मूषक, चांदीची पाऊले आणि हिरेजडीत मुकूट आहे. यांची किंमत अडीच कोटी रुपये आहे.

गणेशोत्सव स्पर्धेत भाजपाकडून लाखोंची बक्षीसं : मुंबई भाजपातर्फे गणेशोत्सवाचे जोरदार स्वागत करण्यासाठी मुंबई भाजपाची टिम तयार झाली आहे. गतवर्षी प्रमाणं याही वर्षी मुंबईचा मोरया ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आलीय. तसंच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 6 ट्रेन आणि 338 एसटी आणि खाजगी बस मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलारांनी दिलीय. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर गणेशोत्सव, दहिहंडी उत्सव, नवरात्र उत्सवासह विविध सण उत्साहात जल्लोषात साजरे करण्यात येत आहेत. नुकत्याच झालेल्या मंगळागौर स्पर्धेनंतर आता "मुंबईचा मोरया" या भव्य गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे याही वर्षी ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी नुकतेच दिलीय.

हेही वाचा :

  1. Ganeshotsav २०२३ : गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी; राज्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचं आयोजन
  2. Ganeshotsav 2023 : ताशा तर्रारररला ढोलही वाजला! गणरायाच्या आगमनाचा जल्लोष; पुण्यातील ढोल-ताशा पथकं सज्ज
  3. Konkani Jakhadi Dance : गणेशोत्सव काळातील कोकणातील प्रसिद्ध 'जाखडी लोककला'; जाणून घ्या इतिहास
Last Updated :Sep 19, 2023, 6:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.