ETV Bharat / state

Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल पदावरून मुक्त करा; कोश्यारींची पंतप्रधानांकडे विनंती

author img

By

Published : Jan 23, 2023, 4:03 PM IST

Updated : Jan 23, 2023, 5:54 PM IST

governor bhagat singh koshyari
governor bhagat singh koshyari

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत माहिती दिली की, माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई भेटीदरम्यान, मी त्यांना सर्व राजकीय जबाबदाऱ्या सोडण्याची आणि माझे उर्वरित आयुष्य वाचन, लेखन आणि इतर कार्यात घालवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मुंबई : राज्यपाल पदावरून मुक्त करा, अशी विनंती भगतसिंह कोश्यारी यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली. त्यामुळे राज्यपाल राजीनामा देण्याच्या तयारी असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

  • महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते.

    गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही.

    — Governor of Maharashtra (@maha_governor) January 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्यपालांचे ट्विट : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत माहिती दिली की, माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई भेटीदरम्यान, मी त्यांना सर्व राजकीय जबाबदाऱ्या सोडण्याची आणि माझे उर्वरित आयुष्य वाचन, लेखन आणि इतर कार्यात घालवण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे ट्विट महाराष्ट्राचे राज्यपाल भगत यांनी केले आहे.

पत्रात काय म्हटलंय : महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

कोश्यारींनी दिले होते संकेत - याआधीही राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या राज्यात परत जाण्याची इ्च्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी आधीच राज्यपाल पदावरुन पदमुक्त होण्याचे संकेत दिले होते. राज्यपालांना आपल्या पदावरून मुक्त व्हायचे असेल तर त्यांना अगोदर पदाचा राजीनामा अथवा पदमुक्त होण्याबाबतचे पत्र राष्ट्रपतींना पाठवावे लागेल. त्यानंतर त्यांच्या पत्रावर कार्यवाही होईल.

कशी होते राज्यपालांची नियुक्ती - राज्यपाल हा देशातील घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख असून, राज्याचा कारभार त्यांच्या नावे चालतो. बऱ्याचदा एकाच व्यक्तीची एक किंवा त्याहून अधिक राज्यांसाठीसुद्धा राज्यपाल म्हणून नियुक्ती केली जाते. राज्यपाल राज्याचे प्रथम नागरिक असले तरीही राज्यातील सर्व महत्त्वाची कामे आणि जबाबदाऱ्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रीमंडळाकडे असतात.

राज्यपालांना पदमुक्त करण्याचा अधिकार कुणाला? - राज्यपालांना पदावर नियुक्त करण्याची जबाबदारी देशाच्या राष्ट्रपतींकडे असते त्याचप्रमाणे त्यांना पदमुक्त करण्याचे अधिकारही फक्त राष्ट्रपतींकडेच असतात. याबाबतचा अंतिम निर्णय भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच घेऊ शकतील.

हेही वाचा : SC On CBI : सीबीआय तोंडघसी! अनिल देशमुखांचा जामीन कायम; हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा नकार

Last Updated :Jan 23, 2023, 5:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.