ETV Bharat / state

Gelatin stalks in Bhogavati river : पेणमध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या 'त्या' नळकांड्या निघाल्या 'डमी बॉम्ब'

author img

By

Published : Nov 11, 2022, 7:31 AM IST

Updated : Nov 11, 2022, 9:59 AM IST

Gelatin stalks in Bhogavati river
पेणमध्ये सापडल्या जिलेटिनच्या कांड्या

रायगडमधील मुंबई गोवा महामार्गावरील ( Mumbai Goa Highway ) भोगावती नदीपात्रामध्ये जिलेटिनच्या कांड्या (Gelatin stalks in Bhogavati river ) आढळून आल्या आहेत. नवी मुंबईच्या बॉम्ब शोधक पथकाला ( Bomb Squad ) पाचारण करून, जिलेटीनच्या कांड्या निकामी करण्यात आल्या आहेत. सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या कुठून आल्या याचा शोध घेण्यात येत आहे.

मुंबई : रायगडमधील मुंबई गोवा महामार्गावरील ( Mumbai Goa Highway ) भोगावती नदीपात्रामध्ये जिलेटिनच्या कांड्या ( Gelatin stalks in Bhogavati river ) सापडल्याने, झाले होते. दरम्यान रायगड आणि नवी मुंबईच्या बॉम्ब शोधक पथकाने ( Bomb Squad ) घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला आहे. तर हाती आलेल्या जिलेटिनच्या कांड्या निकामी करण्यात आल्या आहेत.

सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक रायगड

जिलेटीन कांड्या कुठून आल्याचा केला जातोय तपास : मुंबई गोवा मार्गावरील भोगावती नदीपात्रामध्ये गुरुवारी रात्रीच्यावेळेस १० ते १२ जिलेटीन कांड्या आढळून आल्या आहेत. याबाबाबतची माहिती मिळताच रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी या ठिकाणी तात्काळ भेट देत परिस्थितीची माहिती घेत, परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. दरम्यान येथील मार्गावरील वहातुक एकदिशा मार्गाने सुरू ठेवली असून, रायगड आणि नवी मुंबईच्या बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करून, जिलेटीनच्या कांड्या निकामी करण्यात आल्या आहेत. तर या ठिकाणी आणखी स्फोटके आहेत का? याची खातरजमा करण्यात येत असून, सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या कुठून आल्या याचा शोध घेण्यात येत आहे.


पोलीस यंत्रणेने परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवले : भोगावती नदी पात्रात स्फोटके सापडल्याची माहिती मिळताच परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलीस यंत्रणेने तात्काळ या परिस्थितीवर नियंत्रण मिळवून, पुढील तपास सुरु केला आहे. तर नदी पात्रावरील पुलावरून होणाऱ्या वाहतुकीला कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता घेत जिलेटीन कांड्या ताब्यात घेतल्या आहेत.

त्या नळकांड्या निघाल्या डमी बॉम्ब : मुंबई गोवा मार्गावरील भोगावती नदीपात्रात सापडलेल्या जिलेटीन सदृश्य नळकांड्या या स्फोटके नसून, डमी बॉम्ब असल्याचा रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी खुलासा केला आहे. दरम्यान येथील वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.


पोलीस अधीक्षकांचा खुलासा : गुरुवारी संध्याकाळी पेण मधील भोगावती नदीपात्रामध्ये मुंबई-गोवा मार्गावरील पुलानाजीक जिलेटीन सदृश्य नळकांड्या सापडल्याने एकच खळबळ माजली होती. यावेळी रायगडच्या पोलीस अधीक्षक यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत रायगड आणि नवी मुंबई बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करून, चार तास तपास केल्यानंतर या नळकांड्यां जिलेटीन किंवा डेटोनेटर नसून, डमी बॉम्ब असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबतचा खुलासा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारांनंतर मुंबई गोवा मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. तर येथील नागरिकांनाही सुटकेचा श्वास सोडला आहे.



पोलीस अधिक तपास करत आहेत : मिळालेल्या नळकांड्या या जिलेटीन किंवा डेटोनेटर नसल्याचे निष्पन्न झाले असले तरी, या नळकांड्या नदीपात्रामध्ये कशा आल्या? नदीपात्रामध्ये आणखी अशाप्रकारच्या नळकांड्या आहेत का ? याचा शोध पोलीस यंत्रणेकडून घेतला जात आहे. एकंदरीतच गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरामध्ये खळबळ माजली होती. मात्र रायगड पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Last Updated :Nov 11, 2022, 9:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.