ETV Bharat / state

Nawab Malik Case : नवाब मलिक यांच्या जामीनावर आज निकाल; जामीन मिळणार की मुक्काम वाढणार ?

author img

By

Published : Nov 30, 2022, 10:18 AM IST

Nawab Malik
नवाब मलिक

माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्ट निर्णय देणार ( PMLA court hearing ) आहे. जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रीग ऍक्टमध्ये अटक करण्यात आली ( Nawab Malik Money Laundering Case ) होती.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्ट निर्णय देणार ( PMLA court hearing ) आहे. कुर्ला येथील जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रीग ऍक्टमध्ये अटक करण्यात आली ( Nawab Malik Money Laundering Case ) होती. तेव्हापासून नवाब मलिक न्यायालयीन कोठडीत आहेत. नवाब मलिक यांना आज दिलासा मिळणार की कारागृहातील मुक्काम वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले ( Nawab Malik bail Application Hearing ) आहे.

जामीन अर्जावर निकाल : मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे हे आज नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर निकाल देणार आहेत. 24 नोव्हेंबर रोजी निकाल येणे अपेक्षित होते. मात्र निकालाचे कामकाज पूर्ण न झाल्याने 30 नोव्हेंबर रोजी निकाल देण्यात येणार असे सांगण्यात आले होते. नवाब मलिक यांना जेल की बेल याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे न्यायलयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिकांवर गेल्या काही महिन्यांपासून कुर्ल्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वी मलिकांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता. त्यामुळे त्यांना आता दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणीत अजून वाढ होणार हे पाहावे लागणार आहे.

अडचणीत दूर होणार की वाढणार : नवाब मलिक यांना ईडीने गोवावाला कंपाऊंडमधील जमीन खरेदीच्या व्यवहारात केलेल्या मनी लॉड्रिंग प्रकरणी अटक केली होती. दाऊद इब्राहिमच्या टोळीसोबत केलेल्या व्यवहारातून दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याचा आरोपही मलिकांवर करण्यात आला आहे. त्यांच्या जामीनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सकाळी 11 वाजता सुनावणी सुरु होणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना देखील जामीन मिळाला आणि ते तुरूंगाबाहेर आले आहेत. आता नवाब मलिक यांना दिलासा मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

नवाब मलिक यांच्यावर आरोप काय ? : हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप ( What Allegations Against Nawab Malik ) आहे. या महिलेने 1999 मध्ये सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली होती. याद्वारे सलीम पटेलकडून या जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत तोडगा काढणे अपेक्षित होते. मात्र, पटेलने याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कंपाउंडमधील जमीन मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे. मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली असल्याचा ईडीचा आरोप आहे.

आरोप फेटाळून लावले : नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. गोवावाला कंपाउंडमधील जमीन ही कायदेशीर मार्गाने खरेदी केली असल्याचा दावा त्यांनी केला. सुमारे पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिकांकडून करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप याप्रकरणात दिलासा मिळाला नाही. त्यामुळं आज न्यायालयात काय निर्णय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.