ETV Bharat / state

Cabinet Meeting Decision : माजी राज्यपाल कोश्यारी यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 'हे' महत्वाचे निर्णय

author img

By

Published : Feb 14, 2023, 6:43 PM IST

State Cabinet Meeting Mumbai
राज्य मंत्रिमंडळ बैठक निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रीमंडळ बैठकीत राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा अभिनंदनचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज (14 फेब्रुवारी) पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध योजना आणि प्रकल्पांसदर्भात निर्णय घेण्यात आले. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे राज्य मंत्रिमंडळाने केले अभिनंदन केले आहे. राज्याचे हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

राज्य मंत्रीमंडळीची बैठक: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करणार असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित करण्यात येणार आहेत. तसेच धान शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याची सरकारने घोषणा केली आहे. यासाठी सरकारने १ हजार कोटी निधीस मान्यता दिली आहे. सरकारच्या या निधीमुळे ५ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

कुलगुरू निवड पद्धतीत सुधारणा : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि पुणे येथील महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय व महाधिवक्ता यांच्या अभिप्रायानुसार विविध अकृषी विद्यापीठांमधील कुलगुरु पदांच्या निवडीच्या पद्धतीत यापूर्वीच बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार लोणेरे आणि पुणे येथील तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या निवड पद्धतीत सुधारणा करण्यात येईल.

महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण: महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत. वर्धा जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी सुमारे ७८७ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाअंतर्गत ७६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

धान उत्पादकांना प्रोत्साहनपर मदत : नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. त्यानुसार २०२२-२३ या खरीप पणन हंगामात केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भावाव्यतिरिक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान लागवडीखालील जमिनीनुसार प्रती हेक्टरी १५ हजार रुपये या प्रमाणे प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल. सन २०२१-२२ खरीप हंगामात १ कोटी ३३ लाख ७९ हजार ८९२ क्विंटल धान खरेदी झाली होती. या हंगामात धानाकरिता प्रोत्साहनपर रक्कम जाहीर केली नव्हती. मात्र, या पूर्वीच्या खरीप हंमागामध्ये धान उत्पादकांना प्रती क्विंटल ७०० रुपये अशी रक्कम प्रोत्साहनपर म्हणून दिली. ही रक्कम प्रती क्विंटल देण्यात येत असल्यामुळे काही अडचणी येत होत्या. ज्या शेतकऱ्यांकडे ५० क्विंटलपेक्षा कमी धान उत्पादन आहे. त्यांच्या नावे ५० क्विंटल मर्यादेपर्यंत जास्तीची धान खरेदी करण्यात आले आहेत. तसेच शेजारील राज्याचे धान महाराष्ट्रात विक्री करिता आणल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे राज्य शासनाने याला चाप लावण्यासाठी धान उत्पादकांना प्रती हेक्टरी 15 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर मदत दिली जाणार आहे.

छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ : पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाची उभारणी करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी ३९७ कोटी ५४ लाख खर्चाचा विकास आराखडा सादर करण्यात आला. जेजुरी तीर्थक्षेत्र तसेच सेवाग्राम विकास आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आले. जेजुरीसाठी १२७ कोटी २७ लाखाचा विकास आराखडा तर सेवाग्राम विकासासाठी १६२ कोटींचा विकास आराखडा सादर करण्यात आला.


हेही वाचा : Abdul Sattar On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस बोलतात 'ती' काळ्या दगडावरची पांढरी रेष - अब्दुल सत्तार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.