ETV Bharat / state

Rs 500 Note : पाचशेच्या 1761 दशलक्ष नोटा छापखान्यातून गायब? अजित पवार यांनी केली चौकशीची मागणी

author img

By

Published : Jun 17, 2023, 6:17 PM IST

Updated : Jun 19, 2023, 12:45 PM IST

Ajit Pawar On Notes Missing
Ajit Pawar On Notes Missing

काळ्या पैशा विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान स्वीकारले असताना देशातील तीन टाकसाळींमधून पाचशे रुपयांच्या सुमारे 1 हजार 761 दशलक्ष नव्या नोटा गायब झाल्याची धक्कादायक माहिती, माहिती अधिकारात उघड झाली आहे. यामुळे देशात खळबळ उडाली असून या नोटांची केंद्र, राज्य सरकारने कसून चौकशी करावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवार यांची प्रतिक्रिया

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये सत्तेवर येताना देशातील काळा पैसा संपवण्याचा आपण विडा उचलण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी देशात नोटबंदी ही लागू केली. मात्र, देशातील देवास नाशिक, बंगलोर येथील नोटांच्या छापखान्यामधून पाचशे रुपयांच्या १ हजार ७६१ दशलक्ष नोटा गायब झाल्याची माहिती, माहिती अधिकारात मनोरंजन रॉय यांना प्राप्त झाली आहे.

तपास करण्याची मागणी : देवास नाशिक आणि बंगलोर येथील छापखान्यांमध्ये छापण्यात आलेल्या या नोटा रिझर्व बँकेत पोहोचण्यापूर्वीच गायब झाल्या आहेत. या नोटा छापखान्यातून रिझर्व बँकेकडे रवाना झाल्या. मात्र, त्या कधीच रिझर्व बँकेत पोहोचल्या नाहीत अशी माहिती आता माहिती अधिकारात समोर आली आहे. या नोटांवर तत्कालीन रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची सही होती की अन्य कोणाची याबाबत अद्याप स्पष्टता नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात जर नोटा चलनामध्ये असतील तर त्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारला कशी माहिती नाही. केंद्रीय तपास यंत्रणा याबाबत का सजग नाहीत असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात आता केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास करून सत्य काय आहे. ते जनतेसमोर आणायला पाहिजे असेही, पवार यावेळी म्हणाले आहेत.

किती नोटांची झाली होती छपाई? : टाकसाळीमध्ये छापण्यात आलेल्या परंतु रिझर्व बँकेपर्यंत न पोहोचलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा या नवीन डिझाईनच्या नोटा होत्या. या नोटांचे मूल्य ८ खर्व ८० अब्ज ३२ कोटी ५० लाख इतके होते. छपाई केलेल्या नोटांपैकी 7 हजार 260 दशलक्ष इतक्याच नोटा पोहोचल्या असल्याचे रिझर्व बँकेने स्पष्ट केले आहे. अशी माहिती, माहिती अधिकार कार्यकर्ता मनोरंजन रॉय यांनी दिली. नाशिक येथील करन्सी नोट प्रेस बँक नोट प्रेस देवास आणि भारतीय रिझर्व बँक नोट मुद्रांक प्रायव्हेट लिमिटेड बंगळूरू येथे नोटांची छपाई केली जाते. या नोटा रिझर्व बँकेमार्फत देशभरात वितरित करण्यात येतात.

नोटांची छपाई आणि कालावधी :

  • नाशिक येथील टाकसाळी मधून एप्रिल 2015 ते मार्च 2016 या काळात पाचशे रुपयांच्या 210 दशलक्ष नोटा छापून रिझर्व बँकेकडे पाठवल्या.
  • एप्रिल 2015 ते डिसेंबर 2016 या कालावधीत 345 दशलक्ष नोटा तर, एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत 1 हजार 662 दशलक्ष नोटा पाठविण्यात आल्या.
  • बेंगलोर येथील टाकसाळीमधून या कालावधीत 5 हजार 195 दशलक्ष नोटा आणि देवास येथील टाकसाळी म्हणून 1 हजार 953 दशलक्ष नोटा अशा एकूण 8 हजार 810 दशलक्ष नोटा रिझर्व बँकेकडे पाठवण्यात आल्या.
  • यापैकी केवळ 7 हजार 260 दशलक्ष नोटा मिळाल्याचे रिझर्व बँकेने 2016-- 17 च्या आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.
    त्यामुळे 1 हजार 761 दशलक्ष नोटा गायब झाल्या असल्याचे असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता मनोरंजन रॉय यांनी केला आहे.

नोटा गेल्या कुठे? : आतापर्यंत गेल्या चार वर्षात आयकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालयाने अनेक ठिकाणी छापे मारले आहेत. या छाप्यांमध्ये पाचशे रुपयांच्या कोट्यावधी किमतीच्या नोटा सापडल्या आहेत. मात्र, असे असतानाही या दोन्ही विभागांकडून या अशा पद्धतीने नोटा चलनात कशा आल्या याबाबत आश्चर्य व्यक्त केले गेले नाही, अथवा तपासही केला गेला नाही. त्यामुळे आता नवीन डिझाईनच्या अब्जावधी रुपयांच्या नोटा गेल्या कुठे? याबाबत आपण सप्त वसुली संचालनालय, केंद्रीय आर्थिक तपास यंत्रणा तसेच अन्य यंत्रणांसोबत देशाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार असल्याचे मनोरंजन रॉय यांनी सांगितले.

हेही वाचा - 2000 Note Ban : 8 दिवसांत जमा झाले 'इतके' कोटी रुपये, SBI च्या चेअरमनचा खुलासा

Last Updated :Jun 19, 2023, 12:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.