ETV Bharat / state

कोरोना नियमांचे उल्लंघन; ब्रिच कॅन्डीजवळील 'अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार' विरोधात एफआयआर दाखल

author img

By

Published : Mar 18, 2021, 9:37 AM IST

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. जिल्हा प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता महानगरपालिका प्रशासनाने कडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

Arborzine Restaurant & Bar
अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार

मुंबई - राजधानी मुंबईमध्ये सध्या हायराईझ इमारतींमध्ये कोरोनाचा प्रसार सुरू आहे. याबाबत नागरिकांना आवाहन करूनही कोरोना त्रिसूत्रीचे पालन केले जात नाही, असे वारंवार निदर्शनास येत आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील 'अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार' या हॉटेलवर महापालिकेने रात्री धाड टाकली. त्यावेळी तेथे विनामास्क असलेल्या २४५ लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून हॉटेलविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली.

ब्रिच कॅन्डीजवळील 'अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार' विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली

महानगरपालिका अ‌ॅक्शन मोडमध्ये -

मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. गेल्या पंधरा दिवसात दर दिवसाला १ हजार ५०० ते २ हजार ३०० रूग्ण आढळले आहेत. रूग्ण संख्या वाढण्याची भीती असल्याने नागरिकांनी गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, असे आवाहन वेळोवेळी केले जात आहे. त्यानंतरही नागरिक बेफिकीरीने वागत आहेत. नागरिक गर्दी करतात अशा बार, हॉटेल, पब, रेस्टोरंट, लग्न समारंभ आदी ठिकाणी पालिकेने धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. या धडीदरम्यान विनामास्क आढळून येणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच ५० टक्के क्षमतेची परवानगी असताना जास्त नागरिक आढळून आल्यास साथ नियंत्रण कायद्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला जात आहे.

एफआयआर दाखल -

याच पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "डी" विभाग कार्यालयातर्फे काल (बुधवारी) रात्री ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार या हॉटेलवर महापालिकेच्या पथकाने धाड टाकली. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या २४५ लोक विना मास्क आढळल्यामुळे १९ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच सामाजिक अंतर न राखणे आणि शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - गुजरातमधील रुग्णालयाला आग; सुदैवाने जीवीतहानी नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.