ETV Bharat / state

MH Assembly Winter Session 2021 : विधानपरिषेच्या निवृत्त सदस्यांना निरोप; शिवसेनेच्या कदम-परब यांच्यातील मतभेद परिषदेच्या चव्हाट्यावर

author img

By

Published : Dec 27, 2021, 11:05 PM IST

Anil Parab and Ramdas Kadam
अनिल परब आणि रामदास कदम

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, गोपीकिशन बजोरीया, कॉंग्रेसचे भाई जगताप, राष्ट्रवादीचे सतेज पाटील, अरुण जगताप, भाजपचे प्रशांत पारिचारक, अमरीश पटेल, गिरीश व्यास या विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपला. यामुळे त्यांना सोमवारी निरोप देण्यात आला. ( Farewell of Shivsena Leader Ramdas Kadam of MLC Term Mumbai )

मुंबई - विधान परिषदेचे सदस्यत्त्व संपलेल्या सदस्यांच्या निरोप कार्यक्रमात शिवसेनेचे वरिष्ठ नेते रामदास कदम आणि शिवसेना नेते तसेच परिवहनमंत्री अनिल परब यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. ( Shivsena Leader Ramdas Kadam and Anil Parab ) सभापती, उपसभापती, विरोधी पक्षनेत्यांनी निवृत्त सदस्यांवर मते मांडली. यावेळी अनिल परब यांना बोलण्याची सभापतींनी विनंती केली. मात्र, त्यांनी बोलण्यास नकार देत, चुप्पी साधली. तर विधानभवनाच्या पायऱ्यांवरदेखील फोटो काढण्यास कदम गैरहजर राहिले. त्यामुळे परब आणि कदम यांच्यातील वाद अद्याप धगधगत असल्याचे दिसून आले. ( MH Assembly Winter Session 2021 )

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी कार्यकाळ संपलेल्या सदस्यांना निरोप देण्यात आला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, गोपीकिशन बजोरीया, कॉंग्रेसचे भाई जगताप, राष्ट्रवादीचे सतेज पाटील, अरुण जगताप, भाजपचे प्रशांत पारिचारक, अमरीश पटेल, गिरीश व्यास या सदस्यांचा निरोप कार्यक्रम सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी परिषदेत जाहीर केला. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी निवृत्त सदस्यांबाबत भावना व्यक्त केल्या. रामदास कदम यांच्या कारकिर्दीवर त्यांनी आपले मत मांडले. ( Deputy Speaker Neelam Gorhe On Ramdas Kadam ) सभापती निंबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रामदास कदम यांच्या वैयक्तिक जीवन प्रवासाचे वर्णन केले. शिवसेनेच्या जडणघडणीसाठी कदम यांनी वेचलेल्या आयुष्याची आठवण दरेकर यांनी सभागृहाला करुन दिली. ( Pravin Darekar On Ramdas Kadam ) सभापतींनी अनिल परब यांना बोलण्याची विनंती केली. मात्र, परब यांनी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे परब यांच्या मनात कदम यांच्याविरोधातील खदखद आज ही कायम असल्याचे यानिमित्ताने दिसून आले.

हेही वाचा - Minister Anil Parab on ST Employees : कर्मचाऱ्यांची बडतर्फ कारवाई मागे घेणार नाही - अनिल परब

...असे कोणतेही काम माझ्या हाताने होणार नाही - रामदास कदम

सगळ्यात जास्त पाऊस आणि अन्याय कोकणावर होतो, अशा शब्दात रामदास कदम यांनी आपल्या विधान परिषदेतील शेवटच्या भाषणाला सुरुवात केली. 1970ला शिवसेनेत प्रवेश केला. शिवसैनिक, गटनेता ते मंत्री असा प्रवास आहे. पक्षाने ही संधी दिली, त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. खेडमधून चार वेळा आमदार आणि 20 वर्षे विधानसभेत राहिलो. कुटुंबात भांड्याला भांड लागते, त्याचा विपर्यास करण्याची गरज नाही. पक्षात अनेक संघर्ष केले. माथाडी कामगार सेनेत 14 ते 15 वर्षे काम केले. तरुणांना संधी मिळायला हवी, अशी घोषणा अडीच वर्षापूर्वी मी केली होती. माझा मुलगा सध्या आमदार आहे. कुठलेही दुःख माझ्या मनात नाही. बाळासाहेबांनी माझ्या उद्धवला सांभाळा, असे सांगितले होते. शिवसेना पक्षप्रमुखांच्या आत्म्याला दुःख होईल, असे कोणतेही काम माझ्या हाताने होणार नाही, असे रामदास कदम यावेळी म्हणाले. ( Shivsena Leader Ramdas Kadam MLC Term Farewell Speech )

फोटो काढण्यास रामदास कदम, भाई जगताप यांची गैरहजेरी -

निवृत्त सदस्यांसोबत विधान भवनाच्या पायऱ्यांजवळ फोटो काढण्याची परंपरा आहे. त्यानुसार सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती नीलम गोऱ्हे, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह आठ सदस्यांसाठी खुर्च्या मांडल्या होत्या. सहा जण यावेळी उपस्थित राहिले. शिवसेनेचे रामदास कदम सभागृहात उपस्थित असूनही फोटो काढण्यावेळी गैरहजर राहिले. तर कॉंग्रेसचे भाई जगताप यांनी सभागृहाच्या कामकाजालाच आज अनुपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.