ETV Bharat / state

Sanjay Bansod Interview with ETV Bharat : 2024पर्यंत राज्यात जल जीवन मिशन कार्यक्रम पूर्ण करणार - पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोड

author img

By

Published : Feb 5, 2022, 6:07 AM IST

Minister Sanjay Bansod Interview with ETV Bharat
संजय बनसोड ईटीव्ही भारत मुलाखत

जागतिक तापमान वाढीमुळे सध्या वातावरणात आपल्याला विविध बदल पाहायला मिळतात. एकूणच हे वातावरणातील बदल काय आहेत या संदर्भामध्ये राज्य सरकार नेमकं काय करतंय, याबाबत ईटीव्ही भारतने पर्यावरण आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोड यांची मुलाखत घेतली. ( Minister Sanjay Bansod Interview with ETV Bharat )

मुंबई - 2024पर्यंत राज्यात जल जीवन मिशन कार्यक्रम पूर्ण करणार, असा विश्वास पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोड ( Sanjay Bansode on Etv Bharat ) यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना व्यक्त केला. जागतिक तापमान वाढीमुळे सध्या वातावरणात आपल्याला विविध बदल पाहायला मिळतात. एकूणच हे वातावरणातील बदल काय आहेत या संदर्भामध्ये राज्य सरकार नेमकं काय करतंय, याबाबत ईटीव्ही भारतने पर्यावरण आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोड यांची मुलाखत घेतली. ( Minister Sanjay Bansod Interview with ETV Bharat )

ईटीव्ही भारत प्रतिनिधी यांनी राज्यमंत्री संजय बनसोड यांची घेतलेली मुलाखत

प्रश्न - अत्यंत महत्त्वाचं खातं तुमच्याकडे आहे, वातावरणामध्ये पर्यावरणामध्ये नवीन नवीन बदल होतात याच्या संदर्भामध्ये राज्य सरकार नेमकं काय काम करतंय?

उत्तर - महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे युवा नेतृत्व म्हणून सबंध महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतो ते आदित्य ठाकरे. गेल्या दोन वर्षापासून आम्ही पर्यावरण खात्याची जबाबदारी सांभाळत आहोत आणि आम्ही अनेक गोष्टी या दोन वर्षांमध्ये करण्याचा प्रयत्न केले आहेत. नैसर्गिक आणि जैविक विविधता अस्तित्त्वात आणण्यासाठी आम्ही प्रथम वायू, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांवर आधारित दीक्षा श्वास निसर्ग पूर्वक जीवनपद्धती अवलंबण्यासाठी माझी वसुंधरा अभियान महाराष्ट्रात आणले. माझी वसुंधरा अभियानाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. अनेक महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये अधिकाऱ्यांनी यात भाग घेतला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला सोबत ठेवून ही योजना राबवण्याचे काम आम्ही जिल्हा स्तरावरती, राज्य स्तरावरती आम्ही केली.

आता माझी वसुंधरा टप्पा दोन सुद्धा आम्ही चालू केला आहे. त्यामध्ये काही गाव पाच हजाराच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहेत त्या गावालासुद्धा आता यात घेण्याचा प्रयत्न करता येईल. महाराष्ट्रात शाश्वत आणि प्रदूषण रहित वाहनांचा अधिकार करण्याकरता इलेक्ट्रिकल वाहनाचा वापर महाराष्ट्र देशात अग्रेसर बनवण्याकरता आम्ही काही पॉलिसी आमच्या ठिकाणी आलेल्या आहेत. 2025पर्यंत नवीन वाहन नोंदणी दहा टक्के हिस्सा तरी बॅटरी इलेक्ट्रिकल असेल, असा सुद्धा प्रयत्न सुरू आहे.

पाच लक्ष शहरांमध्ये 2025पर्यंत सार्वजनिक वाहतूक विद्युत वाहनाचे धोरण साध्य करण्याकरिता आम्ही प्रयत्न करणार आहोत. 2025पर्यंत आम्ही जवळजवळ सात शहरांमध्ये चार मुख्य मार्गावर सार्वजनिक व निम सार्वजनिक चार्जिंग सुविधा आणि त्या ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या, अशा अनेक गोष्टी म्हणजे प्रस्ताव धोरण कार्यक्रम करण्याचा प्रयत्न आहे. एकंदरीतच नागरिकांना मला विनंती करायची आहे, वातावरणामध्ये प्रचंड मोठे बदल त्याठिकाणी होत आहेत. हे सगळं काही गोष्टी आपल्या हातात असतानाही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष याठिकाणी करत होतो. मात्र, आपल्या सर्वांना जिथे मोकळी जागा असेल तिथे झाड लावण्याचा सुद्धा आपण काम केले पाहिजे आणि जे आपले पंचमहाभूत आहेत त्यांच्या संवर्धनासाठी भविष्यात काम केले पाहिजे.

प्रश्न - वाहनांसाठी आपण कशा पद्धतीची सवलती देतो आहेत आणि लोकांनी जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहन खरेदी करावी यासाठी काय आपण नेमकं
करीत आहात?

उत्तर - आम्ही ठरवले आहे की, शासनाने या अंमलबजावणीसाठी विद्युत वाहक फंड प्रस्तावित या ठिकाणी केला आहे. या निधीचा उपयोग विविध विषयक सुविधा निर्मिती सवलती देण्यासाठी आम्ही त्याठिकाणी करतो आहोत. हा निधी जुन्या वाहनावरील हरित कर आणि उत्तर सारख्या वेगळ्या माध्यमातून आम्ही एकत्र या ठिकाणी करू आणि त्याला काही सबसिडी देण्याचेसुद्धा त्याठिकाणी काम करणार आहोत.

प्रश्न - राज्यामध्ये पाणीपुरवठा एक महत्त्वाचा विभाग म्हणजे स्वच्छता हा आपल्याकडे आहे. आपण अभियान राबवत आहोत. या अभियानाला कसा प्रतिसाद मिळतो? हे पाणीपुरवठ्याच्या संदर्भामध्ये दरडोई 55 लिटर पाणी मिळावं यासाठी आपण नवीन काय करतोय? त्यामध्ये कोणत्या योजना आणि त्याच्यासाठी निधी कसा दिला जातो?

उत्तर - ग्रामीण भागामध्ये पाण्याची समस्या खूप चालली होती. हे सगळ बघुन शरद पवार साहेबांनी आम्हाला सूचना केल्या की केंद्राने जल जीवन मिशन आणले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जल जीवन मिशनचा कार्यक्रम संबंध राज्यामध्ये त्या ठिकाणी चालू केलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला ग्रामीण भागातल्या 55 लिटरप्रमाणे शुद्ध पाणी देण्याचा आमचा हेतू आहे आणि प्रत्येक घरांमध्ये एक व्यक्तीला ते पाण्याच्या ठिकाणी मिळणार आहेत आणि जवळजवळ 2024पर्यंत ही योजना पुर्ण करण्याचे काम या ठिकाणी करणार आहोत. अर्थ संकल्पातही 21- 22 ला केंद्र शासनाचा हिस्सा 1529 कोटी राज्याचा 1237 कोटी होता. राज्याची एकूण ग्रामीण तीन कुटुंबे 142.36 लक्ष आहेत आणि आता सध्या स्थितीत आम्ही 64% नळजोडणीचे काम पूर्ण त्याठिकाणी केलेला आहे आणि जिल्हा स्तरावर आराखड्यास माननीय पालकमंत्र्यांना मंजुरी देण्याचे अधिकार दिले.

प्रश्न - राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर विविध नद्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण आपल्याला दिसते. पंचगंगा कोल्हापूरची असेल, गोदावरी असेल अन्य नद्या असतील सगळीकडे मासे मरतात. त्याच्यामध्ये केमिकल पाणी जात आहे आणि खूप मोठा बदल प्रदूषणात होतो. यावर आळा कशा पद्धतीने घातला जात आहे. राज्य सरकारकडून कारवाई केली जाते का?

उत्तर - मी आणि आदित्य ठाकरेंनी जेव्हापासून या पर्यावरण खात्याचा कारभार स्वीकारलेला आहे तेव्हापासून नदीला कसे स्वच्छ करता येईल? नदी हे प्रदूषणमुक्त करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. त्यालासुद्धा मी तिथल्या ऑफिसरला आम्ही सांगितलं की, नद्यांमध्ये कसलेही पद्धतीने प्रदूषण न होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जर कुणी जाणीवपूर्वक चोरुन वगैरे नद्यांमध्ये जर काही त्यांनी पाणी सोडायचे ठरवले असेल तर आम्ही त्याच्यावर 100 टक्के कारवाई करणार, असेही ते यावेळी म्हणाले.

प्रश्न - एमपीसीबी बोर्डाच्या माध्यमातून अशा पद्धतीची कारवाई सुरू आहे का आणि आतापर्यंत कारवाई किती ठिकाणी केली आहे?

उत्तर - एमपीसीच्या माध्यमातून आमचे एम एस असतील किंवा फिल्ड ऑफिसर असतील अनेक ठिकाणी कोल्हापूर, सातारा किंवा अनेक मोठ्या मोठ्या नद्या आहेत. तिथून आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई केलेल्या काही कंपन्यांना नोटिसा दिल्या. क्लोजरच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यांच्याकडून ज्या काही नियमांमध्ये तरतूद येतात ते पूर्ण करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

प्रश्न - सध्या राज्यामध्ये राष्ट्रवादी नंबर एकचा पक्ष झाला आहे, अशा पद्धतीची चर्चा आहे हे कितपत खरे आहे? राष्ट्रवादी आगामी काळात राज्यात नंबर एकचा पक्ष होणार का आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहात?

उत्तर - आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्त्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड चालू आहे. आमच्या साहेबांचा एकच वाक्य एकच आम्हाला सूचना असते की, लोकांचे काम करा, ज्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही जाता त्याठिकाणी तुम्ही जनता दरबार व्हावा आणि विकासाच्या कामाबरोबर लोकांचे वैयक्तिक सार्वजनिक कामाच्या ठिकाणी केले पाहिजे. साहेब महिन्याला एकदा आमच्या सगळ्या मंत्रिगटाची बैठक घेत असतात. कोरोनाच्या संकटांमध्ये तुम्ही बघत असाल आम्ही अक्षरशः रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न आणि लोकांच्या आरोग्याची काळजी करण्याचं काम केलं. लोकांना दिसलं म्हणून आता गेल्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक याठिकाणी निवडून आले निवडून आलेले आहेत. भविष्यकाळाचा निवडणुकांमध्ये विकास आघाडीने एकत्रितपणे निवडणुका लढवण्यासाठी लोकांच्या समोर गेले तर त्याला शंभर टक्के यश येणार आहे. पक्षाचे आकडेवारी आणि भाजपच्या एका पक्षाची आकडेवारी बघा, भाजपने जास्त जागा लढवल्यामुळे त्यांच्या जागा जास्त दिसतात. मात्र, महाविकास आघाडीचे जर तुम्ही गोळाबेरीज केली तर ती प्रचंड मोठी आहे.

माझ्या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी केल्यामुळे आज आमच्या चार नगर पंचायतीच्या निवडणुका लातूर जिल्ह्यामध्ये झाल्या. त्याच्यामध्ये दोन महाविकास आघाडीच्या पूर्णपणे ताब्यात आलेले आहे. तरी एक त्रिशंकू आणि एक भाजपच्या ताब्यात गेलेली आहे. म्हणून राज्यांमध्ये महाविकास आघाडीने लोकांसमोर गेलं पाहिजे. लोकं एक्सेप्ट करतील आणि सबंध महाराष्ट्रमध्ये बीजेपी साफ होईल.

प्रश्न - राष्ट्रवादी काँग्रेस हा केवळ पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष आहे. त्याला मराठवाडा-विदर्भात पाय धरायला जागा नाही. हे कितपत खरं आणि यासाठी आपण काय करत आहात.

उत्तर - पश्चिम महाराष्ट्राचा पक्ष म्हणून हिणवला जातो. मराठ्यांचा पक्ष म्हणून पाहिला जातो. हे सगळं साफ खोट आहे. पवार साहेब हे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे नेते आहेत आणि मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये तेवढी शक्ती आहे. आज तुम्ही मंत्रिमंडळाचा चेहरा जर बघितला तुम्ही आज 14मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी काम करतात. त्यात 14पैकी आठ मंत्री इतर समाजातील आहेत. माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्ता, मागासवर्गीय तरुण कार्यकर्त्यांना कसलीही घरांमध्ये राजकीय पार्श्‍वभूमी नसताना पवार साहेबांनी एक पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता पक्षामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतो म्हणून मला एकदा सोडून दोनदा विधानसभेचे तिकीट दिलं आणि आमदार केलं. आज राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी एका सर्वसामान्य घरातल्या पोराला दिली. हे देशात फक्त देशात एकमेव नेता करतो. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर कुठे न्याय मिळत असेल तर ते फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मिळतो. म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ता हाच राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. सर्व जाती धर्माचे लोक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच जोडले गेले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.