ETV Bharat / state

Export Duty On Onion : कांद्रा प्रश्नी मुंबईतील बैठकीत तौडगा नाही; आता दिल्ली दरबारी बैठक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 7:00 AM IST

Updated : Sep 27, 2023, 7:40 AM IST

Etv Bharat
Etv Bharat

Export Duty On Onion : कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी (26 सप्टेंबर) मुंबईत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत राज्यातील मंत्री आणि शेतकरी, व्यापारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आला नाही. आता येत्या 29 सप्टेंबरला दिल्लीत होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती गोयल यांनी दिली.

मुंबई : Export Duty On Onion : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 'नाफेड' आणि 'एनसीसीएफ' यांनी शेतकऱ्यांचा कांदा थेट बाजार समिती आवारातून खरेदी करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. याबाबत २९ सप्टेंबरला दिल्ली येथे बैठकीत योग्य निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली. दिल्ली येथील बैठकीस राज्य मंत्रिमंडळ सदस्यांचं शिष्टमंडळ उपस्थित राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Export duty On Onion
कांदा विषयावर मुंबईत झालेली बैठक

कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी, ग्राहक वर्गाच्या हिताचा विचार राज्य सरकारच्याकडून केला जाईल. त्यामुळं आपण कांदा लिलाव सुरू करावा - पियुष गोयल, केंद्रीय मंत्री

मुंबईतील बैठकीत तोडगा नाही : नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्नावर सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे मंगळवारी विशेष बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, मंत्री अब्दुल सत्तार, आमदार सर्वश्री हिरामण खोसकर, राहुल आहेर, नितीन पवार, दिलीप बनकर, अॅड. माणिकराव कोकाटे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, बाजार समिती संचालक उपस्थिती होते.

दिल्लीत तोडगा लवकरच निघेल : सह्याद्री अतिथीगृहावर कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र, केंद्रीय सचिव या बैठकीला उपस्थित नव्हते, म्हणून या बैठकीत काही ठोस निर्णय घेता आला नसल्याची माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. बैठकीमध्ये सर्व विषयांवर चर्चा झाली. मात्र, तोडगा निघालेला नाही. या संदर्भात पुन्हा दिल्ली येथे 29 तारखेला बैठक पार पडणार आहे. दिल्लीत होणाऱ्या बैठकीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना नक्कीच न्याय मिळेल, अशी अशा सत्तार यांनी व्यक्त केली.

Export duty On Onion
कांदा विषयावर मुंबईत झालेली बैठक

शरद पवारांची मागणी : कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्कामुळं शेतकरी अडचणीत सापडलाय. त्यामुळं केंद्र सरकारनं तत्काळ निर्यात शुल्क मागं घ्यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारकडं केली आहे. पियुष गोयल यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, असं आवाहन देखील शरद पवार यांनी केलंय.

हेही वाचा -

  1. Onion Traders Closure: लासलगाव कांदा व्यापारी बंदवर ठाम, परवाने रद्द करून भूखंड जमा करण्याची कारवाई केली जाणार..
  2. Strike of Onion Traders : कांदा व्यापाऱ्यांच्या बेमुदत बंदचा शेतकऱ्यांना फटका; नाशिकातील सर्व बाजार समित्या बंद
  3. Onion Seller Farmers : नाफेडने कांदा खरेदीसाठी लादल्या जाचक अटी; शेतकरी अडचणीत
Last Updated :Sep 27, 2023, 7:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.