ETV Bharat / state

'हिंदमाता परिसरातील जलकोंडीचा प्रश्न सुटणार'

author img

By

Published : May 24, 2021, 8:34 PM IST

हिंदमाता परिसरात पाणी साचून नागरिकांचे होणारे हाल यावर्षी बंद होणार आहेत. यावर्षी या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी विशेष प्रकल्प राबवला जात असून, याकडे स्वतः पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्ष दिले आहे.

'हिंदमाता परिसरातील जलकोंडीचा प्रश्न सुटणार'
'हिंदमाता परिसरातील जलकोंडीचा प्रश्न सुटणार'

मुंबईत - पाऊस पडला आणि मुंबईतील सखल भागात पाणी साचलं नाही असे सहसा होत नाही. मुंबईत सलग 2 तास जरी पाऊस पडला, तरी मुंबईतील सखल भागात पाणी साचते आणि यामध्ये दादर येथील हिंदमाता परिसराचा प्रामुख्याने समावेश असतो. दरवर्षी पालिका प्रशासन हिंदमाताला पाणी साचू नये म्हणून प्रयत्न करते. परंतु, हे प्रयत्न कायम अयशस्वी होतात. यावर्षी या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी विशेष प्रकल्प राबवला जात असून, याकडे स्वतः पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्ष दिले आहे.

'हिंदमाता परिसरातील जलकोंडीचा प्रश्न सुटणार'

'पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष'

मुंबईत पावसाळा सुरू झाला की, दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतल्या हिंदमाता परिसरात जलकोंडी पाहायला मिळते. दरवेळी तिथे पूरपरिस्थिती निर्माण होत असून, मोठ्या प्रमाणात पाणी साचते. मात्र, आता मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे हिंदमाता येथील जलकोंडी या पावसाळ्यात फुटणार आहे. हिंदमाता येथील पावसाळ्यातील जलकोंडी फोडण्यासाठी महानगर पालिका भूमिगत टाक्या बांधत असून, या टाक्यांचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या टाक्यांचं काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. स्वतः आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पाची पाहणी केली असून, याचे काम अगदी जोमाने सुरू आहे.

'नागरिकांचा त्रास वाचणार'

मुंबईत सकाळी पावसाला सुरुवात झाली की हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. एकही पावसाळा असा नाही, ज्यामध्ये हिंदमताला पाणी साचलं नाही. नगरसेविका उर्मिला पांचाळ म्हणाल्या, यापासून सर्वांची सुटका व्हावी. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी या कामाची पाहणी केली. आदित्य ठाकरे यांनी नगरसेवका उर्मिला पांचाळ, अतिरिक्त आयुक्त वेलारुसू, संबंधित खात्याचे इंजिनिअर्स यांच्यासह प्रमोद महाजन आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा - न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर शिक्षण विभागाची धावपळ; दहावीच्या निकालासंदर्भात महाधिवक्त्यांसोबत बौठक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.