ETV Bharat / state

Graduate Constituency Elections : दोन पदवीधर, तीन शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

author img

By

Published : Jan 2, 2023, 6:42 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

दोन पदवीधर, तीन शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम ( Graduate Election ) जाहीर आज निवडणुक आयोगाने ( Election Commission ) जाहीर केला. राज्य विधानपरिषदेच्या दोन पदवीधर ( Graduate Constituency Elections ) तीन शिक्षक मतदार संघातील ( Teachers Constituency Elections ) रिक्त होणाऱ्या एकूण 5 जागांसाठी 30 जानेवारीला मतदान होणार आहे.

दोन पदवीधर, तीन शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई - शिक्षकचे लक्ष लागून असलेल्या महत्वाच्या निवडणुका पुढील काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्य विधानपरिषदेच्या दोन पदवीधर ( Graduate Constituency Elections ) तीन शिक्षक मतदार संघातील ( Teachers Constituency Elections ) रिक्त होणाऱ्या एकूण 5 जागांसाठी भारत निवडणूक आयोगाने आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या वेळापत्रक नुसार 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार असून 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल तर, 4 फेब्रुवारी रोजी मतदानाची सर्व प्रक्रिया होईल.

5 जानेवारी रोजी आचारसंहिता - या मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून 5 जानेवारी रोजी आचारसंहितेची सुरुवात केली जाईल. इच्छुक उमेदवारांना 12 जानेवारीपर्यंत आपला उमेदवारी अर्ज भरावा लागेल. 13 जानेवारी रोजी उमेदवारी अर्जातील त्रुटी दुरुस्ती केल्या जातील. 16 जानेवारीपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.

पदवीधर मतदारसंघ चुरशीची निवडणूक - पदवीधर मतदारसंघांपैकी नाशिक, अमरावती या पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे, अमरावती पदवीधर मतदारसंघातून डॉ. रणजीत पाटील यांची मुदत 7 फेब्रुवारी रोजी संपत आहे. या दोन्हीही मतदारसंघातून ते पुन्हा मैदानात उतरणार आहेत.

शिक्षक मतदारसंघात मंत्र्यांचे आप्तेइष्ट उभे राहणार - शिक्षक मतदार संघापैकी औरंगाबाद, नागपूर, कोकण शिक्षक या मतदारसंघातील विद्यमान आमदारांची मुदत ही 7 फेब्रुवारी रोजी संपणार असल्याने या मतदारसंघात या निवडणुका होत आहेत. औरंगाबाद शिक्षक मतदार संघात विद्यमान आमदार विक्रम काळे हे असून ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदारसंघात मैदानात येणार आहेत. नागपूर शिक्षक मतदार संघात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार हे विद्यमान आमदार असून त्यांना पुन्हा एकदा याच मतदारसंघातून शिक्षक परिषदेने उमेदवारी जाहीर केली आहे.


भाजपा मंत्र्याच्या नातेवाईकाची लॉबिंग सुरू - कोकण शिक्षक मतदार संघातून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे विद्यमान आमदार आहेत. त्यांना पुन्हा एकदा आपल्या पक्षाकडून संधी दिली आहे. मात्र अद्यापही राष्ट्रवादी इतर सहयोगी पक्षांकडून त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला नाही. त्यातच याच मतदारसंघात शिंदे गटाच्या शिक्षक सेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मागील सहा महिन्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र, त्यांच्या विरोधात या मतदारसंघात भाजप शिक्षक आघाडीने जोरदार लॉबिंग सुरू केली आहे.

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या पुतण्यांला उमेदवारी? ठाणे जिल्ह्यातील विद्यमान केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या पुतण्यांना ऐनवेळी भाजप शिक्षक आघाडी मार्फत उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे म्हात्रे यांची गोची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांना मानणारा एक गट ऐनवेळी या मतदार संघात उतरण्याच्या तयारीत असल्याने या मतदारसंघातील निवडणूक मोठी रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.

धनाजी पाटील यांना कोकण शिक्षक मतदार संघातून उमेदवारी - यासंदर्भात शिक्षक भारती यांच्या वतीने धनाजी पाटील यांना कोकण शिक्षक मतदार संघामधून उमेदवारी दिलेली आहे. त्यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितले की," जुनी पेन्शन योजना लागू करणे, घोषित अघोषित विनाअनुदानित शाळातील शिक्षकांच्या संदर्भातलं अनुदान, शिक्षक भरतीसाठी शासनाकडून होणारा विलंब, शिक्षक संच मान्यता या सर्व धोरणात्मक मुद्द्यांवर शासनाकडून दिरंगाई होत आहे. याचा परिणाम शालेय शिक्षणाचा दर्जा घालवण्यात होतो आहे. याबाबत आवाज उठवण्यासाठी ही उमेदवारी करत असल्याचे त्यांनी म्हटले."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.