ETV Bharat / state

Jayant Patil Show Letter : विधान परिषदेच्या राष्ट्रवादी गटनेतेपदी एकनाथ शिंदे? जयंत पाटलांनी उघडकीस आणले पत्रातील सत्य

author img

By

Published : Mar 13, 2023, 3:14 PM IST

Jayant Patil Show Letter
जयंत पाटीलांनी उघडकीस आणले पत्रातील सत्य

विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी एकनाथ शिंदे आणि प्रतोदपदी अनिकेत तटकरे यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र विधान परिषद उपसभापतींकडून देण्यात आले आहे, अशी धक्कादायक माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली. एकनाथ शिंदे हे सर्वपक्षीय नेते आहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी मिश्कीलपणे उपस्थित केला.

मुंबई : विधान परिषदेतील राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी आमदार एकनाथ खडसे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करणारे पत्र आपण विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांना यापूर्वीच दिले होते, अशी माहिती आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभागृहात दिली. मात्र त्या पत्रावर कोणतीही कारवाई न करता, विधान परिषदेकडून आपल्याला एक पत्र प्राप्त झाले आहे. त्या पत्रामध्ये राष्ट्रवादीच्या गटनेते आणि प्रतोदपदी रिक्त असलेल्या जागी नियुक्ती करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

पत्रात लिहीले की, एकनाथ शिंदे गटनेते : या पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात येत असून; प्रतोदपदी अनिकेत तटकरे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र देण्यात आले आहे. आपण दिलेल्या पत्रावर कुठलीच कारवाई न करता, अशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्ती झाल्याचे कसे काय पत्र काढले आहे आणि वेबसाईटवरही ते कसे टाकले गेले आहे?, जयंत पाटीलांनी उपस्थित केला प्रश्न.

माझेही गटनेतेपद धोक्यात : दरम्यान असे असेल तर माझेही विधानसभेतील गटनेते पद धोक्यात आले आहे असे समजावे का? नागालँड चा मुख्यमंत्र्यांप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही सर्वपक्षीय नेते झाले आहेत का? देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी नुकतेच बदलले आहेत. ते आणखीन सर्व पदे बदलणार आहेत का? अशी मिशकील टोलेबाजी यावेळी जयंत पाटील यांनी सभागृहात केली.

विधानसभेत मुद्दा उपस्थित : विधान परिषदेच्या प्रतोद पत्रात मोठी चूक झाली आहे. राष्ट्रवादी विधानपरिषद गटनेते पदावर एकनाथ शिंदे यांचे नाव आहे, असे जयंत पाटीलांनी निदर्शनास आणुन दिले. पत्रातील चुकीचा मुद्दा जयंत पाटलांनी विधानसभेत उपस्थित केला आहे.

योग्य ती कारवाई करू : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, जयंत पाटील यांनी दिलेली माहिती विधानपरिषदेच्या कामाकाजाची दिसत आहे. पत्रात विधिमंडळाचा उल्लेख असल्याने, संबंधीत प्रकरणाची सखोल चौकशी करुन; योग्य ती कारवाई करु.

हेही वाचा : Thane ZP Corruption case : ठाणे जिल्हा परिषद सदस्यानेच भ्रष्टाचार आणला उघडकीस प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.