ETV Bharat / state

जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल यांच्या घरावर ईडीची छापेमारी

author img

By

Published : Mar 5, 2020, 7:57 AM IST

Updated : Mar 5, 2020, 10:03 AM IST

jet-airways-president-naresh-goyal
जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल

मनी लाँड्रींग प्रकरणात जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल दोषी असण्याची शक्यता आहे. गोयल यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) धाड टाकली.

मुंबई - जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल यांच्या खंबाला हिल येथील घरावर सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) धाड टाकली. मनी लाँड्रींग प्रकरणात गोयल यांचा समावेश असल्याच्या संशय आहे, त्यामुळे ईडीने ही कारवाई केली.

नरेश गोयलच्या घरावर ईडीची धाड

यापूर्वी ईडीने फेमा अंतर्गत दिल्ली आणि मुंबई येथे 12 ठिकाणी तपासणी केली होती. यात जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांच्या घरांचा समावेश होता. या तपासणीमध्येच गोयल यांच्या विविध 19 कंपन्यांची माहिती समोर आली होती. यातील 5 कंपन्यांची नोंदणीही झालेली आहे. या आगोदर 25 मे 2019 ला नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांनी लंडनला पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या दोघांच्या विरोधात लूक आउट नोटीस निघाल्याने त्यांना तत्काळ विमानातून उतरवून पुन्हा त्यांच्या घरी पाठवण्यात आले होते.

हेही वाचा - कोरोनामुळे विमानसेवा बंद, 44 भारतीय इराणमध्ये अडकले

नरेश गोयल अप्रत्यक्षपणे या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करत होते. कर वाचवण्यासाठी गोयलने अनेक परदेशी कंपन्यांसोबतही काही आर्थिक व्यवहार केल्याचे पुरावे ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाले आहेत.

Last Updated :Mar 5, 2020, 10:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.