ETV Bharat / state

ED Raid : मुंबईसह नागपुरात ईडीची मोठी कारवाई; 15 ठिकाणी छापे टाकत केले करोडोंचे दागिने आणि रोकड जप्त

author img

By

Published : Mar 6, 2023, 6:39 PM IST

मुंबई तसेच नागपूरमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने 15 ठिकाणी छापेमारी करत मोठी कारवाई केली आहे. ईडीने केलेल्या छापेमारीत 5.51 कोटींचे दागिने आणि 1.21 कोटींची रोकड जप्त केली आहे. गुंतवणूक घोटाळा आणि पीएमएलए 2002 प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

ED Raid in Nagpur
करोडोंचे दागिने आणि रोकड जप्त

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्यात सर्च ऑपरेशन करत मोठी कारवाई केली आहे. ईडीने मुंबई आणि नागपूरमधील 15 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. पंकज मेहदिया, लोकेश आणि कथिक जैन यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या फसवणुकीसंदर्भात हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. आतापर्यंत ईडीकडून 5.51 कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि 1.21 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. गुंतवणूक घोटाळा आणि पीएमएलए 2002 प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मोठी कारवाई केल्यानंतर ईडीने पुढील तपास सुरूवात केली आहे.

ईडीची मोठी कारवाई : ईडीच्या माहितीनुसार कथित घोटाळ्यातील मुख्य आरोपी पंकज मेहदिया, लोकेश जैन आणि कार्तिक जैन यांच्या निवासस्थानांची आणि कार्यालयांची झडती घेण्यात आली. याशिवाय मुख्य लाभार्थ्यांचे कार्यालय व निवासी जागेवरही झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान 5.51 कोटी रुपयांचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने, सुमारे 1.21 कोटी रुपयांची रोकड, डिजिटल उपकरणे आणि विविध गुन्हे दाखले जप्त करण्यात आले आहेत.

पीएमएलए कायद्याअंतर्गत तपास सुरू : पंकज नंदलाल मेहदिया, लोकेश संतोष जैन, कार्तिक संतोष जैन, बालमुकुंद लालचंद ननताल, प्रेमल यांच्या विरोधात नागपूरातील सीताबर्डी पोलिस स्टेशन एफआयआर नोंद करत प्राथमिक आधारावर पीएमएलए कायद्या अंतर्गत तपास सुरू केला आहे. ईडीने केलेल्या कारवाईमुळे मेहदिया गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. पंकज नंदलाल मेहदिया इतर साथीदारांसह पॉन्झी स्कीम चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. 2004 ते 2017 दरम्यान केलेल्या गुंतवणुकीवर TDS कापून 12 टक्के खात्रीशीर परतावा देण्याचे आश्वासन देऊन विविध गुंतवणूकदारांना आमिष दाखवण्यात आले. याप्रकरणी ईडीकडून पुढील तपास सुरू आहे.

अलीकडेच झाली होती छापेमारी : अलिकडेच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नागपुरचे प्रसिद्ध व्यापारी रामदेव अग्रवाल यांचे ऑफिस आणि निवासस्थानी छापा टाकला होता. नागपूरातील काही जमिन व्यवहारांबाबत ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

हेही वाचा: ED Raid in Nagpur: नागपूरातील व्यापारी रामदेव अग्रवाल यांच्या कार्यालय तसेच निवासस्थानी ईडीचा छापा; काय आहे प्रकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.