ETV Bharat / state

Body Bag Scam Case : BMC अतिरिक्त आयुक्तांची 'ईडी'कडून 6 तास चौकशी, माजी महापौरांची बुधवारी होणार चौकशी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 10:08 PM IST

Body Bag Scam Case : ईडीने मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू (P Velrasu) यांची कोविड दरम्यान झालेल्या बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी सुमारे 6 तास चौकशी करण्यात आली. कोविड काळात वाढीव दराने बॉडी बॅग खरेदी केल्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर (kishori Pednekar) यांना ईडीनं समन्स बजावला आहे. बुधवारी (८ नोव्हेंबर) किशोरी पेडणेकर यांची ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे.

Body Bag Scam Case
आयुक्त पी. वेलरासू यांची चौकशी

मुंबई Body Bag Scam Case : अंमलबजावणी संचालनालयाने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) आणि माजी उपमहापालिका आयुक्त (खरेदी/सीपीडी) यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) गुन्हा दाखल केला होता. या लोकांवरील कथित आरोप असा आहे की, कोविडच्या काळात वाढीव दराने बॉडी बॅग खरेदी करण्यात खाजगी कंत्राटदार वेदांत इनोटेक आणि अन्य अज्ञात सरकारी कर्मचारी सहभागी होते. या कथित घोटाळ्यादरम्यान, 49.63 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणी ईडीने तपासाचा फास आवळला आहे. जुलै महिन्यात, शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि सहकारी 46 वर्षीय सुजित मुकुंद पाटकर आणि 55 वर्षीय बीएमसी डॉक्टर किशोर बिसुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर दोघांनाही अटक करण्यात आली.

चौकशी करण्यासाठी खटला दाखल : कथित कोट्यवधींच्या घोटाळ्याच्या संबंधात ईडीचा सध्याचा खटला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 4 ऑगस्ट रोजी पेडणेकर यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरवर आधारित आहे. मृत कोविड रुग्णांसाठी खरेदी केलेल्या बॉडी बॅगमधील कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी हा खटला दाखल करण्यात आला होता. पेडणेकर आणि बीएमसीच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कलम ४०९, ४२० आणि १२०बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



बॉडी बॅग घोटाळ्यात गुन्हा दाखल : कोरोना महामारीच्या काळात बीएमसीच्या कामकाजातील कथित अनियमिततेच्या चौकशीचा भाग म्हणून ईडीनं बिरादार यांचा जबाब नोंदवला होता. चौकशीत असलेल्या खासगी कंपनीनं मृत रुग्णांसाठी बॉडी बॅग प्रति बॅग ६ हजार ७१९ रुपये या दराने बीएमसीला पुरवल्याचं ईडीच्या पूर्व तपासात आढळून आलं. तर बाजारात प्रति बॉडी बॅग सुमारे २ हजार रुपयांना उपलब्ध होती. १८ जुलै रोजी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांनी कोरोना महामारीच्या काळात खर्चात अनियमितता केल्याचा आरोप करत केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता.



किशोरी पेडणेकरांवर आरोप काय? : कोरोना काळात मुंबई महापालिकेकडून रुग्णालयांसाठी मृतदेहांच्या बॉडी बॅग खरेदी करताना १८०० रुपयांची एक बॅग ६८०० रुपयांना विकत घेतल्याचं सांगितलं जातय. हा व्यवहार माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सूचनेनुसार झाल्याचा आरोपही करण्यात आलाय. आर्थिक गुन्हे विभागाकडून कथित आरोपांनंतर मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात ५ ऑगस्ट २०२३ ला किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा तर कलम १२० ब अंतर्गत जाणीवपूर्वक कारस्थान करुन घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. महापालिकेत कोरोना काळात कथित चार मोठे घोटाळे झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा -

  1. Kishori Pednekar News : ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची आर्थिक गुन्हे शाखेकडून दोन तास चौकशी, नेमक प्रकरण काय?
  2. BMC Dead Body Bag Scam : किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स, महापालिका अतिरिक्त आयुक्तांची आज होणार चौकशी
  3. Body Bag Scam Case: बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात महापौर किशोरी पेडणेकर यांची पुन्हा शुक्रवारी होणार चौकशी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.