ETV Bharat / state

Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे रंगली शाहिरांची मैफिल

author img

By

Published : Dec 5, 2022, 6:04 PM IST

Mahaparinirvana day
चैत्यभूमीला भेट

दादर येथील शिवाजी पार्क नजिक असलेली चैत्यभूमी (Chaityabhoomi) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे स्मृतिस्थळ. या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण (followers thronged large numbers to pay homage) करण्यासाठी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (66th Mahaparinirvana day) भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाले आहेत.

मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (66th Mahaparinirvana day) भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाले आहेत. दादर येथील शिवाजी पार्क नजिक चैत्यभूमीवर (Chaityabhoomi) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण (followers thronged large numbers to pay homage) करण्यासाठी येत असतात. मागील दोन वर्ष कोरोनामुळे बाबासाहेबांच्या विचारांना मांडणाऱ्या अनेक अनुयायांना त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येता आलं नाही. मात्र आता कोरोनाचे सर्व निर्बंध उठल्यानंतर जगभरातून लाखो अनुयायी दादर परिसरात दाखल झाले आहेत.

प्रतिक्रिया देतांना भीम अनुयायी


मुंबईत ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने शिवाजी पार्कवर भीम अनुयायी दाखल झाले आहेत. याच अनुयायांचे मनोरंजन, समाजप्रबोधन करण्यासाठी अनेक भीमसैनिक तिथे उपस्थित असतात. यामध्ये गायक, शाहीर, वादक दरवर्षी येत असतात. अकोल्यातील शाहीर सुरेश गुलाबराव शिरसाट हे देखील आपल्या गायक, वादकांसोबत गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत येत असतात. गेले दोन वर्ष कोरोना असल्यामुळे चैत्यभूमीवर येण्यास मिळालं नाही. गेल्या २० वर्षापासून सुरेश या क्षेत्रामध्ये आहेत. ते कुठेही नोकरी करत नाही. गाण्यांमधून समाज प्रबोधनाचे काम ते करत असतात. आणि गाण्याच्या माध्यमातूनच ते आपलं उदरनिर्वाह करत असल्याचे सुरेश शिरसाट सांगतात.



गौतम दशरथ अंभोरे हे वयाच्या अठरा वर्षापासून या क्षेत्रात नाल वादक म्हणून कार्यरत आहेत. ते दरवर्षी न चुकता चैत्यभूमी येथे येत असतात. गौतम हे जन्मतः अंध आहेत. 'जन्माचा मी अंधा आहे, कुणी निंदा करवंदा, गीत गायनाचा माझा धंदा' असं माझं समाज प्रबोधनाच काम आहे, असं गौतम अंभोरे सांगतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.