ETV Bharat / state

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी बोलू नका, अन्यथा होऊ शकते फसवणूक

author img

By

Published : Aug 16, 2021, 5:25 PM IST

Updated : Aug 16, 2021, 6:17 PM IST

file photo
संग्रहित छायाचित्र

मुंबई पोलिसांच्या सायबर विभाने विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांची फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक केली आहे तर एकाचा शोध सुरू आहे. हे सर्वजण महिलांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून काही दिवसांनी त्यांना महागडी भेटवस्तू पाठवली आहे, असे सांगत. त्यानंतर संबंधित महिलेला एक फोन येत असे व तुमच्या नावे एक वस्तू आली आहे कस्टम ड्यूटी कर भरा आणि न्या, असे सांगितसे जात. महिला ते पैसे भरत असे. पण, त्या बदल्यात महिलेला काहीच मिळत नसे, अशी फसवणूक करत होते.

मुंबई - तुम्ही सोशल मीडियावर अनोळखी व्यक्ती बरोबर बोलत आहात; तर सावधान व्हा. कारण रातोरात तुम्ही गंडवले जाऊ शकता. तुमच्या अकाउंटमधून तुम्ही स्वतःची लाखोची रक्कम त्यांना ट्रान्सफर करू शकता. हे आम्ही नाही तर महाराष्ट्र सायबर विभागाचे अधिकारी सांगत आहेत. सायबर विभागाने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे आणि चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे. हे सगळे नटवरलाल सोशल मीडियावर आपले सावज हेरायचे आणि यांना रातोरात गंडवायचे. हे सगळे आरोपी इतकेच चतूर होते की त्यांनी आपले बस्तान देशातील विविध राज्यांमध्ये बसवले होते.

बोलताना सायबर विभागाचे पोलीस उपायुक्त

आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत

हे सगळे आरोपी सावज म्हणून एकट्या राहणाऱ्या, घटस्फोटीत किंवा थोड्याशा वयस्क महिलांना हेरायचे. त्यांच्याशी सोशल मीडियावर गोड बोलायचे. खोट्या मैत्रीच्या जाळ्यात महिला अडकली की त्या महिलेला हे आरोपी सांगायचे की, 'आम्ही तुम्हाला काही रक्कम पाठवत आहोत'. ही रक्कम युरोमध्ये किंवा डॉलरमध्ये असल्याचे ते सांगायचे. काहींना महागडे दागिने किंवा फोन पाठवणार असल्याचे सांगायचे. एक-दोन दिवसात या महिलांना एक फोन यायचा. मुळात हा फोन फेक असायचा. मग या फेक फोनवरून समोरची व्यक्ती या महिलांना काही रक्कम भरण्यास सांगायची. ही कस्टमड्युटी आहे ती तुम्हाला भरावी लागेल, असे सांगितले जायचे. पुन्हा काही वेळानंतर एखादा सर्टिफिकेट बनवायचा आहे, असे सांगून पैशांची मागणी व्हायची. कोणत्या ना कोणत्या कारणावरून सातत्याने पैशाची मागणी व्हायची आणि पीडित महिला ते पैसे देत राहायची. काही प्रकरणांमध्ये काही महिलांनी 18 लाखांपासून ते 40 लाख रुपयापर्यंतचे पैसे या आरोपींना दिले आहेत. जेव्हा कधी या महिला या आरोपींना आम्हाला भेटा, असे सांगायच्या तेव्हा कोणते ना कोणते कारण देऊन हे आरोपी पळ काढायचे. सायबर विभागाकडून तपासात असे निष्पन्न झाले आहे की या आरोपींनी हैदराबादमधील आठ जणांना तर मुंबईतील 4 जणांना गंडवले आहेत. इतकच नव्हे तरीही आरोपी इंस्टाग्राम आणि स्नॅप चॅटवरून मॉडेल्स व बॉलीवूड मधील काही कलाकारांना गंडवण्याच्या प्रयत्नात होते, असेही आरोपींच्या मोबाईलच्या तपासणीतून समोर आला आहे.

आरोपींना कुठून केली अटक

आरोपींचा शोध अनेक दिवसांपासून सुरू होता. पण, सायबर विभागाकडून रचण्यात आलेल्या जाळ्यात ते अडकले. चोरांना उत्तर प्रदेश, गुजरात आणि उडीशातून अटक करण्यात आली आहे. या तीन चोरांपैकी एक चोर अभियंता आहे तर बाकीचे दोघे विज्ञान शाखेतील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या तिघांचा आणखीन एक साथीदार फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 17 एटीएम , 7 लॅपटॉप आणि 17 मोबाईल, विदेशी चलन, पासबूक जप्त करण्यात आले आहे.‌

पोलिसांकडून आवाहन

जर तुम्हाला अशी फ्रेंड रिक्वेस्ट आली किंवा समोरून एखादी व्यक्ती गोड बोलू लागली तुम्हाला मैत्रीच्या जाळ्यात ओढू लागली तुम्हाला काही पैसे अथवा महागडे गिफ्ट पाठवू, अशी आश्वासने देऊ लागली त्यावेळेस तात्काळ तुम्ही पोलिसांशी संपर्क साधा. तुमची होणारी फसवणूक टाळा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा - विद्यार्थ्यांनी काढलेली सुंदर चित्रे म्हणजे कोरोना काळात केलेल्या कामाची पोचपावती - महापौर पेडणेकर

Last Updated :Aug 16, 2021, 6:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.