ETV Bharat / state

धनंजय मुंडेनी राजीनामा द्यावा - किरीट सोमय्या

author img

By

Published : Feb 4, 2021, 2:08 PM IST

मुंडेंच्या विरोधात पीडित महिलेने मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाकडे संपर्क साधला आहे. पीडित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत मुंडे यांच्यावर बलात्कार, अनैसर्गिक लैंगिक संबंध, अपहरण आणि घरगुती हिंसाचाराचा आरोप करत तक्रार नोंदवण्याची मागणी केली आहे.

धनंजय मुंडेनी राजीनामा द्यावा - किरीट सोमय्या
धनंजय मुंडेनी राजीनामा द्यावा - किरीट सोमय्या

मुंबई - राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ज्या महिलेसोबत संबंध असल्याचे मान्य केले होते त्या करुणा शर्मा यांनी मुंडे यांच्याविरोधात तक्रार केल्याची माहिती बुधवारी समोर आली आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांच्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप केला आहे. मात्र यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा अडचणीत येताना दिसत आहेत. मुंडेंच्या विरोधात पीडित महिलेने मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाकडे संपर्क साधला आहे. पीडित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत मुंडे यांच्यावर बलात्कार, अनैसर्गिक लैंगिक संबंध, अपहरण आणि घरगुती हिंसाचाराचा आरोप करत तक्रार नोंदवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे अनेक बाजपा नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

धनंजय मुंडेनी राजीनामा द्यावा - किरीट सोमय्या
मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात पीडितेने बुधवारी दिलेल्या तक्रारीत असेही म्हटले आहे, की धनंजय मुंडे यांनी आपल्या दोन मुलांना चित्रकूट नावाच्या बंगल्यावर ठेवले होते. आम्हाला त्याला भेटायलाही दिले जात नाही. पीडित महिलेने मुंडे यांच्या कार्यालयासमोर उपोषणाची धमकी दिली आहे. दुसरीकडे या विषयावर भाजप नेते किरीट सोमैया यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यात लक्ष घालायला हवे, तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, असेही ते म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आता आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. धनंजय मुंडेंनी ज्या महिलेसोबत संबंध असल्याचं मान्य केलं होतं त्या करुणा शर्मा यांनीच आता एकदा तक्रार केली आहे. यापूर्वी करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी तक्रार केली होती. मात्र त्यांनी ती तक्रार मागे घेतली होती. यानंतर आता धनंजय मुंडे यांनी ज्या महिलेबाबत आपण सहमतीने संबंधात होतो, त्या करुणा शर्मा यांनी मौन सोडलं आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांच्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यांपासून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा - आरोपात तथ्य नाही; करुणा शर्मांच्या तक्रारीवर धनंजय मुंडेंचा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.