ETV Bharat / state

Devendra Fadnavis : अजित पवार-शरद पवार भेट; देवेंद्र फडणवीस म्हणाले, No Big Deal

author img

By

Published : Jul 16, 2023, 5:21 PM IST

राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांनी रविवारी शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले. यावर विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या भेटीवर भाष्य केले आहे. या भेटीत काही विशेष असे नसल्याचे फडणवीस म्हणाले.

Etv Bharat
देवेंद्र फडणवीस

मुंबई - शरद पवार हे त्यांचे नेते आहेत. त्यामुळे ते सर्व नेते त्यांना भेटायला गेले असावेत, यात काही विशेष नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्र्वादीच्या बंडखोर नेत्यांनी रविवारी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावरून आता नवीन राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

  • Mumbai | Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis speaks on Ajit Pawar factions leaders' meeting with Sharad Pawar, says, "Since years Sharad Pawar was their leader so they must have gone to meet him, no big deal in it." pic.twitter.com/evkCKDarHx

    — ANI (@ANI) July 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बंडखोर आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट - रविवारी सकाळी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री वायबी चव्हाण सेंटरला पोहोचले. अजित पवार यांच्या गटाने शरद पवार यांची भेट घेतली. यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. ही माहिती मिळताच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखील तातडीने वायबी चव्हाण सेंटरवर दाखल झाले होते.

शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्याकडे आलो होतो. राष्ट्रवादीने एकसंध राहावे, अशी विनंती आम्ही शरद पवार यांच्याकडे केली आहे. यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही - प्रफुल्ल पटेल, नेते, अजित पवार गट

बंडखोर आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान या सर्व नेत्यांनी झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच या चर्चा करुन मार्ग काढण्याची विनंतीही या सर्व नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. यावर चर्चा करुन आम्ही भूमिका स्पष्ट करू - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, शरद पवार गट

राष्ट्रवादीच्या आमदारांची भूमिका महत्वाची - विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होत आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येणार आहेत. राष्ट्रवादीतील आमदार या पावसाळी अधिवेशनात किती आक्रमक होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा -

  1. Praful Patel : शरद पवारांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे दैवत...
  2. NCP Political Crisis : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवारांकडे केली दिलगिरी व्यक्त; मार्ग काढण्याची विनंती - जयंत पाटील
  3. Monsoon Session 2023: पावसाळी अधिवेशन 'या' मुद्द्यांवरून ठरणार वादळी; पक्षांच्या फोडाफोडीनंतर विरोधक आक्रमक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.