ETV Bharat / state

Devendra Fadnavis : जाहिरातींमधून तरुण पिढी बरबाद करणाऱ्या कलाकारांना फडणवीसांनी फटकारले

author img

By

Published : Jul 24, 2023, 3:55 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

छत्रपती संभाजीनगरमधील गुन्हेगारी आणि ऑनलाईन गेमिंग, गुटखा, जुगार याबद्दल विधान परिषदेत विरोधी पक्षाने प्रश्न उपस्थित केला होता. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. ऑनलाईन जुगार, गुटखा याची जाहिरात करताना कलाकारांनी सामाजिक बांधिलकी व दायित्व लक्षात ठेवावे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबई - विधान परिषदेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठया प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असून त्यावर कारवाई करण्यासंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. शहरात होणाऱ्या अवैध व्यवसायांना पोलिसच संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे. याच दरम्यान राज्यात सुरू असलेला ऑनलाईन जुगाराचा मुद्दा आमदार अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केला.

गृहमंत्र्यांचे उत्तर - याला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ऑन लाईन जुगाराला सर्वोच्च न्यायालयाने अधिकृत मान्यता दिल्याने त्यावर कारवाई करता येत नाही. पण, याची जाहिरात करण्याऱ्या कलाकारांनी याबाबत विचार करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन रम्मी घातक खेळ - संभाजीनगरमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी व अवैध व्यवसायाबाबत अंबादास दानवे यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करत पुरावेसुद्धा सभागृहात सादर केले. तसेच शहरात जुगाराच्या पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी अनेकठिकाणी 'क्यू आर कोड लावले असल्याची माहितीसुद्धा दानवे यांनी सभागृहात दिली. याच दरम्यान आमदार अभिजीत वंजारी यांनी राज्यात ऑनलाईन गेमिंगबाबत मुद्दा उपस्थित करत यावर बंदी घालण्याची मागणी केली. विशेष करून ऑनलाईन रम्मी या खेळाबाबत त्यांनी लक्ष वेधले.

खेळाला गेम ऑफ स्किल असे म्हटले - विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व अभिजीत वंजारी यांनी केलेल्या आरोपावर राज्याचे गृहमंत्री यांनी उत्तर देताना म्हटले की, विरोधी पक्षनेते दानवे यांनी सादर केलेली यादी तपासून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. अशा प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्याचे कारण नाही. याची संपूर्ण चौकशी केली जाईल. तर ऑनलाईन गेमिंगबाबत फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने या खेळाला गेम ऑफ स्किल असे म्हटले असून जीएसटी काउन्सिलमध्ये यावर २७ टक्के जीएसटीसुद्धा लावण्यात आला आहे. म्हणून ज्याला सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. त्यावर कारवाई करणे शक्य नाही.

सचिन तेंडुलकर यांची प्रशंसा - ऑनलाईन गेमिंग व गुटखा याचा विपरीत परिणाम युवा पिढीवर होत असून, ती बरबाद होत आहे, ही शक्यता नाकारता येत नाही, असे फडणवीस म्हणाले आहेत. परंतु, अशा ऑनलाईन गेमिंग व गुटखा यांच्या जाहिराती जे कलाकार करतात त्यांनी सामजिक दायित्व व बांधिलकीसुद्धा लक्षात घेतली पाहिजे, असा टोला याबाबत जाहिराती करणाऱ्या कलाकारांना फडणवीस यांनी लगावला आहे. त्याचसोबत भारतरत्न, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या आयुष्यात कधीच अशा पद्धतीच्या जाहिराती केल्या नाहीत असे सांगत फडणवीस यांनी सचिन तेंडुलकर यांची भर सभागृहात प्रशंसा केली आहे.

हेही वाचा -

  1. Ajit Pawar on Base Camp: रायगड जिल्ह्यात एनडीआरएफचा बेस कॅम्प करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
  2. Rohit Pawar News : उद्योगमंत्र्यांच्या आश्वासनानंतर रोहित पवार यांनी विधानभवनातील आंदोलन घेतले मागे, सरकारला दिला 'हा' इशारा
  3. Jayant Sawarkar passsed away : ज्येष्ठ अभिनेता जयंत सावरकर यांचे निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.