ETV Bharat / state

Monsoon Update : पुढील 24 तासात उत्तरेकडे सरकणार बिपोरजॉय चक्रीवादळ; या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता

author img

By

Published : Jun 7, 2023, 12:14 PM IST

मंगळवारी संध्याकाळी पूर्वमध्य आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर चक्रीवादळ “बिपोरजॉय” निर्माण झाले. या चक्रीवादळामुळे राज्यातील काही जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार आहे. तर मॉन्सूनचे उशिराने आगमन होणार आहे.

Cyclone Biporjoy
बिपोरजॉय चक्रीवादळ

मुंबई : अरबी समुद्राच्या पूर्वमध्य आणि आग्नेय भागातील चक्रीवादळ बिपोरजॉय हे पुढील 24 तासात उत्तरकडे सरकणार आहे. तसेच चक्रीवादळ तीव्र स्वरुप धारण करण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा वेग 11 किलोमीटर प्रतितास असून पुढील 12 तासात याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार : मंगळवारी संध्याकाळी पूर्वमध्य व लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर चक्रीवादळ “बिपोरजॉय” निर्माण झाले. पुढील 24 तासांत “बिपोरजॉय” पूर्वमध्य अरबी समुद्रात तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता. यामुळे राज्यात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. हे वादळ गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे 890 किमी अंतरावर आहे. मुंबईच्या नैऋत्य बाजुला 1 हजार किमी अंतरावर आहे. तर पोरबंदरपासून हे वादळ 1 हजार 070 किमी अंतरावर आहे. पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस हे बिपोरजॉय वादळ आहे.

मॉन्सूनवर होणार परिणाम : हवामान खात्याने मंगळवारी सांगितले होते की, या बिपोरजॉय चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या हालचालीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली होती. ही शक्यता खरी ठरली असून चक्रीवादळामुळे केरळमध्ये मान्सून उशीरा दाखल होणार आहे. केरळमध्ये 8 जूनला तर मुंबईत 16 जूनच्या आसपास मॉन्सून दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु हा मॉन्सूनचा पाऊस नसणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.

हवामान विभागाचा इशारा : दरम्यान हे चक्रीवादळ खोल समुद्रात असल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पाऊस पडण्याची शक्यता नाही. दरम्यान पुढील तीन तासात चक्रीवादळाचा वेग 11 किलोमीटर प्रतितास होणार आहे. या वादळामुळे काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगाव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस पडले, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

उष्णतेची लाट येण्याची शक्यता : या चक्रीवादळामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. बिहार आणि पश्चिम बंगालसह 6 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. साधरण 10 जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा -

  1. Monsoon Update : महाराष्ट्रात 'या' तारखेपर्यंत मान्सून होणार दाखल; शेतकऱ्याने पेरणीची घाई करू नये
  2. unseasonal rain in Nanded : वादळी वाऱ्यामुळे नांदेडमधील केळी बागा पडल्या आडव्या; सरकारकडे शेतकऱ्यांची मदतीची हाक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.