ETV Bharat / state

शहरी नक्षलवाद प्रकरण : 'रूग्णालयात दाखल होण्यापेक्षा मी तुरूंगातच मरेन'

author img

By

Published : May 22, 2021, 1:31 AM IST

रूग्णालयात दाखल होण्यापेक्षा मी तुरूंगातच मरेन, असे फादर स्टेन स्वामी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुंबई उच्च न्यायालयात दाखल जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान उद्गार काढले. मुंबई उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी ७ जून पर्यंत तहकूब केली आहे. तळोजा कारागृहाला पुढील सुनावणीपर्यंत स्वामी यांच्या प्रकृतीचे काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

फादर स्टेन स्वामी
फादर स्टेन स्वामी

मुंबई- शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या फादर स्टॅन स्वामी यांनी उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल होण्यास हायकोर्टासमोर नकार दिला आहे. 'रूग्णालयात दाखल होण्यापेक्षा मी तुरूंगातच मरेन, असे फादर स्टेन स्वामी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुंबई उच्च न्यायालयात दाखल जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान उद्गार काढले. मुंबई उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी ७ जून पर्यंत तहकूब केली आहे. तळोजा कारागृहाला पुढील सुनावणीपर्यंत स्वामी यांच्या प्रकृतीचे काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पार्किसन्स आजाराने त्रस्त असलेले स्टॅन स्वामी यांनी हायकोर्टात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. न्यायमूर्ती एस. जे. काथावाला आणि न्यायमूर्ती एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत त्यांना कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते.


माझ्या प्रक्रुतीची कारागृहात हेळसांड होत आहे. आठ महिन्यांपूर्वी मी स्वतः हाताने खातपित होतो, लिहायचो, चालायचो. पण आता हळूहळू ते सगळं बंद झालं आहे. मला आता कोणीतरी भरवावे लागते, फिरताना आधार घ्यावा लागतो, माझी तब्येत अशी का ढासळली हे मला समजेल का? असा प्रश्न स्वामी यांनी कोर्टात केला. तळोजा कारागृहात असलेले स्टॅन स्वामी सध्या 84 वर्षांचे आहेत. मला कोणत्याही रुग्णालयात दाखल व्हायचे नाही, त्यापेक्षा मला जामीन द्या, मी रांचीला जाईन, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. जेजेतील वैद्यकीय पथकाने स्वामी यांच्या प्रकृतीचा अहवाल यावेळी कोर्टात दाखल केला. त्यांना सध्या ऐकू येत नाही, चालण्यासाठी काठी किंवा व्हिलचेअर लागते, वयोमानानुसार अन्यही काही आजार आहेत. मात्र,बाकी त्यांची प्रक्रुती स्थिर आहे, असे या अहवालात म्हटलेले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना कारागृहात कोरोना प्रतिबंधक लसही देण्यात आली आहे, असेही एनआयएच्यावतीने हायकोर्टाला सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.