ETV Bharat / state

कोरोनाचा फटका : मुंबईत टॅक्सी चालकांची होते उपासमार

author img

By

Published : Apr 10, 2021, 8:27 PM IST

मुंबई
मुंबई

आज मुंबईच्या रस्त्यावर दिवसभर शुकशुकाट होता. परिणामी दिवसभर टॅक्सी-रिक्षा चालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला. अनेकांना भाडेही मिळाले नसल्याने सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तर अनेकांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई - राज्य शासनाकडून काल रात्रीपासून कडक 'विकेंड लॉकडाऊन' लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आज मुंबईच्या रस्त्यावर दिवसभर शुकशुकाट होता. परिणामी दिवसभर टॅक्सी-रिक्षा चालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला. अनेकांना भाडेही मिळाले नसल्याने सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तर अनेकांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई

टॅक्सी चालक मुंबई सोडणार-

राज्य सरकारने 5 एप्रिलपासून मुंबई उपनगरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध लावले आहेत. बाजारपेठा, मॉल, खासगी कार्यालय आणि सर्वसामान्य दुकानांचे शटर बंद केल्याने मुंबईच्या रस्त्यांनी पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, गेल्या पाच दिवसात नव्या निर्बंधांमुळे प्रवासी मिळत नसल्याने तब्बल 70 टक्क्यांहून अधिक चालक आपली टॅक्सी-ऑटोरिक्षा रस्त्याशेजारी पार्क करून गावाकडे गेले आहेत. आता वीकेंड लॉकडाऊनमुळे प्रवासी मिळत नसल्याने उर्वरित टॅक्सी रिक्षाचालक मुंबई सोडण्याचा विचार करत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.

इंधनाचे पैसे सुद्धा निघाले नाहीत-

टॅक्सी चालक सर्वेश सिंग यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून आमच्या इंधनाचे पैसे निघत नाहीत. आज वीकेंड लॉकडाऊनमुळे तर सकाळी फक्त 40 रुपयांची कमाई केली आहे. चहा पाण्यात यातील 20 रुपये खर्च झाले आहेत. आज इंधनाचे सुद्धा पैसे निघाले नाहीत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून अशीच परिस्थिती भविष्यात राहिली तर आम्हाला मुंबई सोडण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई आणि उपनगरांतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी विचार करावा आणि त्यांना आर्थिक मदत करावीत.

टॅक्सी चालकांवर उपासमार-

मुंबईत दोन प्रकारे भाड्याने टॅक्सी चालवल्या जातात. त्यात एक प्रकारात चालकांना टॅक्सी मालकास दररोज ठराविक रक्कम द्यावी लागते. तर दुसऱ्या प्रकारात जेवढा धंदा होईल त्यातील एक हिस्सा चालक-मालकांना द्यावा लागतो. त्यामधील पहिला प्रकारातील टॅक्सी चालकांना प्रवासाअभावी धंदा परवडत नसल्याने त्याने आपली टॅक्सी रस्त्यावर पार्क करून गावाकडे गेले आहेत. तर दुसऱ्या प्रकारातील चालक अद्यापी उदरनिर्वाहासाठी वणवण फिरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपाशी राहण्याची पाळी आली आहे.

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.