ETV Bharat / state

Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचा प्रसार आटोक्यात, शुक्रवारी ५ नव्या रुग्णांची तर शून्य मृत्यूची नोंद

author img

By

Published : Dec 30, 2022, 8:13 PM IST

Mumbai Corona Update
संग्रहित छायाचित्र

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हायरसने धुमाकूळ ( Corona Patient In Mumbai ) घातल्याने राज्यातही त्याबाबतची खबरदारी घेण्यात येत आहे. मुंबईत ( Corona Infection Control In Mumbai) शुक्रवारी 5 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. मुंबईत कोरोना रुग्णांच्या ( Active Corona Patients ) संख्येत घट होत होती, मात्र त्यात आज किंचित वाढ झाली.

मुंबई - गेल्या काही दिवसात मुंबईतील कोरोनाचा प्रसार ( Corona Patient In Mumbai ) आटोक्यात आला आहे. गेले काही दिवस १० पर्यंत रुग्णांची नोंद होत आहे. आज ५ रुग्णांची ( Corona Infection Control In Mumbai) नोंद झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मागील काही दिवसात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत होती. आज त्यात किंचित वाढ होऊन ४८ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.

कोरोनाचे ५ नवे रुग्ण मुंबईत ३० डिसेंबरला २९३७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५ रुग्णांची ( Found 5 Patients On Friday ) नोंद झाली. आज आढळून आलेल्या ५ पैकी ५ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. सध्या ९ रुग्ण हॉस्पिटलमध्ये असून २ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मार्च २०२० पासून आतापर्यंत एकूण ११ लाख ५५ हजार १२२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३५ हजार ३२८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४८ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.३ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १,१६,१३६ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०००६ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या ४४३८ बेडस आहेत. त्यापैकी ९ बेडवर म्हणजे ०.२० टक्के इतक्या बेडवर रुग्ण आहेत.

रुग्णसंख्येत उतार सुरू मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात महापालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद ( Corona Infection Controled In Mumbai ) झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन गेले काही दिवस १० हुन कमी रुग्णांची नोंद होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.