ETV Bharat / state

Congress And NCP Attack On Bjp हसन मुश्रीफ ईडी छापेमारीवरुन काँग्रेस, राष्ट्रवादीची भाजपवर टीका: सहकार चळवळ संपवण्याचा भाजपचा डाव

author img

By

Published : Jan 11, 2023, 3:44 PM IST

Congress And NCP Attack On Bjp
संपादित छायाचित्र

राष्टवादीचे नेते तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ED Raid Case ) यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. त्यावरुन राष्ट्रवादी आणि काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल ( Congress And NCP Attack On Bjp ) केला आहे. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने ( NCP State President Jayant Patil ) केला आहे. तर सहकार चळवळ संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचा हल्लाबोल काँग्रेसने ( Congress Spokesperson Atul Londhe ) केला आहे. त्यामुळे ईडी जरी हसन मुश्रीफांवर कारवाई केली असली, तरी विरोधकांनी भाजपवर निशाना साधला आहे.

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ ( Congress And NCP Attack On Bjp ) यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल ( Hasan Mushrif ED Raid Case ) केला आहे. ही छापेमारी म्हणजे भाजपने सहकार चळवळ संपवण्याचा केलेला डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे ( Congress Spokesperson Atul Londhe ) यांनी केला आहे. तर विरोधकांना नामोहरम करुन बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्यात येतो. हा अतिशय निंदनीय प्रकार असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील ( NCP State President Jayant Patil ) यांनी केला आहे.

हसन मुश्रीफ ईडी छापेमारीवरुन काँग्रेस, राष्ट्रवादीची भाजपवर टीका

सहकार चळवळ संपवण्याचा डाव भाजपचे एजंट सीबीआय, इन्कम टॅक्स ईडी आणि सुपारीबाज किरीट सोमय्या ( Bjp Leader Kirit Somaiya ) यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील बहुजन शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी उभी झालेली सहकार चळवळ संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस तो प्रयत्न हाणून पाडेल अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. २०१२-१३ पासून सातत्याने साखर कारखान्यांना टार्गेट केले जात आहे. त्याच्यातून चार पैसे शेतकऱ्याला मिळाल्यामुळे मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी समृद्ध झालेला आहे. पण हे भाजपला आवडत नाही, म्हणून वेगळा सहकार विभाग तुम्ही का काढता? असा सवाल लोंढे यांनी उपस्थित केला. हा विषय राज्याचा आहे, नोटबंदीमध्ये सहकार बँकेमध्ये शेतकऱ्यांनी जमवलेले पैसे घेण्यास नकार का देता, आरबीआय याचे उत्तर तुम्ही द्या, असेही लोंढे यावेळी म्हणाले.

विरोधकांच्या कारखान्यावर धाडी का? सातत्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या साखर कारखान्यावरच छापेमारी का होते. तुमच्या नेत्यांनी साखर कारखाने टाकून पाहिले, तुमच्या नेत्यांना ते चालवता आले नाही. त्याच्यावर या चळवळी उभ्या झाल्या, महाराष्ट्र समृद्ध झाला, शेतकरी समृद्ध झाला हे तुम्हाला मान्य नाही असेही लोंढे यावेळी म्हणाले.

अदानी, अंबानीला अनुभव होता का? छापेमारी टाकताना काहीही फालतू कारणे कशी दिली जातात. अनुभव नसलेल्या व्यक्तीला कारखाना विकला असे जर कारण देता तर तुम्ही तर राफेल, फायटर जेट देशाच्या सुरक्षेसंबंधित असलेली गोष्ट ज्यांनी कागदाचे विमान बनवले नाही, त्या अदानीला कसे काय देता असा सवालही त्यांनी यावेळी केला. त्यांना अनुभव लागत नाही का ? भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर आरोप केले, त्याच्याबद्दल का बोलत नाही. ते तिथे जाऊन पवित्र होतात का, हा धंदा जनतेच्या लक्षात आलेला आहे. जनता याबाबत उठाव केल्याशिवाय राहणार नाही, असेही अतुल लोंढे यावेळी म्हणाले.

विरोधकांना बदनाम करण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जे नेते आक्रमकपणे बोलतात, त्यांना नामोहरम करण्यासाठी, बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून छापेमारी केली जात आहे. हा अतिशय निंदनीय प्रकार असून याचा आपण तीव्र शब्दात निषेध करतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षात ठामपणे उभे राहून सरकारला विरोध करणाऱ्यावपिरोधात यंत्रणांचा गैरवापर करण्यात येतात. त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. हसन मुश्रीफ ( ED Raid On Hasan Mushrif ) यांच्या घरावर याअगोदरही आयकर विभागाने छापेमारी केली होती. मात्र त्यामध्ये काहीच सापडले नाही. परंतु आता ईडीने छापेमारी केल्याचे समजते असेही जयंत पाटील म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.