ETV Bharat / state

Graduate Election : शिक्षक, पदवीधर निवडणुकीत युवासेना, शिंदे गटात रंगणार सामना

author img

By

Published : Jan 8, 2023, 8:09 PM IST

Graduate Election
Graduate Election

शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांच्या निवडणुकीचे ( Graduate Constituency Election ) बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. नाशिक, अमरावतीच्या जागांवर नागपूरमधून ना. गो. गाणार इच्छुक ( Teacher Constituency Election ) आहेत. कोकणमधून शेकाप, शिंदे गट,( Shinde group ) ठाकरे गटाने जोरदार तयारी केली आहे. शिवसेनेतील फूट, भाजप, शिंदे गटाची युतीमुळे ( BJP Shinde group alliance ) या निवडणुका चांगल्याच रंगणार आहेत.


मुंबई - शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ( Graduate Constituency Election ) जाहीर झाली. नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोकण शिक्षक या मतदारसंघात ३० जानेवारीला मतदान होणार ( Teacher Constituency Election ) असून २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. तर ४ फेब्रुवारीला मतदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे. विधान परिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी ७ सदस्य शिक्षक, तर ७ सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडून जातात. आता दोन पदवीधर आणि ३ शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या एकूण ५ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

कोणाला संधी मिळणार? नाशिक मतदारसंघातून डॉ. सुधीर तांबे आणि अमरावती मतदारसंघातून डॉ. रणजीत पाटील, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे पुन्हा रिंगणात असणार आहेत. नागपूर शिक्षक मतदार संघात शिक्षक परिषदेने आमदार नागो गाणार यांना पुन्हा याच मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. गाणार यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत तयारी केली आहे. भाजपकडून मात्र गाणार यांचे पत्ते कापण्याच्या हालचाली सुरू केले असून आपला उमेदवार देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



कोकणात चुरशीची लढत - कोकण शिक्षक मतदार संघातून शेकाप आमदार बाळाराम पाटील यांना पुन्हा पक्षाकडून संधी दिली. मतदारसंघात शिंदे गटाच्या शिक्षक सेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी देखील कंबर कसली आहे. तर भाजपकडून ज्ञानेश्वर म्हात्रे यांची गोची करण्याच्या तयारीत आहे. म्हात्रे यांच्याविरोधात भाजप शिक्षक आघाडीने जोरदार लॉबिंग सुरू केली असून ठाणे जिल्ह्यातील विद्यमान केंद्रीय मंत्री यांच्या पुतण्याला ऐनवेळी उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेकडून ही शिक्षक, पदवीधर निवडणुका लढवण्याची रणनीती आखली जात आहे. पदवीधर सिनेट सदस्य याकरिता कामाला लागले आहेत. माजी आमदार रामनाथ मोते यांना मानणारा एक गट ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे कोकणात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.



मतदार संघातील उमदेवाराची नोंदणी आवश्यक - पदवीधर मतदार संघातील उमदेवाराची नोंदणी आवश्यक असते. काही निकष यासाठी घालण्यात आले आहेत. उमेदवार, मतदार भारतीय नागरीक तसेच मतदार संघाचा रहिवाशी असावेत. निवडणूक जाहीर होण्याच्या तीन वर्षांपूर्वी मतदाराने पदवी अभ्यासक्रम पुर्ण केलेला असावा. यासोबत विहीत अर्ज १८ भरलेला असल्यासच मतदाराला मतदान प्रक्रियेत भाग घेता येतो. प्रत्येक जिल्हाला पदवीधर मतदार सघ असतो. पदवीधरांचे प्रश्न पदवीधर आमदाराने विधानपरिषदेत मांडावे, हा यामागचा उद्देश असतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.