ETV Bharat / state

Mumbai Trans Harbor Link Project : मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम ९० टक्के पूर्ण

author img

By

Published : Jan 11, 2023, 10:20 PM IST

Mumbai Trans Harbor Link route
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून, नोव्हेंबरपासून ट्रान्स हार्बर वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. देशातील सर्वात लांबीचा सागरी मार्ग असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई - मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम 90 टक्के काम पूर्ण झाले असून येत्या नोव्हेंबरपासून हा सागरी मार्ग खुला करण्यात येईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. देशातील सर्वात लांबीचा हा सागरी मार्ग ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Mumbai Trans Harbor Link Project
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक

180 मीटर लांब तसेच सुमारे 2300 मेट्रिक टन वजन - मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या पॅकेज 2 मधील पहिला सर्वात लांब ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकची उभारणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उभारण्यात आली. मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, मंत्री दादाजी भुसे, संजय राठोड, खासदार राहुल शेवाळे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्रीनिवासन अतिरिक्त आयुक्त गोविंदराज आदी उपस्थित होते.

Eknath Shinde
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग - मुंबई ते नवी मुंबई जोडणारा देशातील सर्वात लांब सी लिंक मुंबई ट्रान्स हार्बरच्या कामाला वेग आला आहे. शिवडी ते न्हावा शेवा दरम्यान सुमारे २२ किलोमीटरचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक तयार होत आहे. २०२३ पर्यंत हा प्रकल्प मार्गी लावण्याचा सरकारचा मानस आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकल्पाची आज पाहणी केली. मुंबई ते अलिबाग हे अंतर या सागरी महामार्गामुळे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. पर्यावरणपूरक असा हा सागरी महामार्ग असून बांधकामातील जागतीक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून त्याचे काम करण्यात आले आहे. या महामार्गावर टोल भरण्यासाठी थांबण्याची आवश्यकता नसेल. ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग ठरेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Mumbai Trans Harbor Link
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प

90 टक्के काम पूर्ण - संपूर्ण प्रकल्पांतर्गत समुद्रात उभरण्यात येणाऱ्या एकूण 70 ऑर्थोोट्रॉपिक स्टिल डेक स्पॅन पैकी एकूण ३६ स्पॅनची उभारणी पूर्ण झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई ट्रांस हर्बर लिंक या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहेत. प्रकल्पाची स्थापत्य कामे सुमारे 90 टक्के पूर्ण झाले आहे. मुंबई ट्रांस हर्बर लिंक हा मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणारा सुमारे 22 किमी लांबीच्या 6 पदरी (3+3मार्गिका) पूल आहे. या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे 16.5 किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे ५.५ किमी इतकी आहे.

नेव्हिगेशनल स्पॅनची उभारणी - मुख्य पुलाची रचना ही ६० मीटर लांबीच्या स्पॅनची असून मुख्यतः ते सेगमेंटल बॉक्स गर्डर व कॉक्रिट डेक आहेत. मुंबई पारबंदर प्रकल्पाचे एक प्रमुख वैशिष्ट्य असलेला हा सागरी क्षेत्रातील नॅव्हिगेशन भागातील स्टील डेक आहे. ज्याला तांत्रिकदृष्ट्या ऑर्थोोट्रॉपिक स्टील डेक (OSD) असे म्हणतात. समुद्रातील जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मोठ्या लांबीचे हे स्पॅन समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून सुमारे 25 मीटर उंच बांधण्यात येत आहेत. त्यामुळे हा स्पॅन नेव्हिगेशनल स्पॅन म्हणून ओळखला जातो. मुंबई ट्रांस हार्बर लिंक पॅकेज 2 मधील एकूण 32 ओएसडी स्पॅनपैकी 15 ओएसडी स्पॅन आधीच स्थापित केले गेले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत 180 मीटरचा हा पॅकेज 2 मधील सर्वात लांब ओएसडी स्पॅन स्थापित करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.