ETV Bharat / state

Cm On Employees Strike : मुख्यमंत्र्यांचे सरकारी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन

author img

By

Published : Mar 15, 2023, 10:30 PM IST

Updated : Mar 15, 2023, 10:54 PM IST

जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घ्यावा. कोणताही प्रश्न चर्चेतून सुटतो त्यामुळे कर्मचाऱ्यांनी चर्चा करावी संघर्ष टाळावा असे, आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Cm On Employees Strike
Cm On Employees Strike

मुख्यमंत्र्यांचे संप मागे घेण्याचे आवाहन

मुंबई : राज्यभरात शासकीय निमशासकीय महापालिका आरोग्य तसेच शिक्षक शिक्षण इतर कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी संप पुकारला आहे. मात्र राज्य सरकार जुन्या पेन्शन योजनेत संदर्भात सकारात्मक असून संप करणे इतपत तातडीचा प्रश्न नव्हता. संपकरांनी चर्चेची तयारी ठेवायला हवी. त्यांच्याशी आम्ही चर्चा करायला तयार आहोत. त्यांनी संघर्ष टाळायला हवा असे, आम्ही सातत्याने सांगत आहोत. असे मुख्यमंत्री म्हणाले ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

डॉक्टर दीपक सावंत यांचा पक्षप्रवेश : माजी आरोग्य मंत्री आणि शिवसेनेचे नेते डॉक्टर दीपक सावंत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि उद्धव ठाकरे गटाचे समर्थक दीपक सावंत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दीपक सावंत यांचा प्रवेश हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. केवळ आरोग्य विषयक काम करण्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आलो आहो.त बाकी कोणताही उद्देश नाही, असे त्यांनी सांगितले. शिवसेनेत आपल्याला गेल्या तीन वर्षात कोणतेही काम दिले गेले नाही, जबाबदारी दिली नाही, त्यामुळे आपली घुसमट होत होती, म्हणून आपण बाहेर पडलो असल्याचे त्यांनी सांगितले.

मेस्मा कायदा तरतूद नियमानुसार : राज्यातील अनेक संघटना या संपात सहभागी झाले आहे त्यापैकी काही संघटनांनी योग्य मार्ग स्वीकारला असून त्यांच्याशी झालेली चर्चा त्यांना मान्य आहे त्याचप्रमाणे अन्य कर्मचाऱ्यांनीही चर्चेची तयारी दाखवावी चर्चेतून नक्की प्रश्न सुटेल मेस्माच्या कारवाई संदर्भात अद्याप कोणतेही निर्देश दिल्या बाबत त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला मात्र विधानसभेत मंजूर करण्यात आलेल्या विधेयकात मेस्मा कायदा संदर्भातली तरतूद ही मेस्मा कायद्याची मुदत संपल्यामुळे करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभेत जास्तीत जास्त जागा आणणार : महाविकास आघाडीने कितीही प्रयत्न केला तरी आगामी लोकसभेमध्ये शिवसेना भाजपा युती जास्तीत जास्त जागा आणणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - Sadanand Kadam in Custody : दापोली साई रिसोर्ट प्रकरणी रामदास कदमांचे बंधू सदानंद यांची कोठडी 14 दिवसांनी वाढवली

Last Updated : Mar 15, 2023, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.