ETV Bharat / state

Patra Chawl Scam: पत्राचाळ घोटाळा प्रकरण, राऊत बंधु वगळता इतर आरोपींच्या गैरहजेरी मुळे आरोप निश्चिती रखडली

author img

By

Published : Jul 14, 2023, 7:40 PM IST

पत्राचाळ घोटाळ्यात सुनावणीच्या वेळी सर्व आरोपी न्यायालयात हजर राहत नाहीत. त्यामुळे प्रत्येक सुनावणीवेळी आरोप निश्चिती पुढे जाते .आज देखील आरोप निश्चिती होणार होती मात्र ती पुढे ढकलण्यात आली आहे. आज आरोपी संजय राऊत त्यांचा भाऊ प्रविण राऊत हे हजर झाले. मात्र इतर आरोपी हजर नसल्यामुळे ही सुनावणी तहकूब केली गेली. (Patra Chawl Scam)

Patra Chawl Scam
पत्राचाळ घोटाळा प्रकरण

मुंबई: शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तसेच त्यांचा भाऊ प्रविण राऊत यांच्यासह इतर आरोपींविरोधात पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या घोटाळ्यात संजय राऊत यांचे नाव आल्यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. याच प्रकरणात संजय राऊत यांना काही महिने जेल मधे जावे लागले. या खटल्याची सुनावणी अंतीम टप्यात आली असुन आरोप निश्चिती लवकरच होणार आहे मात्र सगळे आरोपी एकत्र उपस्थित राहत नसल्यामुळे आरोप निश्चिती वारंवार रखडत आहे.


मुंबईमधील पत्राचाळ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भात आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले. आणि त्यात उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांसह इतर अनेक आरोपींवर खटला दाखल आहे. आजच्या सुनावणीच्या वेळी आरोपी संजय राऊत, प्रवीण राऊत कोर्टात हजर झाले होते. सुनावणीवेळी गुरूआशिष कंपनी या आरोपी बनवण्यात आलेल्या आरोपीच्यावतीने कोण जबाबदारी घेणार? याचे उत्तर अनुत्तरीत राहिले. कारण सर्व आरोपी या वेळेला हजर नव्हतेच.

गुरूआशिष कंस्ट्रक्शन कंपनी पत्राचाळ घोटाळ्यात आरोपी आहे मात्र आजच्या सुनावणीच्या वेळीही त्यांचे कोणीही हजर नव्हते. ईडीनं बनवलेल्या आरोपी क्रमांक 4 वरील कंपनीचे प्रकरण लवादापुढेही प्रलंबित आहे. पत्राच्या घोटाळा प्रकरणी आरोपी वारंवार गैरहजर मुळे आज देखील आरोप निश्चिती अखेर झाली नाही. गुरूआशिष कंस्ट्रक्शनसाठी पत्राचाळ घोटाळ्याचा खटला थांबवून ठेवायचा का?असा प्रश्व न्यायालयाने उपस्थित केला आहे.


आजच्या सुनावणीसाठी आरोपी संजय राऊत आणि इतर आरोपी हजर झाले होते मात्र आरोपी सारंग आणि राकेश वाधवान हे दोघे आरोपी न्यायालयात हजर नव्हते. कोर्टाने ही बाब गंभीरपणे घेतली,आजच्या सुनावणीतही वाधवान पितापुत्रांना कोठडीतून कोर्टात हजर केलेले नाही. आरोपी बनवलेल्या कंपनीची जबाबदारी घेण्यास कुणीही पुढे येत नसल्याने आरोपनिश्चितीची प्रक्रिया रखडली.


सारंग वाधवान आणि राकेश हे केवळ याच खटल्यात नव्हे; तर इतर अन्य खटल्यांमध्ये देखील ते आरोपी आहेत. आणि तुरुंगात आहेत ते वारंवार गैरहजर राहत असल्यामुळे आज होणारी आरोप निश्चिती पुन्हा पुढच्या तारखेपर्यंत लांबली. पुढील सुनावणीत सर्व आरोपींना कोर्टापुढे हजर करण्याचे तपासयंत्रणेला निर्देश सत्र न्यायालयाने दिले. मुंबई सत्र न्यायालयातील पुढील सुनावणी १७ ऑगस्ट पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. Summons Against Thackeray And Raut : उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना 'या प्रकरणी' 31 जुलै रोजी कोर्टात हजर राहण्याचे समन्स जारी
  2. Maharashtra Political Crisis: राजकारणासाठी फडणवीस पोहरादेवीला खोटे पाडत आहेत, संजय राऊतांचा आरोप
  3. Maharashtra Political Crisis: १६ आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस, २ आठवड्यांचा दिला वेळ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.