ETV Bharat / state

Devendra Fadnavis Loksabha : फडणवीस नागपुरातून लोकसभा लढवणार? बावनकुळे म्हणाले...

author img

By

Published : Aug 17, 2023, 5:05 PM IST

Updated : Aug 17, 2023, 6:34 PM IST

गेल्या काही वर्षांत देवेंद्र फडणवीस हे राज्यात भाजपाचा आश्वासक चेहरा म्हणून उदयास आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नागपुरातून उमेदवारी दिली जाणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत. तर बावनकुळे यांनी एकप्रकारे नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी देण्यावर पूर्णविराम दिला आहे. मात्र पुण्यामधून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

chandrashekhar bawankule
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

प्रतिक्रिया देताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : सन २०१४ ते २०१९ सलग पाच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे व आता उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे २०२४ मध्ये नागपुरातून लोकसभा निवडणूक लढवणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत युवा चेहऱ्यांना संधी देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस आहे. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातून देवेंद्र फडवणीस यांना नागपूरमधून लोकसभेची संधी देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता, नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सक्षम नेतृत्व केंद्रामध्ये असल्याकारणाने अशा पद्धतीची शक्यता त्यांनी नाकारली आहे. असे जरी असले तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रातील स्थानासाठी केंद्रीय नेतृत्वही आग्रही असल्याचे सांगितले जात आहे.




देवेंद्र फडणवीस यांचे सक्षम नेतृत्व : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून लावण्यामध्ये सर्वात मोठी भूमिका बजावणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नागपुरातून उमेदवारी दिली जाणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत. महाराष्ट्रात भाजपाला देवेंद्र फडणवीस यांचे सक्षम नेतृत्व लाभले आहे. सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणात ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यामागे देवेंद्र फडणवीस हे मुख्य केंद्रबिंदू आहेत. १०६ आमदारांचे पाठबळ असतानासुद्धा महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. तरीही देवेंद्र फडवणीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. असे असताना देवेंद्र फडवणीस यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात स्थान देण्याची चर्चा तेव्हापासूनच सुरू झाली होती. २०२४ च्या केंद्रीय मंत्रिमंडळात जास्तीत जास्त तरुणांना संधी मिळावी या हेतूने फडणवीसांना दिल्लीत नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज्यातून नागपूरमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. उमेदवारी द्यायची याचा पूर्ण अधिकार केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला असतो. नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सक्षम नेतृत्व महाराष्ट्र व देशाला लाभले आहे. त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात, देशात इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत काम केले आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्यासारखे नेतृत्व आहे याचा आम्हाला अभिमान आहे. - चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष



नागपुरात नितीन गडकरी यांचे सक्षम नेतृत्व : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत घराणेशाहीला चाप लावत जास्तीत जास्त युवकांना व महिलांना संधी देण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. त्या अनुषंगाने राज्यातून नागपूरमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान जे काही वक्तव्य करतात ते जे निर्देश देतात त्याचे पालन भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता करत असतो. युवकांना व महिलांना संधी देण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. बावनकुळे यांनी एका प्रकारे नागपूर मधून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी देण्यावर पूर्णविराम जरी दिला असला तरी सुद्धा, पुण्यामधून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा -

  1. Bawankule Criticized Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींवर टीका करून आपली उंची वाढवण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत- बावनकुळे
  2. Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना अल्झायमरचा आजार, चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या- चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
  3. Upcoming Assembly Elections : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप १५२ जागा जिंकणार - चंद्रशेखर बावनकुळे
Last Updated : Aug 17, 2023, 6:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.