ETV Bharat / state

15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान सीईटी परीक्षा होणार - मंत्री सामंत

author img

By

Published : Sep 7, 2021, 9:00 PM IST

शैक्षणिक वर्षे 2021-22 करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) दिनांक 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.

मंत्री उदय सामंत
मंत्री उदय सामंत

मुंबई - शैक्षणिक वर्षे 2021-22 करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) दिनांक 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.

परीक्षा केंद्राची संख्या वाढवणार

सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी एकूण 8 लाख 55 हजार 879 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या प्रवेश परीक्षांसाठी 226 केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. तसेच राज्याबाहेरील केंद्रांच्या संख्येतही या वर्षी वाढ करण्यात आलेली असून परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी सांगितले.

प्रवेशपत्रावर मिळणार लोकल प्रवास

परीक्षांसाठी प्रती दिवस जास्तीत जास्त प्रति दिन 50 हजार संगणक उपलब्ध करण्यात आलेले आहे. त्यातील 25 हजार संगणक अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थ्यांच्या संख्या व विद्यार्थ्यांनी दिलेल्या विकल्पानुसार सेशन संख्या निश्चित करण्यात येईल. ही प्रवेश परीक्षा राज्य शासनाने कोवीड-19 बाबत जाहीर केलेल्या सूचनांच्या नियमांचे पालन करुन राबविण्यात येणार आहे. तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी मुंबईमध्ये लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. तरी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी लोकल ट्रेन तिकीटासाठी परीक्षेचे प्रवेशपत्र सोबत ठेवावे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

प्रवेश 15 ऑक्टोबरनंतर

86 टक्के विद्यार्थ्यांना प्रथम विकल्पानुसार परीक्षा केंद्र मिळणार आहेत व 14 टक्के विद्यार्थ्यांना उर्वरीत विकल्पानुसार परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया अभ्यासक्रमनिहाय सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करण्यात येईल व अभ्यासक्रमनिहाय प्रवेश प्रक्रिया 15 ऑक्टोबरनंतर सुरू करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.

20 ऑक्टोबरला निकाल

संबंधित परीक्षेचा निकाल 20 ऑक्टोबरपर्यंत जाहीर करण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष 2021-22 नोव्हेंबरपासून सुरू होईल. हे शैक्षणिक वर्ष सुरू करताना राज्यातील त्या वेळेची कोरोनाची परिस्थिती पाहून ऑनलाइन सुरू करायचे की ऑफलाइन याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सामंत म्हणाले.

संकेतस्थळावर माहिती मिळणार

खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी ‘गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणे’ या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून 8 लाख रुपये इतकी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने घेतला आहे. राज्य सीईटी कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर तपशीलवार वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली.

अशा असतील सीईटी परीक्षेच्या तारखा

  • मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लीकेशन, मास्टर हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ आर्टस, बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ एज्युकेशन या परीक्षा 15 सप्टेंबर, 2021 रोजी होणार आहेत.
  • मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन, मास्टर ऑफ बिजनेस ॲडमिनीस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट स्टडी या परीक्षा दि. 16 ,17 व 18 सप्टेंबर, 2021 रोजी होणार आहेत.
  • बॅचलर ऑफ इंजिनिअरींग/टेक्नॉलाजी (B.E/B.TECH), बॅचलर ऑफ फार्मसी (B.Pharm/Pharm.D), ॲग्रीकल्चर अँड ॲलाईड कोर्स या परीक्षा दि. 20 सप्टेंबर, 2021 ते 1 ऑक्टोबर, 2021या दरम्यान होणार आहेत.
  • बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ एज्युकेशन अँड मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ लॉ (5 वर्षे), बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन या परीक्षा दि. 3 ऑक्टोबर, 2021 रोजी होणार आहेत.
  • बॅचलर ऑफ फिजीकल एज्युकेशन दि. 4, 5, 6 आणि 7 ऑक्टोबर, 2021 रोजी होणार आहेत. तसेच बॅचलर ऑफ लॉ-(3 वर्षे) 4 व 5 ऑक्टोबर, 2021, बॅचलर ऑफ एज्युकेशन जनरल अँड स्पेशल, या परीक्षा दि. 6 व 7 ऑक्टोबर, 2021रोजी होणार आहेत.
  • बॅचलर ऑफ फाईन आर्ट दि. 9 व 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत.

हेही वाचा - राज्यातील मंदिरे बंद; मात्र आरोग्य मंदिरे सुरू.. जनता आशीर्वाद देईल, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.