Aryan Khan Drug Case : समीर वानखेडेने शाहरुख खानकडे 25 कोटींची लाच मागितली होती, सीबीआयच्या आरोपपत्रात खुलासा

author img

By

Published : May 15, 2023, 1:52 PM IST

Updated : May 15, 2023, 3:00 PM IST

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण

एनसीबीचे माजी प्रमुख समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयने समीर वानखेडेने यांच्या विरोधात तयार केलेल्या आरोपपत्रात त्यांनी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा उल्लेख आहे. नंतर हा सौदा 18 कोटींमध्ये ठरला होता.

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनसीबीचे माजी प्रमुख समीर वानखेडे यांच्याविरुद्ध सीबीआयने आरोपपत्र तयार केले आहे. या एफआयआरमध्ये ड्र्ग्ज प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार केपी गोसावी याचाही उल्लेख आहे. गोसावीने आर्यन खानच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपये उकळण्याचा कट रचला होता. केपी गोसावी आणि त्यांचे सहकारी सॅनविल डिसोझा यांनी लाचेची रक्कम म्हणून 50 लाख रुपयांची टोकन रक्कम देखील घेतली होती परंतु नंतर या 50 लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेतील काही भाग त्यांना परत करण्यात आला, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

50 लाखांचे टोकन दिल्याचे आरोपपत्रात नमूद : समीर वानखेडेने शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांची लाच मागितली होती. नंतर हा सौदा 18 कोटींवर ठरला होता. त्यामध्ये 50 लाखांचे टोकन दिल्याचे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे. यापूर्वीच भ्रष्टाचार प्रकरणी आर्यन खान प्रकरणातील अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. आर्यन खान ड्रग्ज क्रूझ प्रकरणात सीबीआयकडून चौकशी सुरू असलेले अधिकारी समीर वानखेडे यांनी केपी गोसावी आणि प्रभाकर साईल यांना स्वतंत्र साक्षीदार म्हणून घेण्याचे निर्देश दिले होते.

केपी गोसावीला स्पेशल ट्रीटमेंट : एफआयआरनुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) विशेष चौकशी पथकाने (एसईटी) केलेल्या चौकशीत असे समोर आले आहे की आरोपींना (आर्यन खानसह) स्वतंत्र साक्षीदार के. पी. गोसावी याच्या खासगी वाहनातून एनसीबी कार्यालयात आणण्यात आले होते. आरोपींच्या भोवती स्वतंत्र साक्षीदार केपी गोसावीची उपस्थिती जाणूनबुजून अशा प्रकारे तयार करण्यात आली होती की आरोपींना ताब्यात ठेवण्यासाठी एनसीबी कर्मचारी असतानाही केपी गोसावी हे एनसीबीचे कर्मचारी वाटावे. स्वतंत्र साक्षीदार के. पी. गोसावी याला आरोपींच्या सहवासात हजर राहण्याची परवानगी देण्यात आली होती. तसेच त्याला छाप्यानंतर एनसीबी कार्यालयात येण्याची परवानगी देखील देण्यात आली होती, जी स्वतंत्र साक्षीदाराच्या नियमांच्या विरुद्ध आहे.

हेही वाचा :

  1. ED Summons Jayant Patil: ईडीने बजावले जयंत पाटील यांना दुसरे समन्स; 29 मे रोजी होणार चौकशी
  2. Action Against Tihar Jailer : सत्येंद्र जैनला कारागृहात सवलत, दोन कैद्यांनाही सेलमध्ये हलवले: तिहारच्या जेलरवर कारवाई
  3. Adarsh Housing Society Corruption Case: मृत्युच्या 11 वर्षानंतर मिळाला कन्हैयालाल गिडवाणी यांना न्याय; आदर्श घोटाळा प्रकरणी कुटुंबासह न्यायालयाकडून दोषमुक्त
Last Updated :May 15, 2023, 3:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.