ETV Bharat / state

Bmc Budget 2023 : कंत्राटदारांचे नव्हे, मुंबईकरांचे बजेट आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

author img

By

Published : Feb 4, 2023, 2:48 PM IST

गेल्या पंचवीस वर्षात कंत्राटदार सांगेल तीच कामे आणि कंत्राटदार सांगेल तेच बजेट असे जे चित्र होते ते आज अखेर बदलले आहे. मुंबई महापालिकेचा यावर्षीचा अर्थसंकल्प मुंबईकरांच्या मागण्या, अपेक्षा मागवून त्यानुसार तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हे बजेट कट कमिशन आणि कंत्राटदारांचे नसून मुंबईकरांचे आहे. अशी प्रतिक्रिया आमदार आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

Ashish Shelar
आशिष शेलार

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने आज 2023- 24 चा 52 हजार 619 कोटींचा अर्थसंकल्प मांडला आहे. पहिल्यांदाच 50 हजारांचा टप्पा ओलांडला असून ही 14.50 टक्के वाढ आहे. मात्र, या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कत्राटदारांचा नाही तर मुंबईकरांचा अर्थसंकल्प असून त्याचे स्वागत करीत असल्याची प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतील हवा प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून गेली आहे. त्यामुळे याबाबत तातडीने उपाय योजना करा, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही केली होती. त्यानुसार त्यांनी तातडीने पालिका आयुक्तांना सुचना केल्या होत्या. त्यामुळे यावेळी प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी अर्थसंकल्पात तब्बल 1500 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली, त्याचे आम्ही स्वागत करतो.



मुंबईकरांच्या मागणीतला अर्थसंकल्प : मुंबईकरांना चालण्यासाठी फुटपाथ देणे. ही पालिकेची जबाबदारी मान्य करुन 9 मिटर पेक्षा मोठ्या प्रत्येक रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ देण्याची भूमिका पालिकेने घेतली. त्याचे मुंबईकरांच्यावतीने स्वागतच करीत असल्याचे सांगून नवे संकल्प केलेले नाहीत. त्यामुळे काही अपेक्षा आमच्या अजून होत्या. पण करवाढ मुंबईकरांवर लादली नाही. रस्ते, आरोग्य, कोस्टलरोड, अशा पायाभूत सेवा सुविधांंना केलेली तरतूद ही जमेची बाजू असल्याचेही शेलार म्हणाले. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तृतीय पंथीय यांचा संवेदनशीलपणे अर्थसंकल्पात विचार केला गेला आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे कंत्राटदारांच्या मर्जीतला हा अर्थसंकल्प नसून मुंबईकरांच्या मागणीतला अर्थसंकल्प आहे.

मुंबई महापालिका मुख्यालयात अर्थसंकल्प सादर: मुंबई महापालिकेचा सन २०२३ - २४ चा ५२,६१९.०७ कोटींचा आणि ६५.३३ कोटीचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक इकबाल चहल यांना मुंबई महापालिका मुख्यालयात अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात 2022-23 च्या तुलनेत सुमारे 14.52% ची वाढ केली आहे. 2030 पर्यंत मुंबई शहराला पायाभूत सुविधांनी विकसित असे आनंदी शहर बनवण्यासाठी पालिका प्रयत्न करणार आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नागरिक सुविधा पूरवीण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्प सादर केल्याचे आयुक्त चहल यांनी स्पष्ट केले. पर्यावरणासाठी नेट झिरो ही संकल्पना अमलात आणली असून वातावरण कृती आराखडा तयार करण्याचे काम प्रगती पथावर आहे.

पहिल्यांदाच पन्नास हजार कोटींचा टप्पा पार : बेस्टला 1382 कोटी रुपये कर्ज स्वरूपात देण्यात आले आहे. मुंबईकरांना 32 ठिकाणी सार्वजनिक वाहनतळ तार करण्यात येणार आहे. व्यवसाय विकास विभागासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कोस्टल रोडसाठी 3545 कोटी खर्च करण्यात येणार आहेत. सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी 2792 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. राणीच्या बागेसाठी 140 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी दीड हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत.

हेही वाचा: BMC Budget 2023 मुंबई महानगरपालिकेचा 52 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर पहिल्यांदाच पन्नास हजार कोटींचा टप्पा पार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.