Boyfriend Attacked On Girlfriend: रात्र झाल्याने ती घराकडे निघाली, पण प्रियकराने अडविले; वाद अन् थेट...

author img

By

Published : Jun 2, 2023, 10:58 PM IST

Boyfriend Attacked On Girlfriend

प्रेयसीवर जीवघेणा हल्ला करणार्‍या आकाश मुखर्जी या प्रियकराला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घरी जाण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

मुंबई: २८ वर्षांची तक्रारदार तरुणी ही भिवंडीच्या कोनगावची रहिवाशी आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तिचे आकाशसोबत प्रेमसंबंध होते. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता ते दोघेही कल्याण रेल्वे स्थानकात भेटले होते. तेथून ते दोघेही लोकल ट्रेनने गेटवे ऑफ इंडियाला गेले. तिथे काही तास फेरफटका मारल्यानंतर ते दोघेही वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्डला आले होते.

'या' कारणावरून झाला वाद: समुद्रकिनार्‍यावर गप्पा मारत असताना आकाशने प्रेमाखातर त्याने धर्म परिवर्तन करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यामुळे तिने तिच्या मावशीला त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती सांगून लवकरच लग्नासाठी तयार कर असे सांगितले. रात्री दहा वाजता तिने घरी जाण्याचा निर्णय घेतला, यावेळी त्याने तिला थोडा वेळ थांबण्यास सांगून तिला ओलामधून घरी सोडतो असे सांगितले. तिने त्यास नकार देताच त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. रागाच्या भरात त्याने तिचे केस पकडून दगडावर जोरात आपटले. त्यानंतर त्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड केल्यानंतर तिथे काही लोक जमा झाले.


आरोपीस अटक: तरुणीकडून घडलेला प्रकार समजताच या लोकांनी दोघांनाही पकडून पोलिसांना ही माहिती दिली. ही माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आकाशच्या मारहाणीत तिच्या डोळ्यांना आणि नाकाला दुखापत झाली होती. रक्तस्त्राव होत असल्याने तिला तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर पोलिसांनी तिची जबाब नोंदवून घेतली होती. या जबाबानंतर पोलिसांनी आकाश मुखर्जी विरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यात नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा:

Father Killed Son : व्यसनाधीन पोराकडून आयफोनसाठी हट्ट, बाप चिडला अन् केला घात

Nashik ACB Action: मनपा शिक्षण अधिकारी धनगर लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

Mumbai Crime : फ्रीजर चोरून नेण्यासाठी ॲपद्वारे टेम्पो बूक केला अन् चोरटे फसले

Chhota Rajan : छोटा राजनची नुकसान भरपाईची याचिका, मागितला केवळ एक रुपया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.