ETV Bharat / state

Anil Deshmukh Case: अनिल देशमुख यांना 26 एप्रिलपर्यंत भारतात कुठेही फिरता येणार; मुंबई सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

author img

By

Published : Mar 17, 2023, 7:22 AM IST

Updated : Mar 17, 2023, 5:33 PM IST

Anil Deshmukh
अनिल देशमुख

राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या आर्थिक व्यवहाराप्रकरणी तुरुंगवास घडवला होता. त्या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी जमिनानंतर मुंबई सोडून त्यांना इतरत्र कुठेही जाता येणार नाही. कारण मुंबई सत्र न्यायालयाने अशी देखील बंदी घातली होती. मात्र आता सत्र न्यायालयाने ही बंदी 26 एप्रिलपर्यंत उठवली आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर स्वरूपाचा आरोप असल्यामुळे तसेच त्यांना या आरोपाप्रकरणी अनेक महिने तुरुंगात राहावे लागले होते. तरी अद्याप सदर प्रकरणाची पूर्ण चौकशी झालेली नाही. या प्रकरणातील एक मुख्य आरोपी मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी सचिन वाझे हा सध्या तळोजा तुरुंगात आहे. त्याची देखील चौकशी सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माजी मंत्री अनिल देशमुख यांना देखील मुंबई सोडून इतरत्र कोठे जाता येणार नाही, अशा प्रकारची ही बंदी घातली होती. यामधून त्यांना आता दिलासा मिळाला आहे.



अनुमती मिळावी म्हणून अर्ज : मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती रोकडे यांच्यासमोर या प्रकरणी अनिल देशमुख यांनी मुंबई आणि इतरत्र ठिकाणी कामकाजासाठी जाण्याबाबत अनुमती मिळावी म्हणून अर्ज केला होता. ईडीने चौकशी होईपर्यंत मुंबई आणि मुंबईच्या बाहेर त्यांना इतरत्र कुठे जाऊ देता कामा नये, अशा स्वरूपाची मागणी केली होती. परंतु आता अनिल देशमुख यांच्या मागणीवर न्यायालयाने विचार करत त्यांना मुंबई आणि मुंबईच्या बाहेर देशात कुठेही जाता येईल, असे निर्देश दिले. मात्र यामध्ये एक महत्त्वाची अट घातली. ती म्हणजे फक्त 26 एप्रिल 2023 पर्यंतच ते मुंबईच्या बाहेर मुंबई किंवा देशात फिरू शकतात. मात्र त्यानंतर त्यांच्यावरील बंदी पुन्हा तसेच कायम लागू राहील, असे न्यायमूर्ती रोकडे यांनी म्हटले आहे.


देशात फिरण्यासाठीची मनाई उठवलेली आहे : न्यायालयाने त्यांना जामीनावर मुक्त केल्यानंतर देशात आणि मुंबईत चौकशी सुरू असेपर्यंत कुठेही जाण्यास सक्त मनाई केली होती. परंतु या संदर्भात विविध कामकाज आणि नातेवाईकांच्या काही महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी त्यांना जाणे अगत्याचे असल्याचे त्यांनी विनंती अर्जात नमूद केले. त्यामुळे न्यायालयाने त्यांची देशात फिरण्यासाठीची मनाई उठवलेली आहे.

हेही वाचा : Devendra Fadnavis On Amruta Fadnavis : अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांचा खुलासा, पाहा संपूर्ण व्हिडिओ

Last Updated :Mar 17, 2023, 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.